जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांमध्ये प्रचंड वाढ ; आज सर्वाधिक 870 रुग्णांची भर

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज नव्या सर्वाधिक 870 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या आता 21097 झाली आहे. त्याच प्रमाणे आज 566 रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात सध्या 5841 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत 14543 रूग्ण बरे झाले आहेत. तर जिल्ह्यात आज 13 मृत्यू झाले असून आतापर्यंत एकूण 713 रूग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आजची रुग्ण संख्या ही आतापर्यंतची सर्वोच्च संख्या ठरली आहे.

आज जिल्ह्यात झालेली रुग्ण वाढ पुढीलप्रमाणे –  जळगाव शहर 222, जळगाव ग्रामीण 74, भुसावळ 10, अमळनेर 44, चोपडा 84, पाचोरा 14, भडगाव 40, धरणगाव 71, यावल 25, एरंडोल 53, जामनेर 37, रावेर 86, पारोळा 37, चाळीसगाव 65, मुक्ताईनगर 3, बोदवड 05 अशी रुग्ण संख्या आहे.