कावळ्यांना दररोज खायला घालणारे अनोखे ‘कावळे मामा’
बदलते हवामान, वाढते औद्योगिकरण आणि पर्यावरणाच्या होणाऱ्या ह्रासामुळे चिमण्या ,कावळे हे रोजच्या दिसण्यातले पक्षी सध्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. हिंदू संस्कृतीमध्ये अत्यंत महत्वाचे स्थान असलेल्या कावळ्याच्या प्रजातीदेखील यामध्ये नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र काळाचे आणि पर्यावरण संतुलनाचे महत्व ओळखून माढा येथील हाॅटेल चालक अर्जून भांगे यांनी कावळांच्या संवर्धऩासाठी एक पाऊल उचलेले आहे. ते गेल्या अनेक वर्षापासून दररोज सकाळी कावळ्यांना विविध प्रकारचे खाद्य देण्याचे काम करत आहेत. त्यांच्या नित्य नियमामुळे माढा परिसरात कावळ्यांची संख्या वाढली आहे.