अमरावतीत ब्रेडला लाळ लावून Tik-Tok व्हिडिओ बनणार्‍याला अटक

अमरावती प्रतिनिधी | अचलपूरातील एका बेकरीमध्ये काम करणार्‍या अल्पवयीन युवकाने खोडसाळ पणा करत ब्रेडला लाळ लावत त्याचा Tik-Tok व्हिडिओ सोशल मीडीयावर बनवुन टाकल्याचे काही नागरीकांना लक्षात आहे. या बेकरीतील युवक हा अशाप्रकारचा किळसवाणा प्रकार करून जनतेमधे साथीचा आजार फैलावा या ऊद्देशाने हा व्हिडिओ केल्यासारखे भासवत होता. त्यामुळे नागरीकांनी व्हिडिओ बनवणार्‍यावर आक्षेप घेतला. तर ही बेकरी … Read more

कौतुकास्पद! मुलींनीच दीला आईला खांदा, तेरवी न करता मुख्यमंत्री सहायता निधीला मदत

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई अमरावती च्या शिरजगाव येथिल सेवानिवृत्त मुख्याध्यापक नारायणराव वानखडे यांच्या पत्नी विमलताई वानखडे यांचे काल  अल्पशा आजाराने निधन झाले. कोरोनामुळे सगळीकडे लॉकडाऊन असतांना नियमांचे पालन करून त्यांच्या चार मुलींनी आईला खांदा देऊन परतवाडा येथील मोक्षधामात चिताग्नी दिला. यावेळी तेरावी न करता ते पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याने सर्वांकडून … Read more

प्रेमविवाह न करण्याच्या शपथ प्रकरणी प्राचार्यांसह तिघांचे निलंबन; विद्यार्थीनी कारवाईच्या विरोधात

अमरावती प्रतिनिधी । अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील महिला कला वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींना प्राध्यापकांनी प्रेम व प्रेमविवाह न करण्याची शपथ दिली होती. ही शपथ १३ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबीरात टेंभुर्णी येथे दिली होती. या प्रकरणात विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीने प्राचार्यांसह दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या होत्या. याचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर सोसायटीने एका … Read more

धक्कादायक! १ लाखची सूपारी घेत एकाची हत्या; प्रेत पोत्यात बांधून वर्धा नदीत फेकले

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई अमरावतीत एका धक्कादायक खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं आहे. पूर्ववैमनस्यातून १ लाख २० हजार रुपयांची सुपारी घेऊन खून करत प्रेत पोत्यात टाकून नदीत फेकण्याची बाब समोर आली आहे. अमरावतीच्या मंगरूळ दस्तगीर येथे १४ फेब्रुवारीला हनुमंत साखरकर यास उमेश सावलीकर यांनी मोबाईल फोनवरून त्याची मोटरसायकल पंचर झाली असल्याचे कारण सांगून … Read more

स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला म्हणून चोरटयांनी CCTV कॅमेरे केले लंपास

अमरावती प्रतिनीची । आशिष गवई अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यातील येवदा येथील बस स्टँडसमोर असलेले स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम सोमवारी रात्री फोडण्याचा प्रयन्त केल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र, चोरटे एटीएम फोडण्यास अयशस्वी झाले असले तरी त्यांनी CCTV कॅमेरे चोरत घटनास्थळावरून पोबारा केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि काही चोरटयांनी गॅस कटरच्या साहाय्याने एटीएमच्या … Read more

खासदार नवनीत राणांनी बँक अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर; बँकेच्या अनागोंदी कारभारावर भडकल्या

बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी आदिवासी लोकांना त्रास देतात आणि तासनतास रांगेत उभे ठेवतात. अशा प्रकारच्या काही तक्रारी गेल्या अनेक दिवसांपासून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्याकडे येत होत्या. त्यामुळे नवनीत राणा यांनी या मेळघाटमधील चुर्णी गावातील या बँकेला भेट दिली असता बँकेचा अनागोंदी कारभार पाहून त्यांनी राणा यांचा राग अनावर झाला. त्यामुळे त्यांनी बँकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना चांगलेच खडसावले.

परतवाड्यात सायकल रॅली काढून नवीन वर्षाचं स्वागत; स्वस्थ आरोग्य ठेवण्याचं पोलिसांचं आवाहन

अमरावती जिल्ह्याच्या परतवाडा येथे नवीन वर्षाचं स्वागत सायकल रॅलीद्वारे करण्यात आले. यावेळी शहरातील परतवाडा पोलिस स्टेशनचे ठाणेदार सदानंद मानकर यांनी जयस्तंभ चौक ते अष्टमहासिद्धी पर्यंत पोलिस अधिकारी, शासकीय कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी सायकल चालवून आपले व इतरांचे आरोग्य स्वस्थ ठेवत नवीन वर्षी भरगोस सायकल चालवा असा संदेश दिला.

मोदींची स्तुती करता आणि आमच्या भावना दुखावता; मुस्लीम नागरिकांचा आमदार रवी राणांना सवाल

मुस्लीम समुदायाच्या भावना दुखावणाऱ्या तीन तलाक तसेच आर्टिकल ३७० हटवण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाचे खासदार नवनीत राणा यांनी संसदेत समर्थन करणे आम्हाला पटले नसून, विधानसभा निवडणुकीत आम्ही तुमच्यासोबत असणार नाही, या शब्दांत आमदार रवी राणा यांच्या विरोधात स्थानिक मुस्लीम समुदायाने रोष व्यक्त केला आहे.

अमरावतीत माॅलवरून उडी मारत तरुणीची आत्महत्या, आत्महत्येचं कारण अजून अस्पष्ट

रुपाली ही अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होती. शहरातील बियाणी चौकातील नेक्स्ट लेव्हल मॉल हा लोकांची वर्दळ असणारा मॉल आहे. रुपालीने या मॉलच्या पाचव्या माळ्यावरून रूढी घेतली. यात तिला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. रुपालीला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं.पदवी परीक्षेत नापास झाल्याने, आलेल्या नैराश्यामुळं तीने ही आत्महत्येचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे.

भाजपच्या पहिल्या यादीत अमरावती जिल्ह्यातील ‘या’ ३ नावांचा समावेश

अमरावती प्रतिनिधी। भाजपाची पहिली १२५ उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. नवी दिल्लीत भाजपाच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत भाजपा नेते अरुण सिंह यांनी ही घोषणा केली. सोबतच बहुप्रतिक्षीत असलेल्या यादीत सर्वांचे लक्ष लागून असलेल्या अमरावती जिल्ह्यातील मतदारसंघाच्या उमेदवारांची देखील नावे जाहीर झाली आहेत. या १२५ उमेदवारांच्या पहिल्या यादीत अमरावती जिल्ह्यातील ३ नावांचा समावेश आहे. विशेष म्हणजे … Read more