चंद्रपूरची 59 व्या महाराष्ट्र राज्य हिन्दी नाट्य स्पर्धेत बाजी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 59 व्या महाराष्ट्र राज्य हिंदी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत विदर्भाने बाजी मारली असून, चंद्रपूरच्या ‘हॅलो राधा मे रेहाना’ या नाटकाने निर्मितीच्या प्रथम पारितोषिकासह राज्यात अव्वल ठरण्याचा मान प्राप्त केला आहे. बेळगावच्या ‘भूमिका’ या नाटकाला द्वितीय तर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, चिंतामणनगर शाखेच्या ‘रूद्राली’ या नाटकाला तृतीय पारितोषिक मिळाले आहे. राज्याच्या सांस्कृतिक … Read more

खो-खो स्पर्धेच्या निकालावरून शिक्षकासह केंद्रप्रमुखाला मारहाण

जिल्ह्यातील बिटस्तरीय शालेय क्रिडा स्पर्धेअंतर्गत खोखो खेळादरम्यान निकालावरून झालेल्या वादात धामणगावामध्ये मास्तरासह केंद्रप्रमुखाला धारेवर धरीत मारहाण करण्यात आली. गोंडपिपरी तालुक्यात आज दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला.याप्रकारानंतर बराच काळ परिसरात गावक-यांनी गर्दी केली. शेवटी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आता पोलीस सरंक्षणात खेळ खेळविला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
       

चंद्रपूर जिल्ह्यात बोगस आश्रमशाळांचा सुळसुळाट; कारवाई करण्याची अभय मुनोत यांची मागणी

आश्रम शाळा कागदोपत्रीच असून बोगस विद्यार्थी हजेरी पटावर दाखवून शासनाकडून करोडो रुपयांचे अनुदान संस्थाचालक आणि समाज कल्याणचे अधिकारी संगनमत करून लाटत आहे असा खळबळजनक आरोप अभय मुनोत यांनी केला आहे.

नागरी वस्तीत आढळलं अस्वल, तब्बल ३ तासानंतर बेशुद्ध करण्यात वनविभागाला यश

शहरातील दुर्गापुर भागात घनदाट वस्तीत अस्वल आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे. ऊर्जानगर-कोंडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात रात्री आठच्या सुमारास ही अस्वल आढळल्यानंतर वनविभागाला याची माहिती देण्यात आली. अस्वलाच्या वावरा नंतर मोठ्या संख्येत बघ्यांची गर्दी जमली. गर्दीने घाबरलेल्या अस्वलाने शाळेच्या मागच्या भागात असलेल्या प्रसाधनगृहाच्या सांदीत आश्रय घेतला. वनविभागाच्या चमूने सुमारे ३ तास मेहनत घेत बेशुद्धीचे डार्ट मारून अस्वलाला बेशुद्ध केले.

चंद्रपूर जिल्हयात जुन्या वादातून तरुणानं केली ६० वर्षीय वृद्धाची हत्या

जुन्या वादातून युवकाने एका ६० वर्षीय वृद्धावर हल्ला करून ठार केल्याची घटना घडली भिवापूर वॉर्डातील माता नगरात रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. जोगिंदरसिंग टाक असे मृतकाचे नाव असून अक्षय मुळे असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

चंद्रपूर शहरालगत कोळसा खाण कर्मचारी वसाहतीत दिवसाढवळ्या अस्वलाचा धुमाकूळ

चंद्रपूर शहरातील कोळसा खाण वसाहत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या राहत्या घरांच्या आसपास अस्वलीचा संचार होत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरलं आहे. शहरालगतच्या वेस्टर्न कोल फिल्ड लिमिटेडच्या शक्तिनगर या कोळसा खाण कर्मचारी वसाहतीत दिवसाढवळ्या एक अस्वल धुमाकूळ घालत आहे.

अघोरी पूजेचा गावकऱ्यांनी केला भांडाफोड, एका युवतीसह २ जणांना अटक

चंद्रपूर शहरालगत असलेल्या जुनोना गावात काल रात्री पैशाचा पाऊस पाडण्यासाठी सुरु असलेल्या अघोरी पूजेचा गावकऱ्यांनी भांडाफोड केला. धक्कादायक म्हणजे गावातील पोलीस पाटीलांचे वडील नत्थू औरसे या सर्व प्रकाराला संचालित करताना आढळल्याने या घटनेने रात्रभर गावात खळबळ माजली आहे. या घटनेची माहिती बल्लारपूर पोलिसांना देण्यात आली.

चिमूर तालुक्यात रेती तस्करांवर महसूल विभागाची धडक कारवाई

चिमूर तालुक्यात रेती घाटाचा लिलाव होण्याआधीच रेती तस्कर रेती उत्खनन करून शासनाचा महसूल बुडवत आहेत. अशातच जिल्हाधिकारी यांनी रेती तस्करावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले.त्यानुसार तालुक्यातील अवैध वाळू वाहतूक बंद करण्यासाठी उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार चिमूर यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून पथक निर्माण केले.

लाखो रुपयांच्या अवैध दारूसाठ्यावर पोलिसांनी चालवला चक्क ‘बुलडोझर’

जिल्ह्यातील गोंडपिपरी पोलिसांनी लाखो रुपयांचा दारूसाठा बुलडोझर चालवत नष्ट केला. मागील तीन वर्षात केलेल्या कारवाईत हा दारूसाठा जप्त करण्यात आला होता. तो नष्ट करण्यासाठी पोलिसांनी या दारूसाठ्यावर थेट बुलडोझर चालवला. 

अल्पवयीन मुलीवर केले अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार

fe a f ac dfce

चंद्रपूर प्रतिनिधी  | सुरज घुमे   घरी एकटीच असलेल्या अल्पवयीन मुलीवर परिसरातील अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्याची घटना शनिवारी अष्टभूजा परिसरात घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली असून, अल्पयीन मलाला रामनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महाराष्ट्रातील ‘या’ जागेचा निकाल लागणार सर्वात आधी मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे वडील पोंभूर्णा येथे मजुरीसाठी गेले होते. तर आई शहरात कामानिमित्त आली … Read more