लॉकडाऊनमध्ये सोन्याच्या आयातीत १०० % घट; जाणून घ्या काय होणार परिणाम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्याची आयात एप्रिलमध्ये सलग पाचव्या महिन्यात घटली आहे. कोविड -१९ च्या संसर्गामुळे सध्या सुरु असलेल्या जागतिक लॉकडाऊनमुळे ते १०० टक्क्यांनी घसरून २.८३ लाख डॉलरवर गेली. वित्त मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार एप्रिल २०१९ मध्ये ते ३९.७ अब्ज डॉलर्स इतके होते. सोन्याची आयात घसरल्याने देशाची व्यापारातील तूट कमी होण्यास मदत झाली. एप्रिलमध्ये देशाची व्यापारातील तूट ही ६.८ अब्ज डॉलर्स इतकी होती, जी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये १५.३३ अब्ज डॉलर्स होती. डिसेंबरपासून देशात सोन्याच्या आयातीत घट होते आहे. भारत हा जगातील दुसर्‍या क्रमांकाचा सोन्याची आयात करणारा देश आहे.

दरवर्षी ८०० ते ९०० टन सोन्याची आयात केली जाते
देशात दरवर्षी सुमारे ८०० ते ९०० टन सोन्याची आयात केली जाते. एप्रिलमध्ये देशातून रत्ने व दागिन्यांची निर्यात ९८.७४ टक्क्यांनी घसरून ३.६ करोड डॉलर्स इतकी राहिली. देशाची सोन्याची आयात आर्थिक वर्ष २०१९-२०२० मध्ये १४.२३ टक्क्यांनी घसरून २८.२ अब्ज डॉलरवर गेली आहे, जे कि २०१८-१९ मध्ये ३२.९१ डॉलर्स इतकी होती. सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या चालू खात्यातील तूटीवर मोठा ताण येणार आहे. चालू खात्यातील तूट म्हणजे देशातील परकीय भांडवलाच्या येण्या आणि जाण्यातील फरक.

मार्चमध्ये भारताने किती सोन्याची आयात केली ?
भारत सोन्याची आयात करणारा जगातील दुसर्‍या क्रमांकाचा देश आहे. मिळालेल्या माहितीनुसार मार्च महिन्यात केवळ २५ टन सोन्याची आयात करण्यात आली. गेल्या वर्षी याच काळात ते ९३.२५ टन होते.

सोन्याची किंमत ५३ हजारांपर्यंत पोहोचू शकते
तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की जागतिक परिस्थिती लक्षात घेता येत्या काही महिन्यांत सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५२,००० रुपयांपर्यंत पोहोचू शकेल. आंतरराष्ट्रीय बाजारात ही किंमत प्रति औंस २,००० डॉलरच्या पातळीवर पोहोचू शकते. मात्र, त्यात सुधारणाही दिसेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment