मी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा शब्द दिला असून मार्चमध्ये कर्जमुक्ती होणार- मुख्यमंत्री ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागच्या वर्षी राज्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठं आर्थिक नुकसान केलं. दरम्यान, राज्यात निवडणूक पार पडल्या आणि मोठ्या सत्तासंघर्षानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झालं. सरकार स्थापन झालेल्यानंतर सरकारने शेतकऱ्यांचे २ लाखांपर्यन्तचे कर्जमाफी जाहीर केली. दरम्यान, या कर्जमाफीनंतर विरोधाकांकडून टीका झाली. मात्र, सामना या शिवसेनेच्या मुखपत्राचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत … Read more

शेलार जर बाप काढत असतील तर आम्ही गुजरातमध्ये जाऊन बापाचा शोध घेणाऱ्यातले नाही- जितेंद्र आव्हाड

महाराष्ट्रात सीएए  लागू होऊ देणार नाही, अशी भूमिका राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भूमिकेवर सीएए लागू न करायला मुख्यमंत्र्यांच्या बापाचं राज्य आहे का? अशी जळजळीत टीका भाजपचे नेते आशीष शेलार यांनी केली आहे. नालासोपारा येथील एका कार्यक्रमात शेलार यांनी शेलार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केलेल्या विधानावरून नवा राजकीय आता वाद निर्माण झाला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ३ दिवसीय महाबळेश्वर दौऱ्यावर; कुटुंबासाठी घेतली ३ दिवसांची सुट्टी

आधी शिवसेनेचा भाजपसोबत मुख्यमंत्रीपदावरून वाद, या वादात आरोप-प्रत्यारोपांना समोर जाणे, नंतर भाजपशी युती तुटणे, नवी सत्तासमीकरण जुळवत सत्तेत नव्या सहकाऱ्यांसोबत बसतांना झालेली दमछाक, दरम्यानच्या पत्रकार परिषदा, राज्यातील ओल्या दुष्काळ पाहणीचे दौरे असा प्रवास करत अखेर उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्रीपदी आरूढ झाले.

राज्यात १२२ शिवभोजन केंद्रे सुरु; पहिल्याच दिवशी ११,४१७ जणांनी घेतला शिवभोजनाचा आस्वाद

महाविकास आघाडी सरकारच्या महत्वाकांक्षी शिवभोजन योजनेचा प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत शुभारंभ करण्यात आला. शुभारंभाच्या पहिल्याच दिवशी या योजनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आतापर्यंत राज्यात १२२ शिवभोजन केंद्रे सुरु करण्यात आली असून केवळ १० रुपयात मिळणाऱ्या शिवथाळीचा राज्यातील ११ हजार ४१७ नागरिकांनी आस्वाद घेतला. याबाबतची माहिती माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राह‍क संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ‘अयोध्या’वारीचा दिवस ठरला! या दिवशी करणार प्रयाण

काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते खासदार संदय राऊत यांनी ‘राज्य सरकारचे १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर उद्धव ठाकरे अयोध्येत जातील, ट्विटरवरून माहिती दिली होती. त्यानुसार अयोध्या दौऱ्याचा संपूर्ण कार्यक्रम ठरला असून येत्या ७ मार्चला मुख्यमंत्री ठाकरे अयोध्येला जाणार आहेत. अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी २४ नोव्हेंबर २०१८ रोजी आपल्या पत्नी रश्मी ठाकरे आणि सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्यासोबत अयोध्या दौरा केला होता. त्यानंतर २४ नोव्हेंबर २०१९ रोजी होणारा त्यांचा प्रस्तावित दौरा रद्द करण्यात आला होता. सुरक्षेच्या कारणास्तव हा दौरा रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं.

जेव्हा मुख्यमंत्री तहसीलदारासाठी खुर्ची सोडतात; वाचा नेमकं काय घडलं..

मात्र, सर्व या समजांना आज खुद्द राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फाटा देत वेगळे उदाहरण निर्माण करून लोकांना आश्चर्याचा धक्का दिला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अंबाबाई चरणी लिन

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज करवीरनिवासिनी श्री अंबाबाई देवीचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच अंबाबाईच्या दर्शनाला आले होते. यावेळी अंबाबाईची विधीवत ओटी भरून त्यांनी मनोभावे पूजा केली. यावेळी त्यांच्यासोबत आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार धैर्यशील माने यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘माझं घड्याळाचं दुकान नाही मात्र घड्याळवाले माझे पार्टनर आहेत’- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज बारामती दौऱ्यावर आहेत. गुरूवारी बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात अ‍ॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि कृषी विकास केंद्र बारामती यांच्यातर्फे माळेगाव येथे भरविण्यात आलेल्या ‘कृषिक २०२०’ या प्रदर्शनाचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते झाले. या उदघाटनावेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, कृषिमंत्री दादा भुसे, प्रसिद्ध अभिनेते आमीर खान पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसायमंत्री सुनील केदार आणि बारामती कृषी विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र पवार या वेळी उपस्थित होते.

साईबाबा जन्मस्थळ पाथरीसाठी विकास निधी उपलब्ध करुन देणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शिर्डी येथील साईबाबांचे जन्मस्थळ असलेल्या पाथरीचा विकास करण्यासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत निधी उपलब्ध करुन देणार असून परभणी जिल्ह्यातील विविध समस्या,अडचणी लोकप्रतिनिधी व शासनाच्या समन्वयाने चर्चेतून सोडविण्यात येतील अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. मुख्यमंत्री ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून औरंगाबाद येथे आयोजित परभणी जिल्ह्यातील विविध समस्या तसेच अडचणीबाबत जिल्हास्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा! दोन लाखांवरच्या कर्जधारकांसाठी वेगळी योजना आणू

अवकाळी पावसामुळं नुकसान झालेल्या दोन लाखांवरच्या कर्जधारकांसाठी नवीन योजना आणू’ अशी माहिती त्यांनी माध्यमांशी बोलतांना दिली. महाविकासआघाडी सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते.