बनावट कागदपत्रांआधारे नोकरी प्रकरण; आणखी दोघा जणांना अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | बनावट कागदपत्रांआधारे सरकारी नोकरी मिळविलेल्या उमेदवारांविरुद्ध तसेच कागदपत्रे हस्तगत केलेल्या १८८ जणांविरुद्ध दाखल गुन्ह्यात गुन्हे शाखेने रविवारी आणखी दोघांना अटक केली. निवृत्त क्रीडा उपसंचालक राजकुमार दत्तात्रय महादावाड (वय ५९) आणि क्रीडा अधिकारी भाऊराव रामदास वीर (वय ५२, रा. ताजनगर, शेवगाव जि. नगर) अशी आरोपींची नावे आहेत.

क्रीडा अधिकारी भाऊराव वीर आणि १५ मार्च रोजी अटक करण्यात आलेला आरोपी अंकुश राठोड (वय ३५, रा. पारेगाव, मानेगाव ता. जि. जालना) या दोघांना शनिवारपर्यंत (२७ मार्च) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. डी. श्रृंगारे/तांबडे यांनी सोमवारी दिले. तर, गुन्ह्यात १९ मार्च रोजी अटक करण्यात आलेला आरोपी आणि गेवराई विभागातील कर्मचारी शंकर शामराव पतंगे (वय ४६, रा. न्यू. एसटी कॉलनी) आणि निवृत्‍त अधिकारी राजकुमार महादावाड (५९) या दोघांना बुधवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेशदेखील न्यायालयाने दिले. बनावट कागदपत्रांआधारे काही उमेदवारांनी सरकारी कार्यालयांत नोकरी मिळवून उर्वरित उमेदवारांनी बनावट कागदपत्रे सादर करून सरकारची दिशाभूल केली. त्या प्रकरणी विभागीय उपसंचालक उर्मिला गणपतराव मोराळे यांच्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलीस ठाण्यात १८८ उमेदवार खेळाडूंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, गुन्हे शाखा उपायुक्त रवींद्र साळोखे, गुन्हे शाखा निरीक्षक अविनाश अघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे, जमादार सोनवणे, गवळी, शिरोटे, पाटील आणि व्हावळ आदींनी केली.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

 

Leave a Comment