… तर अशाप्रकारे होतो आहे कोरोनावरील औषध रेमेडीसिव्हिरसह इतर औषधांचा काळाबाजार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या उपचारासाठीचे औषध रेमेडिसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार केला जात आहे. ते टॉसिलीझुमॅब असो किंवा रेमेडिसिव्हिर इंजेक्शन असो रूग्ण औषधासाठी आस धरून आहेत. एकीकडे औषधांच्या अभावामुळे लोक आपला जीव गमावत आहेत तर, दुसरीकडे लोक त्याचा काळाबाजार करण्यात गुंतलेले आहेत. गुजरातच्या भावनगरमध्ये रेमेडिसिव्हिरच्या काळ्या बाजारामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. रेमेडिसिव्हिर औषधांसह अन्य काही औषधांच्या … Read more

“भातापेक्षाही ‘या’ शेतीतून शेतकरी अधिक पैसे कमवू शकतात”- नीति आयोग CEO अमिताभ कांत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर शेतकरी भाताऐवजी बाजरीची लागवड करतील तर त्यांचा अधिक फायदा होऊ शकतो. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी सांगितले की, पाण्याचा वापर कमी करण्यासाठी तांदूळ लागवडीऐवजी बाजरीच्या लागवडीकडे वाटचाल करण्याची गरज आहे. अमिताभ कांत म्हणाले की, बाजरीमध्ये पोषक आणि सूक्ष्म पोषक घटक असतात, विशेषत: त्यात प्रथिने आणि कॅल्शियम असतात. … Read more

पुराच्या पाण्यातून गुरे वाहून जातानाचा ‘हा’ व्हिडिओ होतोय व्हायरल 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या गुजरातमध्ये जोरदार पाऊस सुरु असून अनेक गावांमध्ये पूर आला आहे. येथील जनजीवन संपूर्णतः विस्कळीत झाले असून सध्या पूरस्थिती गंभीर झाली आहे. गुजरातच्या खिजडीया मोटा या गावात पुराच्या पाण्यामध्ये जनावरे वाहून गेल्याची घटना घडली आहे. पडधरी, राजकोट या परिसरात होणाऱ्या पावसामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गुजरातमध्ये संततधार सुरु असल्याने गावांनी … Read more

एकेकाळी भजी विकणारा मुलगा पुढे जाऊन बनला धीरुभाई अंबानी; जाणुन घ्या जीवनप्रवास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । धीरूभाई अंबानी हे नाव भारतातच नाही तर जगभर प्रसिद्ध आहे. केवळ मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी स्वतःचे मोठे उद्योगविश्व निर्माण केले आहे. त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. भजी विकणारे धीरूभाई अंबानी उद्योग जगतातील बादशहा कसे बनले ते आज जाणून घेऊयात. धीरुभाई यांचे मूळ नाव धीरजलाल हिराचंद अंबानी असे आहे. २८ डिसेंबर … Read more

कोविड -१९ चा सामना करण्यासाठी ‘या’ राज्यांना पंतप्रधान केअर्स फंडकडून मिळणार ५० हजार व्हेंटिलेटर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पीएम केअर्स फंड ट्रस्टने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील कोविड रुग्णालयांना मेड इन इंडिया व्हेंटिलेटर पुरवण्यासाठी 2 हजार कोटी रुपयांचे वाटप केले आहे. पंतप्रधान कार्यालयाने मंगळवारी सांगितले की, प्रवासी कामगारांच्या कल्याणासाठीही यावेळी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या 50 हजार व्हेंटिलेटरपैकी 30 हजार व्हेंटिलेटर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या … Read more

गुजरातमध्ये ३०० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करण्यासाठी चीनी कंपनीचा अदानींशी करार 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या भारत आणि चीन या दोन्ही देशाच्या सीमेवर तणाव आहे. भारतातून चीनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. अशातच आता चीनी कंपनीने गुजरातमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अदानींशी करार केला आहे. या दोन्ही समूहातील प्रस्तावित समूहाचा भाग म्हणून ईस्ट होप समूहाकडून ३०० डॉलर पेक्षा जास्त गुंतवणूक अपेक्षित असल्याचे समोर आले आहे. चीनमधील ईस्ट … Read more

दिल्लीच्या आरोग्य मंत्र्यांना कोरोनाचे निदान 

नवी दिल्ली । देशातील कोरोना रुग्णांची संख्या साडेतीन लाखाच्यावर गेली आहे. आतापर्यंत प्रत्यक्ष या युद्धात सहभागी असणाऱ्या अनेकांना कोरोनाचे निदान झाल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, माजी विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनादेखील कोरोनाचे निदान झाल्याचे समोर आले आहे. देशातील काही मान्यवरांना कोरोनाचे निदान होत असताना आता दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन … Read more

लपाछपी खेळताना चिमुकल्याच्या डोक्यात अडकला कुकर; त्यानंतर डॉक्टरांना करावं लागलं ‘हे’ काम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसमुळे देशातील सर्व शैक्षणिक संस्था सध्या बंद आहेत. शैक्षणिक संस्था बंद असल्यामुळे मुलांना घराच्या चार भिंतीत राहण्यास भाग पाडले जात आहे. अशा परिस्थितीत मुले घरालाच शाळा, खेळाचे मैदान,उद्याने सर्वकाही समजत आहेत, मात्र बर्‍याच वेळा हि लहान मुले खेळता खेळता अशा काही करामती करून जातात ज्यामुळे त्यांचे आयुष्यच धोक्यात येते. अशीच एक … Read more

कोविड चाचण्यांत भाजपशासित राज्यांची कामगिरी वाईट;दिल्लीमध्ये होतायत सर्वाधिक चाचण्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी कोविडच्या तपासण्यांमध्ये दिल्ली हे राज्य खराब कामगिरी करत असल्याची टीका केली होती. मात्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार देशात सर्वाधिक चाचण्या करण्यामध्ये दिल्ली हे राज्य आघाडीवर असल्याचं चित्र समोर आलं आहे. दर दहा लाख लोकसंख्येमागे दिल्लीत सर्वाधिक ११ हजार १२४ तपासण्या होत असल्याचं चित्र … Read more

गुजरातमधील किटकनाशक कंपनीत भीषण स्फोट; ५ जण मृत्युमुखी

गुजरात, भरूच । गुजरातच्या भरुच जिल्ह्यातील दहेज स्पेशल इकॉनॉमिक झोन (SEZ) मधल्या एका किटकनाशक बनवणाऱ्या कंपनीत एक मोठा स्फोट झाला. या स्फोटात पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर जवळपास ३२ जण गंभीर जखमी झालेत. कंपनीत झालेल्या स्फोटामागचे कारण अजून समजू शकले नाही आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘यशस्वी रसायन प्रायव्हेट लिमिटेड’ या किटकनाशक बनवणाऱ्या कंपनीच्या … Read more