बनावट कागदपत्रांआधारे नोकरी प्रकरण; आणखी दोघा जणांना अटक

औरंगाबाद | बनावट कागदपत्रांआधारे सरकारी नोकरी मिळविलेल्या उमेदवारांविरुद्ध तसेच कागदपत्रे हस्तगत केलेल्या १८८ जणांविरुद्ध दाखल गुन्ह्यात गुन्हे शाखेने रविवारी आणखी दोघांना अटक केली. निवृत्त क्रीडा उपसंचालक राजकुमार दत्तात्रय महादावाड (वय ५९) आणि क्रीडा अधिकारी भाऊराव रामदास वीर (वय ५२, रा. ताजनगर, शेवगाव जि. नगर) अशी आरोपींची नावे आहेत. क्रीडा अधिकारी भाऊराव वीर आणि १५ मार्च … Read more

वाळू वाहतूक करण्यासाठी दीड लाखाची मागणी; तहसीलदारास रंगेहाथ पकडले

औरंगाबाद | शहरात वाळूची वाहतूक करण्यासाठी दीड लाखाची लाच घेताना तहसीलदारांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. ही कारवाई सोमवारी रात्री साडे अकराच्या सुमारास करण्यात आली. याबाबत माहिती अशी की, शहर महसूल परिसराच्या हद्दीत वाळूची वाहतूक करायची असल्यास प्रतिमहिना दीड लाख रुपये हप्ता देण्याची मागणी तक्रारदारकडे तहसीलदार देशमुख यांनी केली होती. ही रक्कम जर दिली … Read more

युट्युबवर आत्महत्येचे धडेघेत जावयाने सासरवाडीत संपविले जीवन…

औरंगाबाद | पत्नी मुलांना घ्यायला औरंगाबादेत सासरवाडीत आलेल्या 26 वर्षीय जावयाने आत्महत्या कशी करावी याचे युट्युब वरून धडे घेत गळफास घेऊन जीवन संपविल्याची धक्कादायक घटना आज सकाळी हिमायतबाग परिसरात समोर आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सचिन प्रकाश अहिरे वय-26 (रा.कल्याण, मुंबई) असे आत्महत्या करणाऱ्या जावयाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेली … Read more

बोगस कागदत्रे सादर करून मिळवला जामीन, वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

औरंगाबाद |  जिल्हा व सत्र न्यायालयाकडून जामीन मिळवून देण्यासाठी बोगस कागदपत्रे सादर करून जालना जिल्ह्यातील जामिनदाराने फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी शिवाजी लाला चव्हाण (रा. खांबेवाडी, ता. जि. जालना) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपी शिवाजी चव्हाण याच्याविरुद्ध गेल्या वषीर्पासून खटला सुरू आहे. या खटल्यातून जामीन मिळविण्यासाठी … Read more

सलीम अली सरोवरातील मरण; पावलेल्या माशांची चौकशी सुरू

औरंगाबाद | ऐतिहासिक सलीम अली सरोवरातील हजारो मासे रविवारी मृत्यूमुखी पडले. सोमवारी महापालिका अधिकारी व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सरोवराची पाहणी केली. मृत माशांचे नमुने विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागाला पाठवले आहेत, तर पाण्याच्या नमुन्यांची तपासणी प्रदूषण नियंत्रण मंडळ करीत आहे. सोमवारी सकाळीच महापालिकेचे मुख्य पशूसंवर्धन अधिकारी बी.एस. नाईकवाडे, उपअभियंता अशोक पद्मे, चांडक यांच्यासह प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या … Read more

कोवीड सेंटरमध्ये महिलेची छेडछाड

crime 2

औरंगाबाद : पॉलिटेक्निक कॉलेजमधील कोविड सेंटरमध्ये एका महिलेसोबत छेडछाड झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी महिलेने संबंधित डॉक्टरांकडे तक्रार केली असून, पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. वेदांतनगर येथील कोविड सेंटर येथे एका महिलेसोबत डॉक्टराने गैरवर्तन केल्याचे समोर आले होते. या प्रकरणात त्या डॉक्टरला निलंबित करण्यात आले होते. हे प्रकरण घडल्यानंतर पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये … Read more

रोशनगेट परिसरातील मोबाइल शॉपी फोडली;१२ हजारांची रोकड पळविणाऱ्या दोघांना अटक

औरंगाबाद रोशनगेट परिसरातील मोबाइल शॉपीचे शटर उचकटून गल्ल्यातील १२ हजारांची रोकड पळविणाºया दोन चोरट्यांना जिन्सी पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली.सय्यद अली सय्यद मंतू (वय २६, रा. शरीफ कॉलनी) आणि शेख इमरान शेख लुकमान (३५, रा. बाबर कॉलनी) अशी चोरट्यांची नावे आहेत. मोहम्मद इम्तियाज मोहम्मद सिद्दीकी (रा. इंदिरानगर, बायजीपुरा) यांची रोशन गेट येथे मोबाइल शॉपी आहे. … Read more

पोलिसांच्या कडक बंदोबस्तात एमपीएससी परीक्षेला सुरुवात ; पीपीईकिट घालून काही परीक्षार्थी परीक्षेला

MPSC exams

औरंगाबाद : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार या पदासाठी आज सकाळी १० वाजता परीक्षेला सुरुवात झाली. यावेळी एमपीएससीची परीक्षा आणि दुसरीकडे कोरोनाशी लढा देत काही परीक्षार्थींनी एमपीएससी परीक्षेला हजेरी लावली. अशा परीक्षार्थींसाठी परीक्षा विभागाच्या वतीने स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली. एमपीएससीच्या परीक्षेला सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी परीक्षा केंद्रावर हजेरी लावली. यावेळी पोलिसांच्या … Read more

महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या पतीची आत्महत्या ; आत्महत्येचे कारण अस्पष्ट

suicide

औरंगाबाद : ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचाºयाच्या पतीने शुक्रवारी मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या दिलीप गवळी केल्याची घटना नक्षत्रवाडी येथे घडली. याविषयी सातारा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. दिलीप रामकिसन गवळी (४०)असे मृताचे नाव आहे. दिलीप हे नक्षत्रवाडी येथे आई वडिलांसोबत राहात होते. तर त्यांची पोलीस पत्नी माहेरी नक्षत्रपार्कमध्ये राहात. त्यांना … Read more

बंगाली कारागिराकडून दोन सराफ व्यावसायिकांची फसवणूक; ८० तोळे सोने घेऊन पोबारा

gold

औरंगाबाद ।सोन्या-चांदीचे दागिने घडवनाऱ्या बंगाली कारागिराने दोन सराफा व्यावसायिकांचा विश्वास संपादन करून सुमारे ८० तोळे सोने घेऊन पोबारा केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी फरार कारागीर शेख असहुल शेख लियाकत (रा. मोमीनपुरा, मूळ गाव मालबा, जि. वर्धमान, पश्चिम बंगाल) याच्याविरोधात १७ मार्च रोजी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिडकोतील … Read more