परभणीत उपमपौरांच्या घरावर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची धाड

सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून या दरम्यान होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. परभणीचे उपमहापौर माजू लाला यांच्या शाही मस्जिद येथील निवासस्थानी बुधवारी संध्याकाळच्या सुमारास निवडणूक विभागाच्या पथकाने धाड टाकली

परभणी जिल्ह्यात पोलिसांनी लाखो रुपयांच्या गुटख्याने भरलेला ट्रक पकडला

परभणी जिल्ह्यातील पाथरी शहरातील आठवड़ी बाजार परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत गुटख्याने भरलेला ट्रक पकडला. या कारवाईत लाखो रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. पाथरी पोलिसांनी पहाटे ४ च्या सुमारास ही कारवाई केली.

‘या’ गावात नेत्यांना, अधिकार्‍यांना गावबंदी, देशात बुलेट ट्रेन झाली पण आमच्या गावात रस्ता नाही असा आरोप

परभणी प्रतिनिधी | गोदाकाठच्या लोकांनी थडी उक्कडगाव येथे सात गावातील नागरिकांची महापंचयात आयोजित केली होती. या पंचायतीत सात गावातील शेकडो महिला व पुरुष उपस्थित होते. या महापंचायतीत गोदाकाठच्या गावांनी निवडणुकीवर संपूर्ण बहिष्कार टाकून मतदान न करण्याचे ठरवले आहे. तसेच शासकीय अधिकारी व राजकीय पदाधिकारी यांना गावबंदी करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. गोदाकाठच्या रस्ता दुरुस्तीसाठी सात … Read more

परभणी जिल्ह्यात शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात महायुतीच्या मित्रपक्षांनी केली घुसखोरी

परभणी प्रतिनिधी| गजानन घुंबरे परभणी जिल्ह्यामध्ये चारही विधानसभेच्या जागेसाठी राजकीय पक्षांकडून तिकीट वाटपामध्ये अनपेक्षित उलटापालट झाली असून जवळपास सर्वच मतदारसंघांमध्ये राजकीय बंडखोरांच्या ‘इंट्री’मुळे बहुरंगी निवडणूक लढती होणार आहेत. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात यावेळी महायुतीच्या मित्रपक्षांनी घुसखोरी केल्याने सेनेचे पाथरी आणि जिंतूर बालेकिल्ले मात्र लढती पूर्वीच ढासळले आहेत. महायुतीच्या जागा वाटपामुळे शिवसेनेची स्वतःच्या घरात चांगलीच गोची झाली आहे. … Read more

सेनेचे खासदार जाधव आणि भाजपा आमदार फड यांच्यात मनोमिलन

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे लोकसभा निवडणुकीत उघडपणे विरोधात काम केल्याने पाथरीचे आ. मोहन फडांवर कमालीचे नाराज झालेले परभणीचे खासदार संजय जाधव यांनी याचा वचपा विधानसभा निवडणुकीत काढणार असा इरादा कार्यकर्ता मेळाव्यात बोलून दाखवला होता. या जाहीर वक्तव्याला काही दिवस झाले नसुन आज दोघांत मनोमिलन बैठक झाल्याने खासदारांनी काढलेली तलवार खरचं म्यान केली काय असा … Read more

अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्याने दिला आत्महत्येचा इशारा

परभणी प्रतिनिधी। जिंतूर तालुक्यातील सावरगाव येथील एका शेतकऱ्याला पाझर तलावासाठी संपादीत केलेल्या जमिनीचा मोबदला मिळवण्यासाठी मागील १० वर्षांपासून संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे ‘मागील दोन वर्षांपासून जिल्हाधिकारी, भूसंपादन अधिकारी, उपविभागीय जलसंधारण अधिकारी यांच्या संगनमताने अडवणूक करत असल्याचे निवेदन भूसंपादन अधिकाऱ्यांच्या मार्फत दिनांक २८ सप्टेंबर रोजी संबंधित शेतकऱ्याने दिले असून मोबदला तत्काळ द्यावा अन्यथा आत्महत्या केल्याशिवाय … Read more

गंगाखेड येथे भाजपा पदाधिकाऱ्यांचे ‘आत्मक्लेश आंदोलन’

परभणी प्रतिनिधी । भाजपा च्या कोट्यातील जागा ‘शिवसेने’ला सोडल्याने गंगाखेड विधानसभेतील इच्छुक उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते कमालीचे नाराज झाले आहेत.  या नाराजीतून आज गंगाखेड येथे इच्छुक उमेदवार ,कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत ‘आत्मक्‍लेश आंदोलन’ केले आहे. परभणी जिल्ह्यामध्ये चारही विधानसभेच्या जागा कोणता पक्ष , कोणत्या उमेदवाराला देणार याविषयी प्रत्येक पक्षाकडून कमालीची गोपनीयता ठेवण्यात आली होती. … Read more

माहेरी आलेल्या विवाहित तरुणीची गळफास लावून आत्महत्या

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे जिल्हातील गोपेगाव येथे माहेरी आलेल्या विवाहित तरुणीने माहेरी वडीलांच्या राहत्या घरी रविवार दि.22 सप्टेबर रोजी दुपारी 12.30 वाजण्याच्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पाथरी तालुक्यातील गोपेगाव येथील मयत राजकन्या अवतसर (वय 20) अस मयत तरूणीच नाव आहे . गोपेगाव येथील महादेव आवतसर यांची मुलगी राजकन्या हिचा विवाह … Read more

परभणी जिल्ह्यात युवकाचे ‘सिनेस्टाईल अपहरण’

परभणी प्रतिनिधी। एक काळ्या रंगाची कार भरधाव वेगात येते, अचानक जोराचा ब्रेक मारल्या जातो, त्यामधून चार ते पाच धाडधिप्पाड युवक खाली उतरतात आणि अचानक एका युवकास बेदम मारहाण करत गाडीत टाकून क्षणार्धात ती काळी गाडी भरधाव वेगात निघून जाते. एका हिंदी चित्रपटात दाखवले जाणारे सिनेस्टाईल अपहरणनाट्य परभणी जिल्हातील सोनपेठ शहरात घडल्याची घटना शहरातल्या बस स्टँड … Read more

महापरीक्षा पोर्टलवर घेण्यात येणाऱ्या परीक्षेला विद्यार्थ्यांचा विरोध

परभणी प्रतिनिधी। महापरीक्षा पोर्टलवरील घेण्यात येणाऱ्या परीक्षेला विरोध करण्यासाठी परभणीत शेकडो परीक्षार्थी बुधवारी रस्त्यावर आले. त्यांनी शिवाजी महाविद्यालय ते जिल्हा कचेरीपर्यंत मोर्चा काढला. परीक्षा प्रक्रिया सुलभ व पारदर्शी व्हावी या उद्देशाने जिल्हा निवड समितीमार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा महापरीक्षा या पोर्टलच्या माध्यमातून घेण्यात येत आहेत. मात्र, त्यात सुसूत्रता नसल्याने उमेदवारांना नाहक त्रास सहन करावा लागत … Read more