संजय काकांकडून घराणेशाहीचा आरोप म्हणजे विनोद- विशाल पाटील

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे ‘लोकसभा निवडणुका होवून पाच महिने होत आले असले तरी खा. संजयकाका पाटील हे निवडणुकीमधून बाहेर आलेले नाहीत. तासगाव व कवठेमहांकाळ येथे बोलताना त्यांनी आमच्यावर घराणेशाहीचा आरोप केला. जे स्वत:च्या पत्नीला विधानसभेची उमेदवारी मागतात, ज्यांचे संपूर्ण राजकारण घराणेशाहीवर अवलंबून आहे, अनेक घराण्यांनी त्यांना मदत केलेली आहे असे असताना त्यांच्याकडून आमच्यावर होणारा … Read more

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा सांगलीमध्ये दाखल

सांगली प्रतिनिधी | मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा सांगलीमध्ये दाखल झालेली आहे. इस्लामपूर या ठिकाणी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी या महाजनादेश यात्रेचे जल्लोषात स्वागत केले आहे. जिल्ह्याच्या अनेक भागात ही जनादेश यात्रा जाणार असून यासाठी भाजपाकडून जय्यत तयारीही करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यभर सुरू असलेली मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आज सांगली जिल्ह्यात दाखल झालेली आहे. इस्लामपूर येथे … Read more

शिवसेनेकडून जिल्ह्यातील आठ विधानसभेसाठी मुलाखती

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि भाजपमध्ये नेत्यांचे प्रवेश सुरु आहेत, त्यामुळे दोन्ही पक्षांकडून स्वतंत्र लढण्याची तयारी सुरु केली असताना जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुकांच्या मुलाखती मंगळवारी मुंबईत पार पडल्या. मात्र या मुलाखतीसाठी शिवसेनेचे जिल्ह्यातील एकमेव आमदार अनिल बाबर यांनी दांडी मारल्याने आश्चर्य व्यक्त मुंबईतील शिवसेना भवनमध्ये समन्वयक विश्वनाथ नेरुळकर, खा. … Read more

राष्ट्रवादीचे नेते शरद लाड शिवसेनेच्या संपर्कात

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे राष्ट्रवादीचे युवा नेते व जिल्हा परिषद सदस्य शरद लाड शिवसेनेच्या संपर्कात आहेत. त्यांची सेनेच्या एका बड्या मंत्र्यांशी गोपनिय बैठक झाली असून प्राथमिक चर्चा केली आहे. पलूस-कडेगाव मतदारसंघ सेनेच्या वाट्याला येत असल्याने लाड हे सेनेमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. याबाबतचा निर्णय पुढील आठवड्यात होवू शकतो. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला पुन्हा … Read more

सांगली आणि जत मध्ये भाजपात बंडखोरी ?

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे  सत्ताधारी व विजयाची सर्वाधिक संधी म्हणून भाजपकडे इच्छुकांचा मोठा प्रवाह येत असून सांगली व जत मतदार संघात बलाढ्य इच्छुकांनी आपल्या मुलाखती दिल्यामुळे या ठिकाणी जोरदार चुरस निर्माण झाल्याचे चित्र आहे. या दोन्ही ठिकाणी बंडखोरी होण्याचे संकेत आतापासूनच प्राप्त होऊ लागले आहेत. आ.विलासराव जगताप यांच्या विरोधात सभापती तम्मनगौडा रवी, डॉ.रविंद्र आरळी … Read more

भाजप नगरसेविकेची पुरग्रस्तांना जबर मारहाण

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे सांगली जिल्ह्यात पूरग्रस्तांसाठी विविध स्वरूपात मदतीसह इतर काही जीवनावश्यक वस्तूंची मदत केली जात आहे. पण भाजपच्या नगरसेविका गीता सुतार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी यावेळी समोर आली. गीता सुतार यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी मराठा सेवा संघ येथील पूरग्रस्त निवारा केंद्र बंद पाडत निवारा केंद्रातील कार्यकर्त्यांना मारहाण केल्याची घटना घडली असून यामध्ये एक … Read more

दीड वर्षाच्या मुलीसह महिलेची विहीरीत उडी घेऊन आत्महत्या

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे तासगावात दीड वर्षाच्या मुलीला सोबत घेवून विवाहितेने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. राजनाह तांडा, विजापूर येथील कामानिमित्त तासगाव येथील साठेनगर येथे राहण्यास आलेल्या आरती राठोड या महिलेने दीड वर्षाच्या अंजली राठोड या मुलगीसह विहरीत उडी घेवून आत्महत्या केली. याबाबत तासगाव पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. विजापूर येथील सचिन वालू राठोड … Read more

महापूरामुळे बिघडलेला ट्रान्सफोर्मर दुरुस्त करणार्‍या वायरमचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे महापुराच्या तडाख्याने बंद पडलेला ट्रान्सफार्मरची दुरुस्ती करत असताना विजेचा धक्का बसल्याने वायरमनचा मृत्यू झाला. संजय बाळासाहेब जाकले असे मृत झालेल्या वायरमनचे नाव आहे. आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास दुधगाव येथे ही घटना घडली. याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. जाकले हे आपल्या पत्नी, मुलांसह खोची येथे राहत … Read more

आमदार नाईकांचा पत्ता कट, कॉग्रेसचे सत्यजित विधानसभेला

सांगली प्रतिनिधी | सकलेण मुलाणी शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांचे व काँग्रेसचे राज्य सरचिटणीस तथा जिल्हा परिषद सदस्य सत्यजित देशमुख यांचे सूत जुळणार आहे. येत्या विधानसभेला देशमुख यांना भाजपाची उमेदवारी देऊन आमदार नाईक यांना विधानपरिषद दिली जाणार असल्याच्या चर्चानी सध्या तालुक्यात खळबळ उडवून दिली आहे. या चर्चेमुळे भाजपातील व काँग्रेसमधील कार्यकर्त्यांची द्विधा अवस्था निदर्शनास येत … Read more

वाळू तस्कराला महिला तहसीलदाराने दिला चोप

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे  चोरटी वाळूतस्करी केली म्हणून ताब्यात घेतलेला वाळूचा ट्रक तहसील कार्यालयातून जबरदस्तीने पळवून नेण्याच्या प्रयत्नात असलेला वाळू चोरट्याला येथील तहसीलदार कल्पना ढवळे यांनी वाटेत अडवून चांगलाच चोप दिला. चित्रपटाला शोभेल असा थरारक प्रकार तासगावात सायंकाळी पाचच्या सुमारास घडला. तर याठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.  मणेराजुरी येथील मंडल अधिकाऱ्यांनी सकाळी शिरोळ … Read more