पुण्याचा गणेशोत्सव यावर्षी पारंपरिक आणि साध्या पद्धतीने साजरा होणार

पुणे । गणेशोत्सव तसा महाराष्ट्रात सर्वत्र उत्साहाने साजरा होणारा उत्सव आहे. पुण्याचा गणेशोत्सव पाहण्यासाठी देशभरातून भाविक येत असतात. गणेशोत्सवातील पुण्याचा झगमगाट न्याराच असतो. मात्र यंदा कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे देशभरात प्रसिद्ध असणारा पुण्याचा ऐतिहासिक गणेशोत्सव पारंपरिक आणि साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सव मंडळांची ऑनलाईन बैठक घेण्यात आली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात … Read more

कोरोना पार्श्वभुमीवर पुण्याच्या महापौरांनी राज्य सरकारकडे केली ‘ही’ महत्वाची मागणी

पुणे । देशभरात कोरोना बाधितांची संख्या वाढते आहे. तुलनेने महाराष्ट्रातील रुग्ण अधिक वाढत आहेत. त्यातही पुणे, मुंबई या दोन शहरातील रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे यंत्रणेवरचा ताण वाढतो आहे. पुणे शहरात रोज मोठ्या प्रमाणात स्वॅब तपासणीसाठी घेतले जात आहेत. मात्र वाढत्या चाचण्यांमुळे स्वॅब तपासणीचे अहवाल उशीरा येत आहेत. म्हणून पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी राज्य … Read more

कौतुकास्पद! मस्जिदीची जागा दिली कोरोना संशयित रुग्णांच्या अलगाव साठी

पुणे | दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. महाराष्ट्रातील रुग्णसंख्या दिवसागणिक वाढते आहे. पुणे, मुंबई या शहरांमध्ये अधिकाधिक रुग्ण सापडत आहेत. प्रशासन आपल्यापरीने संक्रमण आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या धर्तीवर भारतभर असंतोष वाढला होता. एक विशिष्ट जमात जाणीवपूर्वक हा आजार पसरवण्यासाठी कार्यरत असल्याच्या अफवा सर्वत्र पसरल्या होत्या. पण पुणे शहरात या सगळ्याच्या विरुद्ध … Read more

CRPF च्या जवानांची तुकडी पुण्यात दाखल; ‘या’ भागात काढला रुटमार्च

पुणे प्रतिनिधी | पुणे मनपा क्षेत्रातील एकुण कोरोना बाधितांची संख्या आता ३ हजार पार गेली अाहे. शहरात सद्यपरिस्थितीत एकुण ६९ परिसर कटेंनमेंट झोन म्हणुन प्रशासनाने घोषित केले आहेत. या भागात नागरिकांना बाहेर पडण्यास मज्जाव असतानाही अनेक नागरिक रस्त्यावर उतरत आहेत. यामुळे आता रॅपिड अॅक्शन फोर्सच्या तुकडीला तैनात करण्यात आले असून आज त्यांनी शहरातील सहकारनगर, धनकवडी, … Read more

गुड न्यूज ! ‘कोरोना अँटिबॉडीचा’ शोध लावणारी पहिली टेस्ट किट पुण्यात तयार

पुणे | गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून भारत कोरोना व्हायरस या विषाणूजन्य आजाराशी दोन हात करत आहे. मात्र कोरोना रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अस असताना एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीने पहिली स्वदेशी कोरोना अँटिबॉडी किट तयार केली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी ही माहिती दिली आहे. … Read more

पुणे अग्निशमन दलातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

पुणे । महाराष्ट्रातील कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या पुण्यातील परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. पोलीस कर्मचारी, वैद्यकीय कमर्चारी यांना कोरोनाची लागण झाल्याच्या घटना समोर आल्यांनतर आता अग्निशमन दलातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त समोर आले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार पुणे अग्निशमन दलात चालक म्हणून कार्यरत असणाऱ्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. पुणे … Read more

रोहित पवारांच्या प्रयत्नांना यश; पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन आज पहिली बस होणार रवाना

पुणे प्रतिनिधी | लाॅकडाउनमुळे राज्यातील विविध भागांत अनेकजण अडकून पडले आहेत. अशांसाठी एसटी बस ची सुविधा करण्यात येणार असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी दिली होती. त्यानुसार आज पुण्यातून विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी पहिली बस नगरला जाणार आहे. या निर्णयामुळे पुण्यात अडकून पडलेल्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांची चिंता मिटली आहे. एमपीएससी स्टुडंट्स राईट्स चे … Read more

पुण्यातील रिक्षाचालकांच्या मदतीसाठी ‘युवा स्पंदन’चा पुढाकार

पुण्यातील रिक्षाचालकांच्या मदतीसाठी युवा स्पंदनने पुढाकार घेतला आहे.

यंदाची पंढरीची आषाढी ‘वारी’ चुकणार?

पुणे  । कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं लोकांच्या सार्वजनिक सण-समारंभ, उत्सव साजरे करण्यावर निर्बंध आले. लॉकडाउनच्या काळात गुढीपाडवा, रमजान सारखे सण घरात बसून साजरे करण्याची वेळ आली. कोरोनाच्या संसर्गावर अजूनही नियंत्रण मिळवता आलं नाही आहे. अशातच लॉकडाउनचा तिसरा टप्पा सुरू झाला. मात्र अजूनही पुढे काय होणार यावर अनिश्चितता आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून ओळख असलेल्या पंढपूरच्या विठुरायाची आषाढी … Read more

दिलासादायक! पुणे विभागातील 558 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

पुणे  प्रतिनिधी । पुणे विभागातील 558 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 हजार 364 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 681 आहेत. विभागात कोरोनाबाधित एकूण 125 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 86 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली. … Read more