खेळणी विक्रेत्याला दुकानातील नोकरानेच ४६ लाखांला  गंडवले…

औरंगाबाद प्रतिनिधी | घाऊक व्यापा-याशी हातमिळवणी करुन नोकराने मालकालाच ४५ लाख ६८ हजारांना गंडविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार दोनवर्षा पासून सुरू होता. फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यावर दुकानदाराने पोलिसात धाव घेतली. त्यावरुन नोकर दत्तप्रसाद सुभाषचंद्र लोया, घाऊक विक्रेता पंकज कैलाशचंद खंडेलवाल आणि त्याचा नोकर रवि शिवाजी पानखेडे यांच्याविरुध्द क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल … Read more

औरंगाबादेतील करीना वाघिणीचा कोरोनामुळे मृत्यू?

औरंगाबाद प्रतिनिधी । सिद्धार्थ उद्यानातील प्राणीसंग्रहालयातील करिना नावाची सहा वर्षीय वाघीण काही दिवसांपासून आजारी होती. तिचा आज बुधवारी   सकाळी साडेपाच ते सहा वाजे दरम्यान मृत्यू झाला. दोन दिवसांपासून तिने अन्नपाणी सोडले होते. मनापा आयुक्त तथा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी या वाघिणीची मंगळवारी पाहणी केली होती. या वाघिणीची कोरोना चाचणीही करण्यात आली होती, मात्र त्याचा … Read more

औरंगाबाद मध्ये 24 ते 26 जून दरम्यान रोजगार मेळाव्याचे आयोजन; मुलाखतींद्वारे मिळणार थेट नोकरी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र , औरंगाबाद यांच्यामार्फत ऑनलाइन पद्धतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन दिनांक 24 ते 26 जून 2020 दरम्यान करण्यात आले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाकडील नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने या ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे … Read more

धक्कादायक! १३ वर्षीय बालिकेचा १८ वर्षाच्या तरुणासोबत ठरला होता विवाह; पण आदल्या दिवशी…

औरंगाबाद प्रतिनिधी | शहरातील मुकुंदवाडी परिसरातील 13 वर्षीय बालिकेचा चिंचोली गावातील 18 वर्षीय तरुणासोबत 19 जून रोजी विवाह निश्चित करण्यात आला होता. 18 जूनला हळदीचा कार्यक्रम देखील पार पडला. खबऱ्याने चिकलठाणा पोलिसांना या विवाहाची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने पाऊल उचलत ही कारवाई केली. सर्वत्र कोरोनाचा लॉकडाऊन सुरू असल्याने अनेक ठिकाणी कमी नातेवाईकांच्या उपस्थितीत विवाह … Read more

अनैतिक संबंधातून जन्मलेल्या नवजात शिशूचा खून; आरोपींना दीड महिन्यानंतर अटक

औरंगाबाद प्रतिनिधी | अनैतिक संबंधातून जन्मलेल्या नवजात शिशूचा चौघांनी खून केल्याचा धक्कादायक उलगडा सिटीचौक पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. रतनलाल भोलाराम चौधरी , हरिषकुमार सुभाषलाल पालीवाल , गीता अजय नंद आणि गंगाबाई रतनलाल चौधरी अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने या आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. … Read more

लॉकडाऊनमध्ये पुण्याहून औरंगाबादेत घरी आलेल्या विद्यार्थ्याची आत्महत्या

औरंगाबाद प्रतिनिधी | लॉकडाऊनमुळे पुणे येथून औरंगाबादेत घरी आलेल्या प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या 20 वर्षीय विद्यार्थाने घरातील हॉल मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पुंडलीकनगर मधील गजानन कॉलोनी भागात घडली. आत्महत्येचे कारण मात्र समोर आलेले नाही पोलीस पुढील तपास करीत आहेत. विवेक भाऊलाल पांणकडे असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली अधिक … Read more

काकूंचा सोन्याच्या दागिन्यांनी ताट भरलेला व्हाट्सअ‍ॅप स्टेटस पाहिला आणि रचला कट..

औरंगाबाद प्रतिनिधी | सोशल मीडिया हा जीवनातील एक अविभाज्य घटक बनत चालला आहे.मुलांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत, सकाळी मॉर्निंगवॉक पासून ते रात्रीच्या गुडनाईट पर्यंत, सण असो वा मग त्यावेळी केलेली तयारी कपडे आभूषणे पर्यंत आपली सर्व दिनचर्या वयक्तिक माहिती नेटकरी सोशल मीडियावर पोस्ट करतात. मात्र यामुळे हत्या सारखा गंभीर गुन्हा ही घडू शकतो, हो हे खरे … Read more

३० हजाराची लाच घेताना दोन पोलीस कर्मचारी रंगेहात अटक

औरंगाबाद प्रतिनिधी | तीन हायवावर कारवाई न करण्यासाठी 30 हजाराची लाच स्विकारताना औरंगाबाद ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील दोन कर्मचऱ्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सावंगीबायपास वरील चौफुलीवर अटक केली. रामेश्वर कैलास चेडेकर आणि अनिल रघुनाथ जायभाय अशी लाच घेणाऱ्या पोलिसांची नावे आहेत. गेल्या १६ मार्च रोजी चिकलठाणा फुलंब्री हद्दीत डब्बर वाहतूकीच्या तीन हायवा ट्रकवर … Read more

दुहेरी हत्याकांडाचे गूढ उकलले; चुलत भाऊ, मेहुण्यानेच केली हत्या

औरंगाबाद प्रतिनिधी | बहीण-भावाच्या निर्घृण हत्येने शहराला हादरवून टाकले होते. या हत्येमागील रहस्य उलगडले असून घरात ठेवलेल्या किलोभर सोन्यासाठी चुलत भाऊ आणि त्याच्या मेहुण्यानेच ही हत्या केल्याचे स्पष्ठ झाले आहे. गुन्हेशाखेच्या पथकाने दोन्ही आरोपिना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून चोरी गेलेला माल पोलिसांनी जप्त केला आहे. सतीश काळूराम खंदाडे (रा.पाचन वडगाव), अर्जुन देवचंद राजपूत (रा.वैजापूर,) … Read more

औरंगाबादेत आणखी एका कोरोनाग्रस्ताचे रुग्णालयातून पलायन; ४८ तासांतील दुसरी घटना

औरंगाबाद प्रतिनिधी | हर्सूल कारागृहातील दोन कोरोनाबधित आरोपी किलेंअर्क येथील कोविड सेंटर मधून खिडकीचे गज कापून पसार झाल्याच्या घटनेला अवघे 48 तासही उलटत नाही तोच शासकीय घाटी रुग्णालयातील मेडिसिन विभागात आयसीयू मध्ये उपचार घेणाऱ्या 38 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाने आज सकाळी 6.45 च्या सुमारास रुग्णालयातून पळ काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे घाटी प्रशासनाचा हलगर्जीपणा … Read more