संजय राऊत यांनी निर्थक वक्तव्य करू नयेत : चंद्रकांत पाटील

मुंबई प्रतिनिधी | शिवसेना-भाजप युतीची चर्चा अंतिम टप्प्यात असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी निरर्थक वक्तव्य करू नये. युतीसंदर्भातील बोलणी दोन्ही पक्षांत अंतिम टप्प्यात असून लवकरच याबाबतची घोषणा करण्यात येणार आहे.  २०१४ ला विरोधात बसलो असतो तर आज परिस्थिती वेगळी असती, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. आता याविषयी चर्चा करण्यात काही अर्थ नाही … Read more

नारायण राणेंच्या प्रवेशावर चंद्रकांत पाटील म्हणतात

मुंबई प्रतिनिधी| नारायण राणे भाजपमध्ये सामील होणार अशा चर्चा मागील काही दिवसापासून सतत सुरु आहेत. त्यांच्या भाजप प्रवेशाला शिवसेना विरोध करेल असे बोलले जाते आहे. मात्र शिवसेना मवाळ भूमिकेत असल्याने राणेंचा भाजप प्रवेश होईल असे बोलले जाते आहे. याच संदर्भात चंद्रकांत पाटील यांना विचारले असता त्यांनी त्यावर मत व्यक्त केले आहे. नारायण राणे यांना भाजपमध्ये … Read more

पृथ्वीराज चव्हाण यांना धक्का : काँग्रेसच्या ‘या’ आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश

कराड प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे विधान परिषद सदस्य व माजी जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील यांनी पुत्र प्रताप व मानसिंग तसेच पुतण्या सुनील पाटील यांच्यासह अनेक स्थानिक नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी आज मुंबई येथे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसचे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज … Read more

सातारा लोकसभा पोटनिवडणूक : राष्ट्रवादीचा नेमका उमेदवार कोण?

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा आज अखेर निवडणूक आयोगाने केली आहे. या घोषणेनंतर राष्ट्रवादी आणि भाजपच्या गोटात घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीने पक्ष सोडून गेलेल्या उदयनराजे भोसले यांना चोख प्रतित्तर देण्याचे ठरवले असून यासाठी राष्ट्रवादी नेमका कोणता उमेदवार रिंगणात उतरवणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या चेहऱ्यावर सातारच्या लोकसभा पोटनिवडणुकीचे चित्र ठरणार … Read more

‘चव्हाण साहेब झाकली मुठ सव्वा लाखाची ठेवा,’ तावडेंचा अशोक चव्हाणांना सल्ला

नांदेड प्रतिनिधी। राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी अशोक चव्हाण यांना नांदेडमध्ये दिलेला सल्ला चांगलाच चर्चिला जात आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांचा गड समजल्या जाणाऱ्या नांदेडमध्ये त्यांचा दारुण पराभव झाला होता. याच गोष्टीची आठवण करून देत तावडेंनी अशोक चव्हाण यांना मित्रत्वाच्या नात्याने सल्ला दिला.आज मंगळवारी मंत्री विनोद तावडे नांदेड दौऱ्यावर आले … Read more

प्रणिती शिंदेंकडून आचारसंहिता भंग? नरसय्या आडम यांची तक्रार

कोल्हापूर प्रतिनिधी। राज्यभरात शनिवारी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहिता लागू झालेली असताना सोलापुरात पहिल्याच दिवशी माजी आमदार नरसय्या आडम यांनी शहर मध्य मतदारसंघाच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी मतदारांना मेकअप बॉक्स वाटप करून आचारसंहिता भंग केल्याची तक्रार निवडणूक निर्णयाधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे. आमदार प्रणिती शिंदे यांनी मतदारसंघात मतदारांना आकर्षित करण्यासाठी … Read more

सातारा लोकसभा पोटनिवडणूक विधानसभेसोबतच होणार ; निवडणूक आयोगात तशा हलचाली

नवी दिल्ली | लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपमध्ये गेलेल्या उदयनराजेंना निवडणूक आयोगाने शनिवारी चांगलाच धक्का दिला. निवडणूक आयोगाकडून शनिवारी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जाहीर करण्यात आली मात्र साताऱ्याची लोकसभेची पोटनिवडणूक मात्र जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे उदयनराजेंच्या अडचणीत वाढच झाली. मात्र आता निवडणूक आयोग २७ तारखेला निघणाऱ्या विधानसभेच्या अधिसूचनेसोबत साताऱ्याच्या लोकसभा पोटनिवडणूकीची देखील अधिसूचना काढण्याच्या तयारीत आहे. … Read more

रस्त्यांची कामे करणे म्हणजे विकास नव्हे ; रोहित पवारांचा राम शिंदेना टोला

कर्जत प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे युवा नेते आणि शरद पवारांचे नातू रोहित पवारांनी भाजपचे मंत्री राम शिंदे यांच्यावर कडवी टीका केली आहे. मतदारसंघात रस्ते झाले म्हणजे विकास झाला असे म्हणता येणार नाही. येथील पाण्याचा आणि महिला , तरुणवर्गाचा रोजगाराचा प्रश्न बिकट आहे असे रोहित पवार म्हणाले आहेत. राम शिंदे यांच्या विरोधात आघाडीचे संभाव्य उमेदवार असणारे रोहित पवार … Read more

कॉंग्रेसला धक्का ; राजेंद्र दर्डा यांचा प्रसार माध्यम कमिटीच्या चेअरमन पदाचा राजीनामा

मुंबई प्रतिनिधी |  विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील दिग्गज नेते कॉंग्रेसला सोडून भाजप-शिवसेनेत प्रवेश करत आहेत. कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते राजेंद्र दर्डा यांनीही काँग्रेसच्या प्रसार माध्यम आणि संपर्क कमिटीच्या चेअरमनपदाचा राजीनामा दिला आहे. कॉंग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. राजेंद्र दर्डा सलग १५ वर्षे आमदार राहिले आहेत. तसेच त्यांनी वेगवेगळी मंत्रिपदेही भूषवली आहेत. ते दैनिक ‘लोकमत’ … Read more

 माजी आ.परिचारक निवडणूक लढणार ?

सोलापूर प्रतिनिधी। माजी आमदार सुधाकर परिचारक यांनी पंढरपूर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याचे स्पष्ट संकेत दिलेआहेत. माजी आमदार सुधाकर परिचारक गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक आज सायंकाळी येथील टिळक स्मारक सभागृहत पार पडली. यावेळी शहरातील सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी  सुधाकर परिचारक यांनी निवडणूक लढवावी. असा सर्वानुमते ठराव नगराध्यक्षा साधना भोसले यांना दिला. सुधाकर परिचारक यांनी पंढरपूरचे सलग 20 … Read more