सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ बुधवारी देशव्यापी संप

केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ बुधवारी देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. यामध्ये जिल्ह्यातील पन्नास हजार कर्मचारी सहभागी होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर समन्वय समितीच्यावतीने देण्यात आली.

मंत्रीपदासाठी नव्हे, विकासकामांसाठी सरकारविरोधात संघर्ष करणार – अनिल बाबर यांची नाराजी उघड

मंत्रीपद न मिळाल्याने शिवसेना नेते अनिल बाबर नाराज आहेत. मी पक्षात राहूनच सरकारविरोधात संघर्ष करेन असा घरचा आहेरही त्यांनी सरकारला दिला आहे.

सात-बारा कोरासाठी ८ जानेवारीला महाराष्ट्र बंद, राजू शेट्टींचा इशारा

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. पण अद्याप ते पूर्ण झालेले नाही. राज्याने दिलेली कर्जमाफी तकलादू आहे. सरकार कुणाचेही असो शेतकऱ्यांचे प्रश्न सुटल्याशिवाय गप्प बसणार नाही. संपूर्ण कर्जमाफी, शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधासाठी ८ जानेवारीला महाराष्ट्र बंद ठेवण्यासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते … Read more

शरद पवारांमुळे अनिल बाबरांचे मंत्रिपद हुकले?

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे राज्याच्या मंत्रिमंडळावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा पगडा असून त्यांच्या सल्ल्यानेच शिवसेनेनेही आपले मंत्री ठरविल्यामुळे शिवसेनेत संतापाची लाट पसरली आहे. शरद पवार यांच्या हस्तक्षेपामुळेच राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या महत्वाच्या नेत्यांना मंत्रिपदे देण्यात आलेली नाहीत यामुळेच खानापूर-आटपाडीचे आ.अनिल बाबर यांचे मंत्रिपद हुकल्याचे विश्‍वासनीय वृत्त आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या … Read more

सांगली जिल्ह्यात घरफोड्या वाढल्याची पोलीस महानिरिक्षकांची कबुली

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यामध्ये घरफोड्यांच्या संख्येमध्ये वाढ निदर्शनास आली आहे. त्याच बरोबर काही पोलीस ठाण्यांच्या रेकॉर्डमध्ये देखील त्रुटी आढळून आल्याची कबुली कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ.सुहास वारके यांनी सांगलीत पत्रकारांशी बोलताना दिली. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

उद्योजक ‘डीएसके’ यांच्यासह पत्नी, मुलाला सांगली पोलिसांकडून अटक

गुंतवणूक रकमेला व्याज तसेच वस्तू खरेदीवर सवलतींचा वर्षाव करून सांगलीकरांना पावणेपाच कोटीचा गंडा घालणार्‍या उद्योजक दीपक कुलकर्णी उर्फ डीएसके यांच्यासह पत्नी व मुलाला सांगलीच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने आज अटक केली. सांगली शहर पोलिस ठाण्यात या तिघांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा आहे. अटक केलेल्यांमध्ये डिएसके, त्यांची पत्नी हेमंती व मुलगा शिरीष यांचा समावेश आहे.

शासनाच्या आदेशामुळे सांगली महापालिकेच्या कामांना ब्रेक, ठेकेदारांचे धाबे दणाणले

महापालिकेला राज्य शासनाकडून जो निधी देण्यात आला होता यातील ज्या कामांच्या वर्क ऑर्डर अद्याप दिल्या गेल्या नाहीत. त्या कामांना स्थगिती देण्याचे आदेश राज्य शासनाने आज काढले आहेत. महापलिकेच्या दलित वस्ती सुधार योजना, जिल्हा नियोजन समिती, रस्ते अनुदान यासह विशेष अनुदानातील सुमारे ३५ कोटींच्या कामांना आता ब्रेक लागला असून ठेकेदारांचे धाबे दणाणले आहेत.

पुतण्याने केला चुलत्याचा निर्घृण खून, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

जत तालुक्यातील जालीहाळ बुद्रुक येथे शेतजमिनीचा वादातून पुतण्यानीच चुलत्याचा दगडांनी ठेचून खून केल्याची खळबळ घटना आज उघडकीस आली आहे. या घटनेतील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. महादेव पुजारी असे खून झालेल्या व्यक्तीच नाव आहे.

जिल्हा बँक नोकरभरतीचा कारभार अपारदर्शक?

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने राबविलेली चारशे जागांसाठीची भरती प्रक्रिया पारदर्शीपणे पार पडलेली नाही. या प्रक्रियेमुळे अनेक उमेदवारांवर अन्याय झाला आहे. येत्या सात दिवसात बँकेने ही प्रक्रिया रद्द करावी. तसे न केल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा जिल्हा सुधार समितीचे अध्यक्ष अमित शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. याबाबत शिंदे म्हणाले, बँकेने ज्युनिअर अससिस्टंट … Read more

न्यायालय स्थलांतरविरोधात मिरजकर रस्त्यावर

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे मिरज न्यायालय सांगलीतील राजवाडा चौकातील जुन्या न्यायालयाच्या इमारतीत स्थलांतराला मिरजेतील राजकीय व सामाजिक संघटनांनी सर्व पक्षीय मिरज न्यायालय बचाव कृती समितीच्या माध्यमातून तीव्र विरोध करत महाराणा प्रताप चौकात बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. मिरज किल्ला भागामध्ये संस्थाकालिन इमारतीमध्ये न्यायालयाचा कारभार चालत असे. मिरज न्यायालयाची इमारत जीर्ण होऊन धोकादायक झाल्याच्या … Read more