Saturday, June 3, 2023

युट्युबवर आत्महत्येचे धडेघेत जावयाने सासरवाडीत संपविले जीवन…

औरंगाबाद | पत्नी मुलांना घ्यायला औरंगाबादेत सासरवाडीत आलेल्या 26 वर्षीय जावयाने आत्महत्या कशी करावी याचे युट्युब वरून धडे घेत गळफास घेऊन जीवन संपविल्याची धक्कादायक घटना आज सकाळी हिमायतबाग परिसरात समोर आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सचिन प्रकाश अहिरे वय-26 (रा.कल्याण, मुंबई) असे आत्महत्या करणाऱ्या जावयाचे नाव आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सचिनची सासुरवाडी शहरातील हिमायतबाग परिसरात असून त्याची पत्नी मुलासह काही दिवसांपूर्वी माहेरी अली होती. त्यांना घेऊन जाण्यासाठी तो मुंबईहून आला होता.मात्र सचिन आणि सासरकडील मंडळी मध्ये वादावादी झाली होती.सचिन हा पत्नीला न घेऊन जाता फक्त मुलाला घेऊन जाणार होता.त्यामुळे सासर कडील मंडळींनी त्याला मुलीलाही घेऊन जा अशी विनंती केली मात्र तो मानायला तयार न्हवता. वाद मिटल्यावर सचिन खोलीत गेला व सर्व जण झोपी गेले मात्र पहाटेच्या सुमारास त्याने ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतले.

आत्महत्या करण्यापूर्वी सचिन ने युट्युब या सोशल साईट वरून आत्महत्या काशी करावी या बाबत माहिती जाणून घेतले व त्यानंतर त्याने गळफास घेतल्याचे देखील समोर आले आहे.त्याला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन सानप हे करीत आहेत.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group