राहुल गांधींनी शेतकऱ्यांच्या जमिनी खाल्ल्या – स्मृती इराणी

”काँग्रेस चे राहुल गांधी म्हणतात त्यांना शेतकऱ्यांची चिंता आहे. मात्र अमेठी मध्ये जाऊन शेतकऱ्यांना विचारा.राहुल गांधींनी तिथल्या शेतकऱ्यांच्या जमिनी खाल्या” अशी घणाघाती टीका केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री आणि ‘भाजपा’च्या स्टार प्रचारक स्मृती इराणी यांनी केली आहे. श्रीगोंदा येथे बबनराव पाचपुते यांच्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या. यावेळी खासदार सुजय विखे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

कार्यकर्त्यासारखा झटणारा फक्त एकच ‘सत्यजित’ – धैर्यशील माने

‘दिवसातले २४ तास घरचा तसेच कोणताही विचार न करता उपलब्ध असणारा तसेच २८८ पैकी एवढा झटणारा आमदार जर कोण असेल तर तो सत्यजित पाटील आहे’ असे वक्तव्य हातकणंगले आणि शिवसेनेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनी केले आहे.

२०२१ पर्यंत राज्यातील एकही व्यक्ती बेघर राहणार नाही – मुख्यमंत्री

”२०२१ पर्यंत राज्यातील एकही व्यक्ती बेघर राहणार नाही. प्रत्येकाला सरकारच्या माध्यमातून घर बांधुन देऊन त्याला सर्व सुविधा देणार” असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. शिराळा विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या भाजपाचे उमेदवार शिवाजीराव नाईक यांच्या प्रचारार्थ काल वाळवा तालुक्यातील कामेरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी आयोजित जाहीर प्रचार सभेत बोलत होते.

निवडणूक आयोगाने घातली एक्झिट पोलवर बंदी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाने मंगळवारी एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. २१ ऑक्टोबर रोजी, महाराष्ट्र व हरियाणा या दोन्ही राज्यांमधील विधानसभा निवडणुकांसह १७ राज्यांमधील ५१ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकांसाठी तसेच, महाराष्ट्रातील सातारा व बिहारमधील समस्तीपुर येथील लोकसभेच्या जागेसाठी देखील मतदान होणार आहे. या दिवशी आयोगाकडून मतदानोत्तर कल दाखवणाऱ्या एक्झिट पोलवर बंदी घालण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांना प्रत्येक तालुक्यात सभा घ्यावी लागणं म्हणजे जनतेत भाजपबद्दल नाराजी आहे- शरद पवार

जनतेची भाजपाबद्दलची नाराजी मुख्यामंत्र्यांना कळाली आहे. त्यामुळं तर त्यांना प्रत्येक तालुक्यात सभा घ्यावी लागत आहे. असा टोला राष्ट्रवादीचे सेर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस लगावला. पवार राहुरी मतदारसंघात प्रचार सभेसाठी आले असता त्यांनी हे वक्तव्य केल.

प्रचाराच्या रणधुमाळीत ‘धीरज देशमुख’ रुग्णालयात!

निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपुत्र आणि लातूर ग्रामीण मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार धीरज देशमुख आजारी पडले आहेत. धीरज देशमुख यांना लातूरमधील रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आल्यामुळे सर्वच उमेदवार जोमाने प्रचार करत आहेत. प्रचाराची धावपळ आणि तब्येतीकडे झालेलं दुर्लक्ष धीरज देशमुख यांना महागात पडलं.

या निवडणुकीत काँग्रेस मुक्त महाराष्ट्र करा – स्मृति ईराणी

आपण सर्वजण दिवाळीच्या आगोदर घर स्वच्छ करतो त्याप्रमाणे येत्या विधानसभेला महाराष्ट्र काँग्रेसमुक्त करा. राष्ट्रवादीबद्दल मी बोलणार नाही कारण ”जिनका समय ही खराब हो वो दुसरों का क्या भला करेंगे’,क्योंकी उनकी घडी बंद पड चुकी है ”अशा शब्दात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती ईराणी यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीचा समाचार घेतला. सांगली विधानसभा निवडणुकीसाठीचे महायुतीचे उमेदवार सुधीर गाडगीळ यांच्या प्रचारार्थ मारुती चौक येथे घेण्यात आलेल्या जाहीरसभेत स्मृती ईराणी बोलत होत्या.

‘तुबची-बबलेश्वर’चे पाणी देणारच अन्यथा जतमध्ये पाऊल देखील ठेवणार – विश्वजीत कदम

काँग्रेस  ही संकल्पना काँग्रेस उमेदवार विक्रम सावंत यांची असून या योजनेमुळे जतला पाणी मिळणार आहे. जतकरांना जर का हे पाणी मिळाले नाही तर मी जतमध्ये पाऊल देखील ठेवणार नसल्याचा निर्वाळा पलूस-कडेगाव मतदारसंघाचे आमदार विश्वजीत कदम यांनी केला. येत्या जानेवारीत आम्ही दोन कारखान्यांचे काम सुरू करणार असल्याचे हे त्यांनी यावेळी सांगितले. ते काँग्रेसचे उमेदवार विक्रमसिंह सावंत यांच्या प्रचारार्थ बनाळी, शेगाव व कुंभारी येथील जाहीर सभेत बोलत होते.

भारताला हिंदू राष्ट्र बनू देणार नाही; ओवेसींचे भागवत यांना आव्हान

भारतात अनेक जाती धर्माचे लोक राहतात. एका जाती धर्माचा हा देश नाही. भारत कधीही हिंदू राष्ट्र नव्हता आणि कधीही बनणार नाही. भारलाता हिंदू राष्ट्र बनू देणार नाही असे आव्हान एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदूद्दीन ओवेसी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना यांना दिले.

कागलमध्ये राजकीय वातावरण तापलं; नेत्यांच्या सभा, कार्यकर्त्यांच्या ‘फिल्डिंग’ला वेग

राज्याचे राजकीय विद्यापीठ म्हणून ओळख असलेल्या ‘कागल’चे राजकिय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. हसन मुश्रीफ गट, संजय घाटगे गट, मंडलिक गट, समरजित घाटगे गट यांच्यामध्ये चांगलेच राजकारण व रस्सीखेच दिसत आहे. राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाकडून हसन मुश्रीफ यांनी सहाव्यांदा विधानसभेसाठी अर्ज भरला आहे. मुश्रीफांना दुसरी हट्रिक करण्याची संधी पुन्हा एकदा मिळणार असल्याची चर्चा सध्या जोरदार या विधानसभा मतदार संघात ऐकायला मिळत आहे.