मुंबईत काँग्रेसविरोधात भाजपचे आंदोलन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत काँग्रेसविरोधात भाजपच्या कार्यकर्त्यांनी पेगासस प्रकरणावरून मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरत आंदोलन केले. यावेळी पोलिसांची मात्र एकच धांदल उडाली. यावेळी पोलिसांनी दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांना पांगविण्याचा प्रयत्न केला आहे. भाजप नेते प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी प्रसाद लाड व पोलिसांमध्ये काहीवेळी वादावादी झाली. काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्याच्यावतीने … Read more

गॅस दरवाढी विरोधात सिलेंडर दारात ठेवून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अन किसान सभेचे आंदोलन

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे महागाईच्या विरोधात घरगुती सिलेंडर घराच्या दारात ठेवुन आज जिल्हाभर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेकडो महिला पुरुष सहभागी होउन या दरवाढीस विरोध दर्शविला. केंद्रात भाजप आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासुन घरगुती सिलेंडरच्या किंमती दुपटीपेक्षा जास्त झाल्या आहेत. 2014 साली 450 रुपयांना मिळणारा सिलेंडर आज 920 ला झाला आहे. शिवाय त्यावर मिळणारी … Read more

‘राज्य मागासवर्ग आयोगाचे सक्षमीकरणाच्या मागणीसाठी 22 डिसेंबरपासून आझाद मैदानात धरणे आंदोलन करणार’ – विक्रम ढोणे

मुंबई । राज्यातील मागास घटकांच्या भवितव्यात महत्वाची भुमिका असलेल्या राज्य मागासवर्ग आयोगाची सरकारच्या अनास्थेमुळे दुर्दशा झालेली आहे. निधी व मनुष्यबळाची कमतरता व अपात्र सदस्यांचा भरणा असल्यामुळे या आयोगाकडून दर्जेदार काम होणे अवघड आहे. यापार्श्वभुमीवर आयोगाचे सक्षमीकरण करण्याच्या मागणीसाठी 22 डिसेंबरपासून आझाद मैदान, मुंबई येथे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक … Read more

नुकसानग्रस्त द्राक्ष शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या, राष्ट्रविकास सेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

सांगली प्रतिनिधी । तीन दिवसांपूर्वी झालेल्या अवकळी पाऊसाने जिल्ह्यातील द्राक्ष शेती उध्वस्त झाली आहे. सदारच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी, तसेच शेतकऱ्यांचे थकीत कर्ज माफ करावे या मागणीसाठी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्र विकास सेनेने लाक्षणिक धरणे आंदोलन केले. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना देण्यात आले. सांगली जिल्ह्यात नोव्हेंबर … Read more