औरंगाबादेत वेशीवर शुकशुकाट मोहल्ल्यात भरला बाजार; एकदिवस आधिच अनलाॅक?

औरंगाबाद प्रतिनिधी | शहरात लागु असलेली नऊ दिवसाची संचारबंदी उद्या समाप्त होणार आहे.मात्र जिंसीतील कटकटगेट,रहेमानिया कॉलोनी, नेहरूनगर  सह अनेक आतील भागात  मटण, किराणा दुकान, चप्पल, फळ-भाजीपाला, चहा हॉटेल, मिठाई दुकाने अशी सर्वच दुकाने सुरू असून एक दिवस अगोदरच या भागातील संचारबंदी उठविण्यात अली आहे की काय असा प्रश्न हे दृश्य पाहून प्रत्येकाला पडत आहे. शहरात … Read more

औरंगाबादमधील कोरोनाबाधितांचा आकडा 7900 पार

औरंगाबाद प्रतिनिधी | जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ७९०० वर गेला आहे. यापैकी ४२०० रुग्ण बरे झाले असून ३४० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत ३४०० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान वाढत्या रुग्णसंख्येमुळे औरंगाबादमध्ये ८ दिवसांचा कडकडीत जनता कर्फ्यु राबविण्यास आजपासून सुरुवात झाली असून १८ तारखेपर्यंत नागरिकांनी काटेकोरपणे याचं पालन करावं अशा सूचना प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत. … Read more

पीडीत महिलेकडून लाचेची रक्कम स्विकारली, उस्मानपुरा पोलिस ठाण्याचा जमादार सापळ्यात

औरंगाबाद प्रतिनिधी | दाखल गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केल्याचे बक्षीस म्हणून पीडीत महिलेकडून पाच हजाराची लाच स्विकारताना उस्मानपुरा पोलिस ठाण्याचा जमादार शिवाजी दामू गाडे याला एसीबीने रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास उस्मानपुरा पोलिस ठाण्यात करण्यात आली. एका महिलेने पती त्रास देत असल्याने त्याच्याविरुध्द उस्मानपुरा पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ही पीडीत … Read more

घराच्या बांधकामात अडथळा निर्माण करणाऱ्या शेजाऱ्याच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या…

औरंगाबाद प्रतिनिधी | फ्लॅटचे बांधकाम सुरू असताना शेजाऱ्यांकडून सतत येणाऱ्या व्यत्ययाला आणि मानसिक त्रासाला कंटाळून एका महिलेने आत्महत्या केली आहे. ही घटना बाबा पेट्रोल पंम्प जवळील म्हाडा कॉलनी येथे घडली. उषा विजय गायकवाड असे मृत महिलेचे नाव आहे. ओढणीच्या सहाय्याने या महिलेने गळफास घेतला. एक वर्षापासून गायकवाड यांच्या फ्लॅटचे बांधकाम सुरु आहे. त्यांना जवळच राहणारे … Read more

औरंगाबाद जिल्ह्यात 3149 रुग्णांवर उपचार सुरू, 166 रुग्णांची वाढ

औरंगाबाद प्रतिनिधी | औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 166 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये औरंगाबाद मनपा हद्दीतील 99 तर ग्रामीण भागातील 67 रुग्णांचा समावेश आहे. त्यामध्ये 92 पुरूष तर 74 महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण 7300 कोरोनाबाधित आढळले असून त्यापैकी 3824 रुग्ण बरे झालेले असून 327 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने 3149 जणांवर उपचार सुरू आहेत. … Read more

औरंगाबादकरांसाठी अनलॉक ठरले अनलकी; ५ हजार ५१० ने वाढली रुग्णसंख्या

औरंगाबाद प्रतिनिधी | औरंगाबाद मध्ये कोरोनाचे आगमन झाले ७ मार्च पासून. ७ मार्च ला संशयीत रुग्ण आढळल्यानंतर त्या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तेव्हापासून कोरोनाने शहरात जाळे पसरविणे सुरू केले. त्यानंतर लॉकडाऊनचा पहिला टप्पा २५ मार्च पासून सुरू झाला. त्यानंतर चार टप्प्यात लॉकडाऊन करून १ जून पासून अनलॉक १ आणि अनलॉक २ सुरू झाले. पण याच … Read more

मोठी बातमी! औरंगाबाद मध्ये कर्फ्यू जाहीर; १० ते १८ जुलै दरम्यान संचारबंदी जारी

औरंगाबाद प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होते आहे. जिल्ह्यात रोज मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत आहेत या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात कर्फ्यू जाहीर करण्याचे ठरविले आहे. दिनांक १० जुलै ते १८ जुलै  या कालावधीत जिल्ह्यात कर्फ्यू असणार आहे. आज लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली त्या बैठकीत … Read more

कामावरून परतणाऱ्या तरुणाची दुचाकी गेली 50 फूट खोल विहिरीत; एकाचा मृत्यू

औरंगाबाद प्रतिनिधी | कंपनीतील काम आटोपल्यानंतर घरी जाणाऱ्या तरुणाची दुचाकी नियंत्रण सुटल्याने खोल विहिरीत पडली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्याला वाचविण्यात अग्निशमन दलाला यश आले. ही घटना कुंबेफळ शिवारात मध्यरात्री 12 च्या सुमारास घडली शुभम बबन यादव असे 22 वर्षीय मृत तरुणाचे नाव आहे तर गणेश दादाराव पवार असे 21 वर्षीय जखमी … Read more

कोरोनामुक्त झाल्यानंतर MIM च्या नेत्याची जंगी मिरवणूक; २०० जणांवर गुन्हा दाखल

औरंगाबाद प्रतिनिधी | माजी नगराध्यक्षने कोरोनावर मात केल्यानंतर उत्साही कार्यकर्त्यांनी आतषबाजी करीत जंगी मिरवणूक काढल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी वैजापूर शहरात घडला. या प्रकरणी सुमारे दोनशे जनांवर विविध कलमाखाली वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैजापुरचे माजी नगरअध्यक्ष व एमआयएम चे नेते अखिल शेख यांना कोरोनाची लागण झाली होती, शहरात उपचार केल्यानंतर ते कोरोनामुक्त … Read more

मनपा आयुक्तांची कोविड रुग्णालयास अचानक भेट; रुग्णांना मिळणाऱ्या सुविधांची केली चौकशी

औरंगाबाद प्रतिनिधी | एमआयडीसी’तर्फे चिकलठाण्यातील मेल्ट्रॉन कंपनीत उभारण्यात आलेल्या कोविड रुग्णालयात मनपा आयुक्त अास्तिककुमार पांडेय यांनी आज अचानकच भेट दिली. कोविड रुग्णालयात रुग्णांना सर्व सुविधा योग्य पद्धतीने मिळत आहेत कि नाही हे पाहण्यासाठी आयुक्तांनी याठिकाणी पूर्वकल्पना न देता भेट दिली. यावेळी पांडे यांनी येथील कोविड रुग्णांची त्यांनी आपुलकीने चौकशी केली. त्यावेळी रुग्णांच्या चेहऱ्यावर समाधान पाहावयास … Read more