बच्चू कडूंचे स्टिंग ऑपरेशन; वेषांतर करून कंटेनमेंट झोनमध्ये शिरण्याचा केला प्रयत्न मात्र…

अकोला । राज्यात कोरोना विषाणूने चांगलेच थैमान घातले आहे. पंतप्रधान मोदी यांनीही १७ मे नंतर लॉकडाऊन वाढवण्यात येणार असल्याचे सूचित केले आहे. राज्य सरकार देखील लॉकडाऊन १७ मे नंतर वाढवण्याच्या विचारात आहे. पोलीस प्रशासन कोरोनाच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहे. यापार्श्वभूमीवर राज्यमंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी पोलिसांचेच स्टिंग ऑपरेशन केले आहे. #अकोला | आमदार … Read more

दिलासादायक ! अमरावतीत 15 कोरोनाबाधित रुग्ण झाले बरे; आज मिळाला डिस्चार्ज

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई अमरावती येथील कोविड रूग्णालयात उपचार घेतल्यानंतर बरे झालेल्या 15 कोरोनामुक्त नागरिकांना घरी सोडण्यात आले. रुग्णालयात दाखल या सर्व रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल उपचारांनंतर निगेटिव्ह आला. ही बाब दिलासा देणारी ठरली असून, वैद्यकीय यंत्रणेने या सर्वांचे अभिनंदन करत त्यांना निरोप दिला. यात 10 पुरुष व्यक्ती व 5 महिलांचा समावेश आहे. कमिला ग्राऊंड … Read more

बाहेर दुध, भाजीपाला मिळेल का माहीत नाही पण कोरोना मात्र नक्की मिळेल – बच्चू कडू

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई आपण सध्या कोरोना आजाराच्या तिसर्‍या टप्प्यात जात आहोत. तेव्हा पुढचे १० दिवश अतिशय महत्वाचे आहेत. बाहेर दुध, भाजीपाला मिळेल की नाही माहिती नाही पण कोरोना मात्र नक्की मिळेल असं म्हणत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. राज्यात कोरोना बाधीतांची वाढतच चाललेली संख्या हा अतीशय गंभीर विषय … Read more

मेळघाटात पिण्याचे पाणी पेटले…पहा स्पेशल रिपोर्ट (Video)

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई संपुर्ण भारत सध्या लाॅकडाऊन आहे. प्रखर ऊष्णता अंगाची लाही लाही करणारी ठरत आहे. घराबाहेर पडू नका असे शासनाचे आदेश सर्वत्र आहेत. मात्र अमरावती च्या मेळघाटात परीस्थिती वेगळीच आहे. करण येथे पाणीच नाही. होय ऐकून मन काहीस स्तब्ध झालय ना. मात्र हो आपण जे ऐकतोय ते खर आहे. मेळघाटातील भागामधील हे … Read more

अमरावती च्या येसुर्णा गावामधे खबरदारी म्हणूण गावबंदी

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई अमरावती जिल्हा च्या येसुर्णा गावामधे आता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखन्यासाठी ग्रामस्थांनी गावबंदीचा निर्णय घेतलेला आहे. तर अत्यावश्यक सेवा अँब्युलन्स ,पोलीस व्हॅन, शेतकरी, गरजूलोकांसाठी येजा करण्याकरीता रस्ता खूला ठेवलेला आहे. कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणूण गावामधे येणार्‍या कोणत्याही नागरीकांची आधी नोंद केल्या जाते व नंतरच अत्यावश्यक असल्यास त्याचा संपर्क गावातील त्या व्यक्तीसोबत … Read more

राम शेवाळकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या स्मृती स्थळांना विकासनिधी

अमरावती प्रतिनिधी । प्रबोधनकार ठाकरे आणि राम शेवाळकर यांच्या स्मृती स्थळांच्या विकासासाठी राज्याच्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये मंजुरी दिल्याने राज्यमंत्री बच्चू कडू यांनी त्यांचे आभार मानलेत. त्याचबरोबर अकोला जिल्ह्यातील अकोट अंतर्गत येणाऱ्या नरनाळा या ऐतिहासिक किल्ल्याचा विकास कामासाठी सुद्धा २० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर येथील राम शेवाळकर यांच्या वाडा तसेच परतवाड्यातील प्रबोधनकार ठाकरे … Read more

अमरावती जिल्ह्यातील जैनपूर येथे थ्रेशरमध्ये अडकून शेत मजूराचा दुर्दैवी मृत्यू

अमरावती प्रतिनिधी । अमरावती जिल्ह्यातील येवदा पोलिस स्टेशन हद्दीत येत असलेल्या जैनपूर येथे आज सकाळी 11च्या दरम्यान थ्रेशर मशिनवर हरबरा काढनीचे काम करत असताना मजूराचा मूत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भामोद शेत शिवारात घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की शेतात हरभरा काढनीचे काम … Read more

अमरावतीमध्ये अवकाळी पावसाने गहू पिकाचे मोठे नुकसान ; इतरही पिकांनाही मोठा फटका

हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार विदर्भात अवकाळी पावसाची हजेरी लागली. अमरावती जिल्ह्यातील शिरजगाव भागात गारपीट झाल्याने गहू, हरभरा, कापूस सह संत्रा पिकाला फटका बसला. शेतकऱ्यांचा काढणीवर आलेला गहू अवकाळी पावसाने मातीमोल झाला आहे.

पुन्हा अस्मानी संकट! अमरावती जिल्ह्यात गारांसह जोरदार पाऊस; रब्बीचं पीक सुद्धा गेलं?

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई शेतकऱ्याच्या शेतमालाला एकीकडे भाव नाही आणि दुसरीकडे निसर्ग देखील बळीराज्यावर कोपला आहे. त्यातच रविवारी ४ वाजेच्या दरम्यान अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार येथे अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या तोंडच पाणी पळालं आहे. या अवकाळी पावसाने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. पावसामुळे शेतकऱ्यांचा शेतात काढणीवर असलेल हरभरा, … Read more

धक्कादायक! १ लाखची सूपारी घेत एकाची हत्या; प्रेत पोत्यात बांधून वर्धा नदीत फेकले

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई अमरावतीत एका धक्कादायक खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं आहे. पूर्ववैमनस्यातून १ लाख २० हजार रुपयांची सुपारी घेऊन खून करत प्रेत पोत्यात टाकून नदीत फेकण्याची बाब समोर आली आहे. अमरावतीच्या मंगरूळ दस्तगीर येथे १४ फेब्रुवारीला हनुमंत साखरकर यास उमेश सावलीकर यांनी मोबाईल फोनवरून त्याची मोटरसायकल पंचर झाली असल्याचे कारण सांगून … Read more