अमरावती जिल्ह्यात दारुबंदीसाठी महिलांचा पोलीस ठाण्याला घेराव; पोलीस आणि दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ चव्हाळा येथे महिलांनी दारूबंदीसाठी मंगळवारी पोलीस स्टेशनला घेराव घालून गावामध्ये दारूबंदी करा अशी मागणी करत महिला आक्रमक झाल्या होत्या. तसेच पोलीस दारू विक्रेत्यांकडून हप्ता घेत असल्याचा आरोपही महिलांनी पोलिसांवर केला आहे. त्यामुळे पोलिसांचे आणि दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान वारंवार विनवणी करून देखील गावात दारुबंदी होत … Read more

खासदार नवनीत राणांनी बँक अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर; बँकेच्या अनागोंदी कारभारावर भडकल्या

बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी आदिवासी लोकांना त्रास देतात आणि तासनतास रांगेत उभे ठेवतात. अशा प्रकारच्या काही तक्रारी गेल्या अनेक दिवसांपासून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्याकडे येत होत्या. त्यामुळे नवनीत राणा यांनी या मेळघाटमधील चुर्णी गावातील या बँकेला भेट दिली असता बँकेचा अनागोंदी कारभार पाहून त्यांनी राणा यांचा राग अनावर झाला. त्यामुळे त्यांनी बँकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना चांगलेच खडसावले.

वनक्षेत्र आगीपासून वाचवण्यासाठी ताडोबा, पेंच, मेळघाटची विशेष तपासणी होणार

अमरावती वनपरिक्षेत्रात दरवर्षी लागणाऱ्या आगीला लोक कंटाळले असून यासंदर्भात प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे. सतत लागणाऱ्या आगीपासून बचावासाठी वनविभाग प्रयत्नशील असून मागील दहा वर्षांत लागलेल्या आगीचा आढावा वनविभागातर्फे घेण्यात येत आहे. यातील मनुष्यनिर्मित आगी किती आणि निसर्गनिर्मित किती याचाही शोध घेतला जाणार आहे.

यशोमती ठाकूर राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री ?? जिल्ह्यात जोरदार बॅनरबाजी

खरंच यशोमती ठाकूर यांना महिला आणि बालकल्याण खातं मिळालं आहे? बॅनरबाजी कितपत खरी?

अमरावती जिल्ह्यात ८ महिन्यांत कर्करोगाचे तब्बल १०८ रुग्ण आढळले

देशातील आणि राज्यातील दिवसेंदिवस वाढणारे कर्करोगाचे प्रमाण लक्षात घेत अमरावती जिल्हा आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय असंसर्ग रोग नियंत्रण मोहीम राबवण्यात आली आहे. या मोहिमेतील तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत संशयित कर्करुग्णांची तपासणी करण्यात आली होती.

सराफा दुकानफोडीचा मास्टरमाईंड पोलीसांच्या जाळ्यात; परतवाडा पोलिसांची कारवाई

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील एका सराफा दुकानात झालेल्या चोरीचा छडा लावण्यात २ महिन्यांनी यश आलं आहे. ६० ते ७० लाख रुपयांच्या दागिन्यांवर हात साफ करून पळालेल्या कुख्यात आरोपी पंकजसिंह दुधानी याला परतवाडा पोलीसांनी मुंबईतून अटक केलेली आहे.

अमरावतीला आला शिमला,कुलू-मनालीचा फील; पावसाच्या हलक्या सरींसोबत पडलं दाट धुकं

आधी हिवाळ्याचे दिवस, त्यात आलेला अवकाळी पाऊस आणि नंतर धुक्यांनी ओढलेली चादर हे एकूणच वातावरण शिमला- कुल्लूमनाली सारखे दिसत होते. 

आरटीओने जप्त केलेल्या गाड्यांचे झाले भंगार; गाड्यांचे इंजीन सहित इतर साहित्य झाले गायब

आरटीओने वाहनधारकांना काही नियम घालून दिलेले आहेत. मात्र या नियमांचे उल्लंघन होताना बऱ्याच वेळा पाहण्यात येते. त्यामुळे वाहनधारकांना कारवाईला सामोरे जावे लागते. यामध्ये प्रामुख्याने वाहनमालकाच्या नावावर चालक परवाना नसणे, आरटीओच्या नियमानुसार कर न भरणे, आदी कारणांनी आरटीओचे मोटर वाहन निरीक्षक कारवाईदरम्यान ऑटोरिक्षा सहित इतर वाहने जप्त करतात.

मी फोकनाड नेता नाही, जे बोलतो ते करून दाखवतो – नितीन गडकरी

एवढी वर्ष काँग्रेसला सत्ता दिली असली तरी देशातील जनता मात्र गरीबच राहिली. काँग्रेसने आजपर्यंत देशाचा कोणताही विकास केला नाही यावर चिंतन करण्याची गरज आहे असं म्हणत मी फोकनाड नेता नसून जे बोलतो ते करून दाखवितो असं मत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी धामणगाव रेल्वे येथील जाहीर सभेत बोलतांना व्यक्त केलं.

पूरग्रस्तांच्या नावाखाली तृथीय पंथीयांचा डान्स, रोड शो मध्ये अश्लिल चाळे

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई या गावामध्ये एका गणेशोत्सव मंडळ व युवक काँग्रेसच्या वतीने गणपती विसर्जन्या दरम्यान पूरग्रस्तांना मदतीच्या नावावखाली नाच गाण्याचा कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आलं असल्याचा प्रकार ऊजेडात आला आहे. विशेष म्हणजे या नाच गाण्याचा कार्यक्रमाला बाहेरून पाच ते सहा तृतीयपंथीयांना आयोजकांकडून बोलावण्यात आले होते. सुरुवातीला या तृतीयपंथीयांचा नेरपिंगळाई येथे … Read more