घाटीला निधीची कमतरता पडू देणार नाही ; जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचे प्रतिपादन

औरंगाबाद : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यंत्रणांनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. घाटी रुग्णालयात रुग्णांचे  प्रमाण अधिक असल्याने घाटीला आवश्यक मनुष्यबळ, साहित्य तसेच इतर सर्व सोयी-सुविधा पुरविण्यास प्राधान्य देण्यात येणार असून, रुग्णसेवेसाठी घाटीला निधीची कमतरता पडू देणार नसल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. कोरोनाचा वाढता प्रसार पाहता पुढील नियोजन करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी … Read more

सिल्लोड तालुक्यात वादळी वाऱ्यांसह जोरदार गारपीट

औरंगाबाद : सिल्लोड तालुक्यात आज रविवारी अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह जोरदार गारपीट गारपीट झाली. ऐन उन्हाळ्यात पिकांची काढणी सुरू असताना वादळी वाऱ्यांसह गारपीट झाल्यामुळे काढणीला आलेल्या आणि काढणी झालेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले. सिल्लोड तालुक्यात अनेक ठिकाणी शनिवारी सायंकाळी आणि रात्री व आज रविवारीही गारपीट झाली. शेतात आणि रस्त्यांवरही गारांचा खच पडला होता. हवामान विभागाने … Read more

औरंगाबाद मध्ये कोरोनाचा विस्फोट सुरूच ; 1432 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद

औरंगाबाद : जिल्ह्यात आज 810 जणांना (मनपा 648, ग्रामीण 162) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 54866 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1432 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 67354 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1419 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 11069 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. … Read more

कोरोना काळातही मनपाकडून शंभर कोटींची कर वसुली

aurangabad mahanagar

औरंगाबाद : कोरोना पार्श्वभूमीवर यंदा मनपा मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीकरिता लक्ष केंद्रित करता आले नाही. यानंतर देखील कर वसुली शंभर कोटी पार गेली असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. नागरिकांकडे मनपाची मालमत्ता कर व पाणीपट्टी पोटी कोट्यवधींची थकबाकी आहे. या तुलनेत कर वसुली होत नसल्याने तिजोरीमध्ये नेहमी खणखणाट असतो. गतवर्षी कर वसुलीवर मनपाने मोठ्या प्रमाणावर … Read more

एमपीएससी परीक्षेला सहा हजार विद्यार्थ्यांची दांडी

mpsc

औरंगाबाद : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार पदासाठी आज सकाळी १० ते १२ आणि दुपारी ३ ते ५ या दोन सत्रांत परीक्षा घेण्यात आली. यावेळी परीक्षेला दोन्हीही सत्रांत तेरा हजारांहून अधिक परीक्षार्थींनी परीक्षा दिली तर सहा हजार विद्यार्थ्यांनी दोन्ही सत्रांत दांडी मारली. औरंगाबाद शहरातील एकूण ५९ परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात आली त्यात … Read more

जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत 93 टक्के मतदान

dcc bank

औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी एकूण 1114 पैकी 1046 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला म्हणजे च 93:90% मतदान झाले. सगळ्या च पॅनलने आपणास बहुमत मिळेल, असा दावा केला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीमध्ये 18 जागांसाठी मतदान झाले. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. सकाळी 8 वाजता सुरू झालेल्या या प्रक्रियेत दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान … Read more

घाटीत आणखी पाच रुग्णांचा कोरोनाने घेतला बळी

ghati

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात आणखी पाच रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यात चार रुग्ण हे औरंगाबाद, तर एक रुग्ण जालना जिल्ह्यातील आहे. घाटी रुग्णालयात आणखी पाच रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे घाटी प्रशासनाने जाहीर केले आहे. त्यात हर्सूल, फुलेनगर येथील ३५ वर्षीय पुरुष, पुष्पानगरी येथील ८३ वर्षीय स्त्री, गोलेगाव सिल्लोड येथील ६५ वर्षीय स्त्री, वाळूज, औरंगाबाद … Read more

सलीम अली सरोवरातील हजारो माशांचा मृत्यू

औरंगाबाद – शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सलीम अली सरोवरातील हजारो माशांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली. दूषित पाण्यामुळेच या माशांचा मृत्यू झाले असल्याचे बोलले जाते. यापूर्वी देखील असे प्रकार घडले आहेत. वारंवार असे प्रकार घडूनही मनपा प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळेच ही घटना घडली. अशी चर्चा परिसरात ऐकायला मिळाली. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महापालिकेच्या सलिम … Read more

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट ; कोरोनासंदर्भात दक्षता घेण्याचे आवाहन

औरंगाबाद : जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र वाळूज येथे भेट दिली. यावेळी त्यांनी कोरोनासंदर्भात अधिक दक्षता घेण्याचे आवाहन नागरिकांना केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदवले, दंड अधिकारी वैजापूर, सर्कल आॅफिसर, तलाठी, आरोग्य कर्मचारी इत्यादी उपस्थित होते. कोरोनासंदर्भात दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी नागरिकांना केले. तसेच याबाबत काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आवाहनही केले. … Read more

असंघटित क्षेत्रातील उद्योगांना संघटित करण्यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना

औरंगाबाद : असंघटित क्षेत्रातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना संघटित क्षेत्रामध्ये आणण्याच्या उद्देशाने केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना आणली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासनाने हालचाली सुरू केल्या असून विभागातून 82 प्रस्तावांचे लक्ष ठेवण्यात आले आहेत. प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना 2020- 2021 ते 2024 ते 2025 या पाच वर्षांदरम्यान एक जिल्हा, एक उत्पादन … Read more