जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट; रुग्ण बरे होण्याचा दर पोहोचला 92% वर
जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज कोरोना बाधित रुग्णांमध्ये प्रचंड प्रमाणात घट झालेली दिसून आली आहे. गेल्या 100 दिवसांमधील सर्वात निचांकी रुग्ण संख्या आढळून आली आहे. आज दिवसभरात 76 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 51002 झाली. त्याच प्रमाणे 438 रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात सध्या 2622 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार … Read more