महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांच्या तालुका कार्यकारणीची निवड

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ संलग्न पाथरी तालुका पत्रकार संघाच्या नुतन कार्यकारणीची निवड पाथरीतील शासकीय विश्रामगृहावर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश साळवे व मराठवाडा अध्यक्ष विजयकुमार कुलदिपके यांच्या उपस्थितीत करण्यात आली . शुक्रवार दि.3 जानेवारी रोजी आयोजीत कार्यकारणीच्या बैठकीमध्ये अध्यक्षस्थानी प्रकाश साळवे तर विजय कुलदिपके यांची प्रमुख उपस्थिती … Read more

सैन्य भरतीसाठी आलेल्या उमेदवारांवर फुटपाथवर झोपण्याची वेळ

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे परभणी येथे शुक्रवारी सैन्यभरती प्रक्रियेसाठी आलेल्या उमेदवारांची गैरसोय झाल्याने त्यांना फुटपाथवर झोपण्याची वेळ आल्याचे समोर आले आहे. योग्य नियोजन न झाल्याने हजारोंच्या संख्येने इथे आलेल्या उमेदवारांची चांगलीच अडचण झाली आहे. पहील्याच दिवशी परिक्षार्थींना भर थंडीत अनेक समस्यांचा सामना करावा लागल्याने हजारो उमेदवारांची निराशा झाल्याचे पाहायला मिळाले. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा … Read more

परभणी जिल्हात धुक्याची चादर

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे परभणी जिल्हात अवकाळी पाऊस परिस्थितीने अधूनमधून पडत असलेल्या पावसाने काल सायंकाळपासून धुके पडत आहे. आज पहाटेपासून सकाळी नऊ वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यामध्ये धुक्याची चादर पसरली होती त्यामुळे जवळच दिसणेही दुरापास्त झालं होतं . आज पहाटे मात्र गुलाबी थंडी, दाट धुके असे मनमोहक वातावरण तयार झाल्याने नागरिकांनी गुलाबी थंडीचा आनंद घेतला.काल पासून … Read more

थंडीपासून संरक्षणासाठी चुलीसमोर बसलेल्या महिलेचा जळून दुर्दैवी मृत्यू

परभणी जिल्ह्यातील गारठून टाकणाऱ्या थंडीपासून संरक्षण करण्यासाठी घरातील चुलीसमोर बसलेल्या महिलेच्या साडीने अचानक पेट घेतल्याची दुर्दैवी घटना नववर्षाच्या सायंकाळी पाथरी तालुक्यात घडली. याघटनेत महिलेचा परभणीत उपचारा दरम्यान मृत्यु झाला आहे.

स्टेट बँकेच्या एटीएमला आग लावल्याचा सीसीटीव्ही फुटेजवरून खुलासा

रभणी येथे दोन दिवसापूर्वी राष्ट्रीयकृत बँकेच्या एटीएमला आग लागल्याची घटना घडली होती. ही आग अज्ञात व्यक्तीने लावल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले आहे, त्यामुळे या प्रकरणांमध्ये आता नवीन खुलासा झाला असून या खुलाशाने जिल्हाभर खळबळ उडाली आहे.

पाथरीमध्ये गोडावूनला आग लागल्याने भाजीपाला विक्रेत्याचं मोठं नुकसान

परभणी जिल्हयातील पाथरी तालुक्यात भाजीपाल्याच्या गोडावूनला अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेत गोडावुनमधील भाजीपाला, कॅरेट आणि इतर फर्नीचर जळून खाक झाल्याने गोडावूनचे मोठे नुकसान झाले आहे.

परभणी रेल्वे स्थानकात लागली भीषण आग, सलग दुसऱ्या दिवशी आगीचा प्रकार

परभणी येथील रेल्वे स्थानकाच्या जुन्या इमारतीत असणाऱ्या द्वितीय श्रेणी प्रतिक्षालयाला सायंकाळी पाचच्या दरम्यान मोठी आग लागल्याची घटना घडली. यामध्ये या हॉल मधील सर्व साहित्य जळून खाक झाल आहे. सलग दुसऱ्या दिवशी ही हा आगीचा प्रकार घडला आहे.

परभणी मध्ये ‘दिव्यांग क्रीडा’ स्पर्धांचे आयोजन

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग मुले आणि मुलींसाठी परभणी येथील समाज कल्याण कार्यालय आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आज परभणी येथे दिव्यांग स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी.पृथ्वीराज आणि जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा भावना नखाते यांच्या हस्ते शहरातील प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलनावर या स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले.

परभणी जिल्ह्यात गामपंचायती जोडल्या जाणार वेगवान इंटरनेटने

संपूर्ण राज्यात भारतनेट-महानेट प्रकल्प् महाराष्ट्र राज्य माहिती व तंत्रज्ञान महामंडळ, मुंबई यांच्यामार्फत राबविण्यांत येत असून या प्रकल्पा्द्वारे परभणी जिल्हाातील ४ तहसिल कार्यालये व त्यांअंतर्गत येणारे ४२८ ग्रामपंचायतींना ऑप्टीकल फायबर नेटवर्कने जोडले जाणार आहेत. ग्रामस्तवरावरील नागरिकांना डिजिटल सेवा देऊन त्यांना जगाशी जोडण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारव्दारे हा उपक्रम सुरु केला आहे.

‘पांगरा ढोणे’ गावात मतदारांना मनस्ताप; अपुऱ्या व्हीव्हीपॅटमुळे रात्री उशिरा पर्यंत चालले मतदान

जिल्ह्यात काल विधानसभेचे मतदान शांततेत मतदान पार पडले असून कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र पूर्णा तालुक्यातील पांगरा ढोणे येथील मतदारांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागल्याचे समोर आले आहे. काल सकाळी ७ ते संध्याकाळी ६ पर्यंत मतदान करण्याची वेळ होती. या गावात ८.३० पर्यंत मतदान चालू होते. या मतदान केंद्रामध्ये तब्बल ३००० मतदार असताना सुद्धा केवळ दोन व्हीव्हीपॅट वर काम चालू होते.