तुला कापू का? कोंबडी म्हणते नको नको.. पहा मजेशीर व्हिडीओ

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे गेल्या काही महिन्यापासून बर्ड फ्लूचे वारे जगभर पसरू लागले आहे. यातून मासांहार प्रेमीमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्याभरात बर्ड फ्लूने धुमाकूळ घातला असताना मजेशीर व्हिडोओ व्हायरल होत आहे. या कोंबडीच्या व्हिडीओत तुला कापू का? असं म्हणताच ही कोंबडी मात्र नको नको म्हणते आहे असे दृश्य दिसत आहे. राज्यात मराठवाडा, … Read more

अजब धाडस : मगरीला पकडून ग्रामस्थांनी चक्क खांद्यावरून नेले; पहा Video

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे वाळवा तालुक्यातील साटपेवाडी येथे ग्रामस्थांना कृष्णा नदीकाठी मगर आढळून आल्यानंतर अनुचित प्रकार व दुर्घटना टाळण्यासाठी ग्रामस्थ व युवकांनी अथक प्रयत्नांतून ही मगर पकडून वन विभागाकडे सुपूर्द केली. विशेष म्हणजे मगरीला पकडून ग्रामस्थांनी चक्क खांद्यावरून नेल्याने त्यांच्या धाडसाचं कौतुक होतंय. गट विकास अधिकारी शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच सुरेखा सच्चीदानंद साटपे, … Read more

रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा सख्या भावानेच केला खून; तलवार हातात घेऊन पाठलाग करत डोक्यात घातला दगड

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे कुपवाड शहरातील राणाप्रताप चौकात शनिवारी रात्री रेकॉर्डवरील गुन्हेगार सनी उर्फ शुभम परसमल जैन याचा सख्या भावाने डोक्यात दगड घालून निर्घृण खून केला. या प्रकरणी संशयितास कुपवाड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगार सन्या उर्फ शुभम जैन व त्याचा भाऊ शशांक यांच्यात घरगुती कारणातून वादावादी सुरू होती .सनीने चिडून घरातील तलवार … Read more

सांगलीत २९ साळुंख्या, २ मोर आणि ३ पारवे यांचा संशयास्पद मृत्यू

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे जिल्ह्यात 29 साळुंख्या 2 मोर आणि 3 पारवयांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या साळुंख्या नष्ट केल्या असून, नमुने तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत. मिरज तालुक्यातील सावली येथे 29 साळुंख्याचा मृत्यू झाला. याच गावातील 3 पारवाचा मृत्यू झाला. तर जत तालुक्यातील आवंडी येथील 2 मोरांचा मृत्यू झालाय. दरम्यान, अजून तपासणीचा … Read more

धक्कादायक !! सांगली येथील कोवीड सेंटरमधून दोन कैद्यांचे पलायन

prisoners

सांगली । सांगली शहर पोलीस ठाण्याकडील रेकॉर्डवरील कैदेत असणारे आरोपी राजू कोळी आणि रोहित जगदाळे या दोघांनी लठ्ठे एज्युकेशनच्या कोविड केअर सेंटरमधून खिडक्यांचे गज वाकवून पलायन केले. रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पळून गेलेले दोघेही आरोपी कोरोना बाधित आहेत. २३ ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास राजू कोळी … Read more