ऊस दर नियंत्रण मंडळाची बैठक रद्द करा! राजू शेट्टींची मुख्य सचिवांना पत्राद्वारे मागणी

कोल्हापूर ।  ऊस दर नियंत्रण मंडळाची बैठक उद्या शुक्रवारी घेण्याचा निर्णय अधिकार्‍यांनी घेतला असून ती रद्द करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. मंडळावर अशासकीय सदस्यांची नेमणूक झाल्यानंतरच ही बैठक व्हावी, असेही शेट्टी यांनी पत्रात सुचवले आहे. राजू शेट्टी यांनी अजोय मेहता यांना पत्र … Read more

राजू शेट्टींचं आंदोलन म्हणजे मॅच फिक्सिंगप्रमाणे दूध फिक्सिंगचं आंदोलन- सदाभाऊ खोत

सांगली । दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. दरम्यान, राजू शेट्टी यांनी पुकारलेल्या आंदोलनावर सदाभाऊ खोत यांनी टीकास्त्र सोडलं आहे. राजू शेट्टी यांच आंदोलन म्हणजे मॅच फिक्सिंगप्रमाणे दूध फिक्सिंगचं आंदोलन असल्याची टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे. सरकारने त्यांना चर्चेसाठी ज्या दिवशी बोलावलं आहे त्याच दिवशी ते आंदोलन करत … Read more

दूध दरवाढ मिळावी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे २१ जुलैला राजव्यापी आंदोलन

कोल्हापूर । दूध उत्पादक शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. दूध दर वाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने २१ जुलै रोजी राज्यव्यापी दूध संकलन बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाची घोषणा राजू शेट्टी यांनी केली. दरम्यान कोरोना व्हायरसचा वाढत फैलाव पाहता सर्व नियमांचे पालन करून हे आंदोलन पुकारण्यात … Read more

शेतकऱ्यांचा नेता म्हणवून घेणारे आमदारकी मिळणार असल्याचं कळताच शांत; चंद्रकांतदादांचा राजू शेट्टींना टोला

मुंबई । शेतकऱ्यांचा नेता म्हणवून घेणारे आज आमदारकी मिळणार असे समजताच शांत बसले आहेत, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावर तोफ डागली आहे. राज्यातील दूध दराचा मुद्दा अधोरेखित करत त्याच धर्तीवर राजू शेट्टी यांच्याकडून मात्र कोणतीही भूमिका घेतली जात नसल्याच्या मुद्द्यावरुन त्यांच्यावर तोफ डागली. राज्यात सध्या दुधाला … Read more

राजू शेट्टींचा विधानपरिषदेचा मार्ग मोकळा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील अंतर्गत वाद मिटला

कोल्हापूर । राज्यपाल नियुक्त जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या कोट्यातून माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना विधानपरिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, विधानपरिषदेच्या सदस्य निवडीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील अंतर्गत वाद अखेर शुक्रवारी रात्री उशिरा  आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन बैठक घेतली आणि आपला वाद मिटवला. ‘आपण एक’ असल्याचं म्हणत यांचा फोटो व्हायरल … Read more

तर मग ही विधान परिषदेची ब्याद नकोच; राजू शेट्टींनी ऑफर नाकारली

कोल्हापूर । राज्यपाल कोट्यातून मिळणाऱ्या विधान परिषद जागेवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी भलतेच कोंडीत सापडल्याचे दिसत आहेत. एकीकडे दुरावलेल्या विरोधकांनी चालवलेले टीकेचे प्रहार आणि स्वकीयांनीच केलेले घाव, यामुळे राजू शेट्टी व्यथित झाले आहेत. त्यातून त्यांनी गुरुवारी विधान परिषदेची ब्यादच नको, असे म्हणत यावर चर्चा करायचे नाही असे स्पष्ट केले आहे. विधान परिषदेच्या एका … Read more

राजू शेट्टींनी स्वीकारली शरद पवारांची ऑफर; राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधान परिषदेवर जाणार

पुणे । राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर जाण्याची ऑफर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी स्वीकारली आहे. शेट्टी यांनी आज बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत शेट्टी यांनी राष्ट्रवादीकडून विधान परिषेदत प्रतिनिधित्व करण्यास होकार कळवला आहे. शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंद बाग या निवासस्थानी शेट्टी … Read more

राजू शेट्टींना राष्ट्रवादीने दिली विधानपरिषदेच्या आमदारकीची ऑफर

कोल्हापूर । राज्यात मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेच्या आमदारकीची ऑफर देण्यात आली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा निरोप घेऊन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राजू शेट्टी यांना विधानपरिषदेच्या आमदारकीची ऑफर दिली असल्याचे समजत आहे. जयंत पाटील … Read more

१४ एप्रिलनंतर ग्रामीण भागातील लॉकडाउन सरकारने उठवावा- राजू शेट्टी

कोल्हापूर । करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशासह राज्यात २१ दिवसांचा लॉकडाउन लागू आहे. याचबरोबर कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद आहेत. जीवनाश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहन वगळता राज्यात जिल्ह्यांतर्गत वाहतूक पूर्णपणे बंद आहे. येत्या १४ एप्रिलला घोषित केलेला २१ दिवसांचा लॉकडाउन संपणार आहे. मात्र, राज्यातील कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता प्रशासन आणखी … Read more

बाहेरच्या राज्यातून येणारे दूध सीमेवरती आडवा; राजू शेट्टी यांची मागणी

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर सध्या राज्याच्या सीमा पोलिसांनी बंद केल्या आहेत तेव्हा गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक या राज्यातून येणारे दुधाचे टँकर सीमेवरच अडवण्याचे आदेश पोलिसांना द्यावेत अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलीय. जेणेकरून अतिरिक्त दूध खरेदीचा राज्य सरकार वरती बोजा कमी होईल असं राजू शेट्टी आणि म्हटले आहे. … Read more