लॉकडाऊनचा ५ वा टप्पा लागू होणार का? केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

मुंबई । देशात कोरोनाचा संसर्ग अजूनही आटोक्यात येताना दिसत नाही आहे. त्यातच आता लॉकडाऊनचा चौथा टप्पाही संपुष्टात येतो आहे. त्यामुळे, देशात लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. अशा वेळी केंद्रीय गृह मंत्रालयानं यावर स्पष्टीकरण दिलं आहे. काही प्रसार माध्यम संस्थांकडून लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याबद्दल वेगवेगळे दावे केले जात आहेत. प्रसार माध्यमातून केले जाणारे लॉकडाऊन ५.० बद्दलचे … Read more

लॉकडाऊनचा नियम मोडू नये, म्हणून ‘या’ देशाचे पंतप्रधान आपल्या मरणासन्न आईला भेटू शकले नाहीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नेदरलँड्सचे पंतप्रधान मार्क रुट्टे यांनी जगभरातील सर्व नेत्यांसाठी एक उदाहरण ठेवले आहे. ज्याची सध्या सगळीकडे खूप चर्चा होते आहे. पीएम मार्क यांची आई गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होती आणि त्या जगणे शक्य नसल्याचे त्यांच्या डॉक्टरांनीही सांगितले होते. मात्र, कोरोनाव्हायरसमुळे देशात लागू असलेल्या लॉकडाउनमुळे मार्क यांना शेवटच्या क्षणीसुद्धा त्यांच्या आईला भेटता आले … Read more

मोठी बातमी! टी -२० विश्वचषक २०२२ मध्ये जाण्याची शक्यता

वृत्तसंस्था । आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या सर्व उच्चधिकाऱ्यांची आज टेलीकॉन्फरन्स वर मिटिंग झाली आहे. या मीटिंगमध्ये यावर्षी होणारा टी -२० विश्वचषक २०२२ मध्ये जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सर्वत्र असणाऱ्या कोरोनाच्या वातावरणामुळे जर या निर्णयाचे औपचारिकरण झाले तर येत्या काही महिन्यात सभासदांना त्यांची ब्लु प्रिंट पाठवता येणार आहे. गुरुवारी होणाऱ्या बोर्ड मीटिंगमध्ये विश्वचषक २०२२ मध्ये जाण्याची मोठ्या … Read more

लॉकडाऊनमध्ये सोन्याच्या आयातीत १०० % घट; जाणून घ्या काय होणार परिणाम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्याची आयात एप्रिलमध्ये सलग पाचव्या महिन्यात घटली आहे. कोविड -१९ च्या संसर्गामुळे सध्या सुरु असलेल्या जागतिक लॉकडाऊनमुळे ते १०० टक्क्यांनी घसरून २.८३ लाख डॉलरवर गेली. वित्त मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार एप्रिल २०१९ मध्ये ते ३९.७ अब्ज डॉलर्स इतके होते. सोन्याची आयात घसरल्याने देशाची व्यापारातील तूट कमी होण्यास मदत झाली. एप्रिलमध्ये देशाची व्यापारातील तूट … Read more

२० वर्षांच्या लॉकडाऊननंतर आपल्या मुलांना शोधण्यासाठी ‘या’ कासवाने केला ३७ हजार किमी प्रवास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कासव हा समुद्रात राहणारा एक भव्य प्राणी आहे. जलचरांमध्ये शांत प्राणी असणार्‍या कासवाच्या शिकारींमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वाढ झाली आहे. याच कासवांच्या संवर्धनाबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी २३ मे रोजी जागतिक टर्टल डे साजरा केला जातो. या दिवसाची थीमही दरवर्षी वेगळी असते. सर्वसाधारणपणे या दिवशी प्राणीप्रेमी हे हिरवे कपडे घालतात. जागतिक … Read more

गावाकडे जाण्याची मिळाली परवानगी पण हर्षवायुने गेला जीव

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे । लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या अनेकांचे हाल होत आहे. विशेष करून परप्रांतीय मजूरांचे अवस्था फारच बिकट आहे. अशा भीषण परिस्थितीत … अन गावाकडे जाण्यासाठी परवानगी मिळाली पण एका परप्रांतीय यंत्रमाग कामगाराला मृत्यूनेच कवटाळल्याची धक्कादायक घडली. उत्तर प्रदेशातील रामसखा सत्तन मौर्य असे या दुुर्दैवी परप्रांतीय यंत्रमाग कामगाराचे नाव आहे. या घटनेमुळे … Read more

दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर परभणीत जिल्ह्यातंर्गत बससेवा सुरू

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे राज्यभरात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे राज्य परिवहन मंडळाची बस सेवा बंद करण्यात आली होती. राज्यासह परभणी जिल्ह्यातही ही बस सेवा पूर्णपणे बंद केल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले. त्यावर आता जिल्हा अंतर्गत बस सेवा सुरू करण्याचे महामंडळाचे आदेश आल्यानंतर, आज सकाळपासून परभणी जिल्ह्यातील बससेवा सुरू करण्यात आली आहे. ज्यामध्ये जिंतूर , मानवत … Read more

लॉकडाऊन मुळे नोकरी गेली म्हणून लॉटरीचं तिकीट काढलं आणि बनला करोडपती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूने सध्या जगभर थैमान घातले आहे. कोरोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या लोकडाऊनमुळे अनेकांची नोकरी गेली आहे. अनेक मोठमोठ्या कंपन्याही लॉकडाऊन काळात बंद असल्याने त्याचा अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला आहे. मात्र अशात न्यूझीलंडमधील एका व्यक्तीला नोकरी गेल्याचा मोठा फायदा झाला आहे. हाताचे काम गेल्याने नैराश्यात गेलेल्या हॅमिल्टन शहरातील एकाने सहज लॉटरीचे तिकीट … Read more

लॉकडाऊनमध्ये अनुष्का शर्माच्या घरात घुसला डायनोसॉर; पहा व्हिडीओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जगभरात लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊनच्या काळात बहुतेक लोक आपापल्या घरातच कैद झालेले आहेत. या अशा लॉकडाऊनच्या काळात मात्र बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माच्या घरात ‘डायनासोर’ शिरला. या अभिनेत्रीने डायनासोरचा हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तो व्हिडिओ तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला. आता आपण विचार करत असाल की हे असे … Read more

अखेर ६० दिवसांनंतर सलमानने घेतली आई वडिलांची भेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊनच्या या दिवसांमध्ये, प्रत्येक व्यक्ती त्यांच्या घरातच कैद आहे. कोरोनाव्हायरसचा वाढता धोका लक्षात घेता सरकारने लॉकडाऊन निर्णय घेतला आहे. परंतु असेही काही लोक आहेत जे आपल्या घरापासून आणि कुटुंबापासून दूर आहेत. यामध्ये अभिनेता सलमान खान देखील आहे जो आपल्या आईवडिलांपासून दूर पनवेलमधील आपल्या फार्म हाऊसमध्ये राहतो आहे. सुमारे ६० दिवसानंतर, सलमान … Read more