अजब धाडस : मगरीला पकडून ग्रामस्थांनी चक्क खांद्यावरून नेले; पहा Video

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे

वाळवा तालुक्यातील साटपेवाडी येथे ग्रामस्थांना कृष्णा नदीकाठी मगर आढळून आल्यानंतर अनुचित प्रकार व दुर्घटना टाळण्यासाठी ग्रामस्थ व युवकांनी अथक प्रयत्नांतून ही मगर पकडून वन विभागाकडे सुपूर्द केली. विशेष म्हणजे मगरीला पकडून ग्रामस्थांनी चक्क खांद्यावरून नेल्याने त्यांच्या धाडसाचं कौतुक होतंय. गट विकास अधिकारी शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच सुरेखा सच्चीदानंद साटपे, उपसरपंच अशोक सुभाष साटपे, ग्रामपंचायत सदस्य सुजाता साटपे,संध्याराणी सुर्वे,संगिता चव्हाण,सुनिता साटपे, ग्रामसेवक गजानन धस्के व धोंडीराम शेणेकर सर्व युवकांनी ही मगर वनविभागाकडे सुपूर्द केली.

कृष्णेच्या काठी मोठ्या प्रमाणावर अजस्त्र मगरीचे दर्शन होत असल्याने नदीकाठच्या गावांमध्ये दहशतीचे वातावरण पसरलेलं होत. सटपेवाडी येथे ग्रामस्थांना सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तब्बल दहा ते बारा फूट अजस्त्र मगरीचे दर्शन झाले. ग्रामस्थांनी आणि गावातील युवकांनी दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर मगरीला जेरबंद करून वनविभागाच्या हवाली केले.

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या मगरीला नैसर्गिक आदिवासात सोडून दिले. कृष्णेच्या काठी पुन्हा मगरींचा वावर वाढल्याने नागरिकांनी मगरीच्या नैसर्गिक आदिवासापासून दूर राहण्याचे आवाहन वनविभागाच्यावतीने यावेळी करण्यात आले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like