गॅस, पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात महिला राष्ट्रवादीचे आंदोलन

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे दिवसेंदिवस महागाई वाढत असून, नागरिकांचे आर्थिक बजट कोसळले आहे. दरवाढ कमी न केल्यास राष्ट्रवादीतर्फे तीव्र आंदोलनाचा इशारा जिल्हाध्यक्षा सुष्मिता जाधव यांनी जत येथे दिला. गॅस, पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात जतमध्ये शनिवारी महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हा उपाध्यक्षा मीनाक्षी अक्की यांची प्रमुख उपस्थिती होती. मीनाक्षी अक्की म्हणाल्या … Read more

फडणवीसांना नोटीस दिल्याच्या निषेधार्थ भाजपचे आंदोलन

सांगली प्रतिनिधी I प्रथमेश गोंधळे पोलीस भरतीतील फोन टॅपिंग प्रकरणावरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांना नोटीस बजावून त्यांच्या घरी चौकशीसाठी गेल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले. देवेंद्र फडणवीस यांच्या नोटीस प्रकरणावरून सांगलीत भाजपाने राज्य सरकारविरोधात आंदोलन केले आहे. यावेळी फडणवीस यांना बजावण्यात आलेल्या नोटिशीची प्रत फाडून निषेध करण्यात आला. भाजपाचे राज्य सरचिटणीस पृथ्वीराज पवार आणि … Read more

नगराध्यक्षांविरोधात नगरसेवकाचे अर्धनग्न आंदोलन

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे विकास कामांना व स्वच्छतेला खीळ घालण्याचे काम माजी उपनगराध्यक्ष उमेश सावंत हे करीत असून त्यांच्या विरोधात नगरसेवक लक्ष्मण उर्फ टिमू एडके यांनी मुंडन करत, अर्धनग्न होऊन एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. जत नगर परिषदेच्या वतीने कचरा उचलण्यासाठी ठेका देण्यात आला होता. त्या ठेक्याची मुदत संपल्यानंतर तो ठेका रद्द करावा म्हणून … Read more

शेतीला दहा तास वीज देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानीचे आठ ठिकाणी चक्काजाम आंदोलन

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे शेतीसाठी दहा तास दिवसा वीज द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्ह्यातील आठ ठिकाणी आज चक्का जाम आंदोलन केले. विटा, इस्लामपूर, पलूस, कडेगाव, शिराळा, सांगली लक्ष्मी फाटा, भोसे फाटा, कवठेमहांकाळ या ठिकाणी बारा वाजता रास्ता रोको आंदोलन झाले. माजी खासदार राजू शेट्टी यांचे कोल्हापूर येथे बेमुदत ठिय्या आंदोलनास सुरू आहे. … Read more

“सरकारने मंत्री नवाब मलिकांचा तातडीने राजीनामा घ्यावा, अन्यथा भाजप राज्यभर आंदोलन करणार” : नीताताई केळकर

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे महाविकास आघाडी सरकारमधील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने अटक केली आहे. याबाबतचा गंभीर विचार करून राज्य सरकारने मालिकांचा तात्काळ राजीनामा घ्यावा तसेच महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या भ्रष्टाचारासह अन्य विषयांकडे लक्ष वेधण्यासाठी भाजपच्या वतीने राज्यभर आंदोलन केले जाणार असल्याची माहिती प्रदेश कार्यकारणी सदस्य नीताताई केळकर यांनी बुधवारी … Read more

नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपचे आंदोलन

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश परब मनी लॉडरींग प्रकरणात ईडीने अटक केलेल्या अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा म्हणून सांगली शहर जिल्हा भारतीय जनता पार्टीने मारुती चौकात तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व आमदार सुधीरदादा गाडगीळ व भाजप प्रदेश सचिव पृथ्वीराज भैया पवार यांनी केले. यावेळी 1993 साली मुंबई बॉम्बस्फोटां मध्ये मृत्यू पावलेल्या नागरिकांना … Read more

नवाब मलिकांच्या अटकेच्या निषेधार्थ मविआचे आंदोलन

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश परब राज्याचे अल्पसंख्यांक नवाब मलिक यांच्यावर ईडीच्या माध्यमातून कारवाई करत अटक केल्याच्या निषेधार्थ कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना महाविकास आघाडी सरकारच्या वतीने येथील गांधी पुतळ्याजवळ एकत्र येऊन आंदोलन केले. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी भाजप शासकीय यंत्रणेचा गैरवापर करत असल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी यावेळी केला. राज्याचे अल्पसंख्यांक नवाब मलिक … Read more

चांगल्या रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचे विद्यार्थ्यांसह आंदोलन

सांगली प्रतिनिधी । प्रतिमेश गोंधळे मिरज तालुक्यातील खंडेराजुरी ते गांधीनगर या रस्त्याचे आत्तापर्यंत कोणतेही काम करण्यात आलेले नाही. देशाच्या स्वातंत्र्यापासून दुर्लक्षित असलेला रस्त्याचे काम तात्काळ सुरु करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. खंडेराजुरी ते गांधीनगर मोरे वस्ती हा अडीच किलोमीटरचा रस्त्यासाठी गेल्या 40 वर्षापासून नागरीक मागणी करीत आहेत. रस्ता हा शासन दप्तरी … Read more

कृष्णानदी प्रदूषणा विरोधात सायकलपट्टू दत्ता पाटील यांचे अन्न त्याग आंदोलन

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे सांगलीच्या पाचवीला पुजलेल्या शेरीनाल्याचे सांडपाणी पुन्हा कृष्णा नदीत मिसळू लागले आहे. शेरीनाल्याच्या बंधार्‍याजवळ शेरीनाल्याचे पाणी वाहून नेणारी गटार फुटल्याने कृष्णा नदीच्या प्रदूषणात वाढ झाली आहे. महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून देखील शेरीनाल्याचे पाणी नदीत मिसळण्याचे थांबत नाही. एकीकडे प्रशासनाकडून कृष्णा माई स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात प्रदूषण … Read more

भाजपच्या आड आल्यास सोडणार नाही, हल्ल्याचे उत्तर हल्ल्यानेच देणार; प्रसाद लाड यांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत काँग्रेसविरोधात भाजपच्या कार्यकर्त्यांच्यावतीने रस्त्यावर उतरत जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलन केले. यावेळी भाजप नेते प्रसाद लाड यांनी काँग्रेस कार्यकर्तांना इशाराही दिला. “भाजपच्या आड आले तर आम्ही सोडणार नाही. आम्हीही जशास तसे उत्तर देऊ. हल्ल्याचे उत्तर हल्ल्यानेच दिले जाईल, असे लाड यांनी म्हंटले. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबईत भाजप … Read more