लग्नानंतर प्रेम संबंधास नकार देणाऱ्या विवाहितेचा प्रियकराने केला निर्घृण खून

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे जिल्हातील रामपुरी शिवारातील उसाच्या फडामध्ये घडलेल्या खूनाचा उलगडा झाला असून, विवाहानंतर प्रेमसंबंधात नकार देणाऱ्या महिलेचा तिच्याच पूर्व प्रियकराने अत्यंत शांत डोक्याने खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. जिल्ह्यातील मानवत तालुक्यामध्ये उसाच्या फडामध्ये विवाहित महिलेच्या खूनाची घटना दि. ८ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली होती. अवघ्या आठ दिवसांमध्ये तिसऱ्या खुनाच्या घटनेने … Read more

बोर्डीकरांच्या ‘दहा हजारी’ साईदर्शनाने साई जन्मभूमीचा वाद पुन्हा पेटणार ?

जिंतूरच्या भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनी आज दहा हजार भाविकांसोबत पाथरी येथील साईबाबांचं दर्शन घेतलं असून यामुळे साईबाबा जन्मभूमीचा वाद पुन्हा पेटणार का? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जेव्हा शरद पवार एका सर्वसामान्य तरुणाच्या शेजारी येऊन बसतात;थक्क करणारा हा प्रसंग,नक्की पहा..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । साध्या एसटीच्या प्रवासात सुद्धा आपल्या शेजारच्या खाली सीटवर एखादी सुंदर मुलगी बसावी असं प्रत्येक तरुण मनोमनी इच्छा बाळगत असतो. काहींची ही इच्छा पूर्ण होते तर काहींना वयोवृद्ध व्यक्तीची प्रवासात साथ लाभते. मात्र, परभणीच्या एका सामान्य तरुणाला विमान प्रवासादरम्यान शेजारच्या सीटवर ज्या प्रवाशाची साथ लाभली तो क्षण हा तरुण कधीही विसरणार नाही. … Read more

मराठवाड्याला हक्काचे पाणी दिलं नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून संघर्ष करू! देवेंद्र फडणवीस

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे मराठवाड्याला हक्काचे पाणी द्या! तसे न केल्यास आम्ही रस्त्यावर उतरून संघर्ष करू, पण मराठवाड्याला त्यांच्या हक्काचे पाणी मिळवून देऊ. असा इशारा परभणीतील एका कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. परभणीमध्ये शुक्रवार दिनांक ७ जानेवारी रोजी संजीवनी कृषी महोत्सव राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. … Read more

धक्कादायक! मानवतमध्ये युवकाचा तिक्ष्ण हत्याराने निर्घृण खून करुन मृतदेह जाळला

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे मानवत तालुक्यातील ताडबोरगाव शिवारामध्ये युवकाचा निर्घृणपणे खून करुन मृतदेह जाळून टाकण्यात आल्याची खळबळजनक घटना गुरुवारी उघडकीस आली आहे. आठवडाभरा पुर्वी झालेल्या खुनाचा तपास पूर्ण लागला असताना आणखी एक गुन्हा घडल्याने पोलिसांसमोर तपासाचे आव्हान उभं राहील आहे. मानवत शहरातील तकीया मोहल्ला येथील रहिवासी वाहन चालक अख्तर जलील शाह (वय ३३ ) … Read more

परभणी मनपाच्या रिक्त जागेसाठी मतदानाला सुरुवात

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने रिकाम्या झालेल्या परभणी मनपाच्या एका जागेसाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. यावेळी सकाळपासून मतदानाला येणाऱ्यां नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद दिसत असून दुपारनंतर मतदार मोठ्या संख्येने मतदान करण्यासाठी येतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. परभणी महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १४ अ मधील नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने, या ठिकाणी … Read more

परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा पिकांना फटका; गहू, ज्वारीसोबत फळबागांचे लाखोंचे नुकसान

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे परभणी जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका बसला असून रविवारी संध्याकाळी झालेल्या पावसाने रब्बी पिकांसह व फळबागांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.शनिवार दि. १ फेब्रुवारीपासून जिल्ह्यातील हवामानामध्ये अचानक बदल होत ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. त्यातच रविवारी दिवसभर ऊन-सावल्यांचा खेळ राहिल्यानंतर सायंकाळच्या वेळी काळेकुट्ट ढग जमा होत संध्याकाळी ७ वाजेनंतर जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी … Read more

परभणीमधील सेलूत सूर्यनमस्कार शिबिर संपन्न

जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधून, आज परभणी जिल्ह्यातील सेलू येथे, सूर्यनमस्कार शिबिर आयोजित करण्यात आले. सेलू शहरातील श्रीराम कॉलनी मैदानावर शहरातील हजारो विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला.

धक्कादायक! मानवतमध्ये पत्नीच्या खुनाची फिर्याद देणारा पतीच निघाला मारेकरी

शेतात उसाला पाणी देण्यास गेलेल्या एका महिलेचा धारदार शस्त्राने वार करुन खुन करण्यात आल्याने दोन दिवसांपूर्वी मानवत तालूक्यात खळबळ उडाली होती. शेतात झालेल्या या खुनाने ८० च्या दशकात महाराष्ट्रात गाजलेल्या मानवत खून खटल्याची स्थानिकांना आठवण करून दिली. या संदर्भात मृत महिलेच्या पतीने खून झाल्याची मानवत पोलिसांत फिर्याद होती. दरम्यान, पोलिसांच्या तपासात फिर्यादी पतीच पत्नीचा मारेकरी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

परभणी जि.प.च्या विषय समिती सभापतीपदावरही महाविकास आघाडीचा ताबा

राज्यातील सत्तेमध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वीरित्या राबविल्यानंतर, परभणी जिल्हा परिषदेमध्ये ही घटक पक्षांनी सत्ता ताब्यात घेत, काही दिवसांपूर्वी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद राष्ट्रवादीने काँग्रेसने बिनविरोध मिळवले. त्यानंतर आता शुक्रवार दि. ३१ जानेवारी रोजी झालेल्या विषय समितीच्या सभापतीपद निवडीतही महाविकास आघाडीने ताबा मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषदेचे बांधकाम, अर्थ आणि पशुसंवर्धन असे तीन सभापती पदे मिळवली. तर घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला महिला आणि बालविकास सभापती पद देण्यात आल आहे.