बँक उध्वस्त होऊ नये यासाठी आमचे प्रयत्न – आ.हरिभाऊ बागडे

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्हा बँक आणि लातूर येथील बँक नफ्यात आहेत. पारदर्शक पद्धतीने कारभार केल्यामुळे बँक चांगल्या स्थितीत आहेत. सहकार क्षेत्र टिकवण्यासाठी राजकीय पक्षाचे जोडे बाहेर ठेवत आम्ही काम करत आहोत. सहकारक्षेत्र उध्वस्त होऊ नये बँक वाचवण्यासाठी आम्ही सर्वपक्षीय संचालक कार्यरत असल्याचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आमदार हरिभाऊ बागडे, कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे, … Read more

700 किलोमीटरच्या जलवाहिनीचे सर्वेक्षण पूर्ण

औरंगाबाद : राज्य शासनाने मंजूर केलेल्या 1680 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेच्या पहिल्या टप्प्यातील कामे सुरू झाली आहेत. पाण्याच्या टाक्या बांधण्यासह कंत्राटदार कंपनीने जायकवाडी ते नक्षत्रवाडी या 40 किलोमीटर मुख्य पाईपलाईनसह शहरात 1900 पैकी 700 किलोमीटरच्या अंतर्गत पाईपलाईनचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. राज्य शासनाने ऑक्टोबर 2019 मध्ये शहरातील 1680 कोटी रुपयांची नवीन योजना मंजूर केली. 12 … Read more

कोरोना गेला उडत, आम्हाला काय कुणाची भीती ; तळीराम रस्त्यांवरच पितायत दारु

औरंगाबाद: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अंशतः लॉकडाऊन सुरू असताना शहरात दारू दुकाने आणि मध्यपिना वेळेचे आणि कोरोनाचे नियम लागू नाहीत का ? असा प्रश्न उपस्थित होत  आहे.या वर कारवाई होणे अपेक्षित आहे मात्र  तसे होत नसल्याने रस्त्यावरच हे मध्यपी पहाटे पासूनच ओढ पाचची चा कार्यक्रम सुरू करतात. देशी व विदेशी दारू विक्रीची दुकाने उघडणे व … Read more

वऱ्हाडी मंडळींना सोडताच मुंबईच्या चालकाची गळ्यातील सोनसाखळी हिसकवली ; पोलिसांनी ठोकल्या दोघांना बेड्या

Crime

औरंगाबाद: लग्न समारंभासाठी मुंबईहून आलेल्या चालकाशी झटापट करुन दोघांनी त्याच्या गळ्यातील एक तोळा तीन ग्रॅमची सोनसाखळी हिसकावल्याचा खळबळजनक प्रकार शहरातील मुकुंदवाडी भाजी मंडईत घडला. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांनी तपासचक्रे फिरवत अट्टल गुन्हेगार दीपक रमेश साबळे (वय २७, रा. ब्रिजवाडी, बौध्द विहाराजवळ) आणि उमेश गौतम गवळे (वय ३०, रा. गुलमोहर कॉलनी, एन-६, सिडको) या दोघांना अटक केली … Read more

भयंकर !! औरंगाबादेत आज दिवसभरात वाढले 902 रुग्ण तर 9 मृत्यू; 4131 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद : जिल्ह्यात आज 277 जणांना (मनपा 231, ग्रामीण 46) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 49890 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 902 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 55341 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1320 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4131 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. … Read more

अबब!! जि.प. शाळेच्या विद्यार्थिनींना 29 वर्षा पासून एकच रुपया भत्ता; भत्त्यात वाढ करण्याची शिक्षक समितीची मागणी

औरंगाबाद: जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींना देण्यात येणारा उपस्थिती भत्ता एकोणतीस वर्षानंतरही एक रुपयाचाच आहे . त्यात वाढ करण्याची मागणी प्राथमिक शिक्षक समितीकडून करण्यात आली आहे . जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलींची उपस्थिती कायम रहावी व ही संख्या वाढावी यासाठी 1995 पासून मुलींना उपस्थिती भत्ता शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे. राज्यातील पहिली ते चौथीच्या वर्गातील मागासवर्गीय … Read more

औरंगाबादसाठी चिंताजनक बातमी !! कोरोना पॉझिटिव्ह रेट 2 टक्क्यांवरून थेट 17 टक्क्यांवर

औरंगाबाद : शहरात दिवसागणिक कोरोना बाधित रुग्णचा आलेख वाढत आहे. सद्य स्थितीत कोरोनाचे 3515 रुग्ण दाखल आहेत.पंधरा दिवसात कोविड रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट हा 2 टक्यावरून आता थेट 17 टक्क्यांवर गेला आहे. यामुळे शहराला कोरोना संसर्गाचा विळखा घट्ट होत चालला आहे. गेल्या काही दिवसात शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत दररोज … Read more

औरंगाबादेतही कडक लॉकडाऊन? ; मुख्यमंत्र्यांच्या संकेता नंतर शहरात चर्चेला उधाण…

औरंगाबाद: राज्यात कोरोनाचा आलेख दिवसागणिक वाढत आहे.आज घडीला दररोज १० हजार पेक्षा अधिक रूग्ण आढळत आहे. स्थानिक प्रशासन आढावा घेवून विविध जिल्ह्यात निर्बंध लागू करत आहे.औरंगाबाद शहरात आजपासून अंशत: लॉकडाउन सुरू झाला आहे.परंतु लोक पालन करताना दिसत नसल्याने शहरात सुद्धा कठोर लॉकडाउन लागू करण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. ठाकरे यांनी आज कोरोना … Read more

उपयुक्तांच्या हस्तक्षेपानंतर विप्रोच्या कामगारांचे आमरण उपोषण मागे

औरंगाबाद | आपल्या प्रलंबित मागण्या मान्य करुन घेण्यासाठी वाळूज एमआयडीसी परिसरातील विप्रो कंपनीच्या कामगारांनी तसेच महाराष्ट्र कामगार विकास संघटनेच्या वतीने दि. ६ मार्चपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते. या आमरण उपोषणाची अखेर आज कामगार उपायुक्तांनी दखल घेऊन त्यांनी हस्तक्षेप करत अखेर आज हे आमरण उपोषण सोडवण्यात आले आहे. विप्रो कंपनीच्या कामगारांनी आपल्या प्रलंबित मागण्यासाठी … Read more

शिवीगाळ करीत महिलांशी लगट करणारे दोघे रोमिओ गजाआड

औरंगाबाद | घरा समोर गप्पा मारत उभ्या असणाऱ्या महिलांशी पूर्व वैमनस्यातून शिवीगाळ व लगट करुन त्यांचा विनयभंग केल्याची घटना शनिवारी रात्री वडगाव कोल्हाटी परिसात घडली. गणेश नवनाथ सोमासे (वय २०) आणि शुभम परसराम लघाणे (वय २२, दोघे रा. वडगाव कोल्हाटी) या दोघांना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी गजाआड केले आहे. वरील प्रकरणात ४० वर्षीय महिलेने फिर्याद दिली … Read more