मान्सून केरळमध्ये २८ मे रोजी पोहोचणार तर महाराष्ट्रात कधी ?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात यावर्षी मान्सून कदाचित वेळेआधीच दाखल होऊ शकेल. स्कायमेट या खासगी कंपनीने मान्सून आणि हवामानाबाबतची माहिती दिली आहे. यावर्षी मान्सून हा १ जूनऐवजी २८ मे पर्यंत केरळच्या किनारपट्टीवर पोहोचू शकतो. या एजन्सीच्या म्हणण्यानुसार यावेळी मान्सून त्याच्या निर्धारित वेळेच्या ४ ते ५ दिवस आधीच अंदमानच्या समुद्रात येऊ शकेल. देशाच्या अधिकृत हवामान कार्यालयाच्या … Read more

मंदिरात पूजा करणार्‍या भाजप नेत्याला केरळ मध्ये अटक; लाॅकडाऊनच्या उल्लंघनाचा ठपका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना विषाणूमुळे देशभरात लॉकडाउन लागू केलेला आहे तसेच सरकारने सर्व प्रकारच्या सभांनादेखील बंदी घातलेली आहे. दरम्यान, केरळमधील सार्वजनिक ठिकाणी गर्दी रोखण्यासाठी लागू असलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजप नेते आणि मंदिरप्रमुखांसह पाच जणांना नुकतेच अटक करण्यात आली आहे. मंदिरातील धार्मिक विधीवेळी मंदिर प्रमुखांनी जमाव गोळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एरुमापट्टी पोलिसांनी … Read more

अहमदाबाद सील; भाजपने केरळ, दिल्ली सरकारला मागितली मदत..हे कसले गुजरात माॅडेल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । गेल्या सहा दिवसांत गुजरातमध्ये १२२ जणांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच झालेल्या एकूण मृत्यूंपैकी ४६ टक्के मृत्यू हे गेल्या सहा दिवसांतील आहेत.त्यामुळे झालेल्या एकूण मृत्यूची संख्या ही ६ मे रोजी ३९६ वर पोहचली आहे अशातच केंद्र सरकार आणि माध्यमांचे लक्ष हे सातत्याने बंगालवर केंद्रित झाले होते. जर आपण गेल्या काही दिवसांपासून टीव्ही … Read more

केरळने कोरोनाला झोडपून काढलंय, आपण त्यांच्याकडून काय शिकणार..??

मजबूत आरोग्य सुविधा आणि कोरोना विषाणूविरुद्धची प्रभावी रणनीती यामुळे केरळने कोरोनाविरुद्धच्या लढाईत बाजी मारली आहे. मृत्यूंची संख्या मर्यादित ठेवण्यात केरळने मिळवलेलं यश इतर राज्यांसाठीही मार्गदर्शक आहे.

केरळ कडून ‘या’ १० गोष्टी इतर राज्यांनी शिकायलाच हव्यात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात कोरोनाचे १४३७८ रुग्ण आढळले आहेत, तर ४८० लोक मरण पावले आहेत. बर्‍याच राज्यात संसर्ग होण्याचे प्रमाण सतत वाढते आहे, तर केरळमध्ये संसर्गाचे प्रमाण कमी झाले आहे. येथील रिकवरी रेट ५०% आहे, तर देशातील रिकवरीचा रेट ११% आहे. केरळमध्येही संक्रमित लोकांच्या मृत्यूचे प्रमाण ०.५% आहे, तर देशव्यापी … Read more

….म्हणुन वृद्ध वडिलांना खांद्यावर घेऊन मुलानं धावत गाठलं हाॅस्पिटल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूची लागण होण्यापासून रोखण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत असूनही त्याच्या कोरोना संक्रमणाची संख्या सतत वाढतच आहे.सध्याची परिस्थिती पाहता सरकारने लॉक-डाऊन ३ मे पर्यंत वाढविला आहे.परंतु लॉकडाऊनमधला पोलिसांचा कडकपणा मात्र काही लोकांसाठी त्रासदायक बनला आहे.केरळमध्येही अशीच एक बाब समोर आली आहे,जिथे एका मुलाला आपल्या आजारी पित्याला खांद्यावर घेऊन रस्त्यावर धावत जाऊन … Read more

हा कोरोना तर कुणाल कामराचा मित्र निघाला, शशी थरुर असं का म्हणतायत पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आतापर्यंत जगभरात कोरोनाव्हायरसच्या १८,००,००० प्रकरणांची नोंद झाली आहे. भारतासह बर्‍याच देशांमध्ये या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाउन करण्यात आले आहे. फ्लाइट, गाड्या धावत नाही आहेत. भारतातही २१ दिवसांचा लॉकडाउन सुरु आहे ज्या अंतर्गत सर्व प्रकारच्या गाड्या बंद आहेत. दरम्यान, कॉंग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी या परिस्थितीला प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या … Read more

लाॅकडाउन असूनही ती प्रियकरासोबत घरातून पळाली, पुढे झालं असं काही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केरळमधील कोझिकोड जिल्ह्याजवळच्या थमरासेरीच्या वेगवेगळ्या धर्माशी संबंधित असलेले एक प्रेमी जोडपं नुकतेच घरातून पळून गेले होते पण लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. एका २१ वर्षीय प्रेयसीने आपल्या २३ वर्षीय प्रियकरासह घरातून पळ काढला असताना शनिवारी ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. वेगवेगळ्या धर्मातील असल्यामुळे या महिलेचे कुटुंब त्यांच्या लग्नाविरूद्ध … Read more

देशात कोरोनाचे ‘हे’ पाच हाॅटस्पाॅट, यात तुमचे राज्य, शहर तर नाही ना? घ्या जाणुन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आता कोरोना विषाणू देशातील प्रत्येक राज्यात पसरला आहे. आतापर्यंत २५०० हून अधिक लोक या विषाणूला बळी पडले आहेत आणि ६० हून अधिक लोक मरण पावले आहेत. अशातच काही शहरे आहेत जी कोरोना विषाणूची ‘हॉटस्पॉट्स’ बनली आहेत. म्हणजेच या शहरांमध्ये इतर शहरांपेक्षा जास्त प्रकरणे नोंदवली गेली आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार महाराष्ट्र, तामिळनाडू, … Read more

केरळमधील तळीरामांना दिलासा; डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर मिळणार दारू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी केंद्रानं संपूर्ण देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन लागू केला. लॉकडाऊनच्या कालावधीत जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व वस्तूंची दुकानं ही बंद राहणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे केरळमधील तळीरामांची चांगलीच कोंडी झाली. सगळीकडं दारुची दुकानं बंद असल्यामुळे, गेल्या ५ दिवसांमध्ये ५ तळीरामांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली … Read more