शहरात विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर ! इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याची निर्घृण हत्या

murder

औरंगाबाद – शहरातील नामवंत एमआयटी महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांची निर्घृण हत्या केल्याची घटना काल दुपारच्या सुमारास उघडकीस आली. विद्यार्थ्याचा गळा चिरून चेहरा दगडाने ठेचून विद्रूप करण्यात आला होता. कृष्णा शेषराव जाधव (22, रा. हडको) असे मृताचे नाव आहे. यामुळे शहरातील विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत असून, यामुळे शहरात एकच … Read more

शहरातील सिडको चौकात ट्रकने तरुणाला चिरडले

Accident

औरंगाबाद – औरंगाबाद शहरात दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. अपघाताचे प्रमाण कमी व्हावे यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत. सिडको चौकात झालेल्या भीषण अपघातात तरुण ठार झाला आहे. ही घटना आज दुपारी घडली. रोहित दिनकर नरवडे (वय 21) असे मृत तरुणाचे नाव आहे. मृत तरुण रमानगर येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. सिडको चौकातून मुंबई … Read more

एसटीच्या 12 कर्मचाऱ्यांना बजावल्या नोटीसा 

st bus

औरंगाबाद – एसटी महामंडळाने संपकरी कर्मचार्‍यांच्या बडतर्फीच्या कारवाईला सुरुवात केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात बारा कर्मचाऱ्यांना बडतर्फ का करण्यात येऊ नये, अशा नोटीस बजावण्यात आल्या असल्याची माहिती विभागीय नियंत्रक अरुण शहा यांनी दिली आहे. दुसरीकडे 15 कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या शासनात विलीनीकरणासाठी संप सुरूच आहे. या संपाच्या अनुषंगाने परिवहन मंत्री अनिल परब यांनी … Read more

लस प्रमाणपत्र नाही, पहिल्याच दिवशी 37 जणांना दंड

vaccine

औरंगाबाद – कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉन चा वाढता धोका लक्षात घेऊन लसीकरण लवकरात लवकर करण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना करत आहेत. त्या उपाययोजनेचा एक भाग म्हणून लस घेतल्याचे प्रमाणपत्र सोबत नसेल तर पाचशे रुपये दंड आकारण्याची मोहीम महापालिकेकडून कालपासून सुरू करण्यात आली. काल पहिल्या दिवशी मनपाच्या नागरी मित्र पथकाने दिवसभरात 1 हजार 755 नागरिकांचे प्रमाणपत्र तपासले. … Read more

शहरातील 80 टक्के नागरिक लसवंत

औरंगाबाद – कोरोना संसर्गाचा ओमिक्रॉन हा घातक विषाणू आढळून आल्यानंतर प्रशासनाने लसीकरणाची गती वाढविण्यासाठी विविध बंधने टाकली आहेत. त्यामुळे नागरिकांचा लसीसाठी प्रतिसाद वाढला आहे. आजघडीला शहरातील 80 टक्के नागरिक लसवंत झाले आहेत. गेल्या महिन्यात मात्र लसीकरणाची टक्केवारी 55 ते 60 एवढीच होती. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण व महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी लस नाही तर रेशन, … Read more

रिक्षाचालकाच्या मारहाणीत प्रवाशाचा मृत्यू; अवघ्या 10 रुपयांवरुन झालेला वाद ‘या’ कारणाने गेला टोकाला

औरंगाबाद – रिक्षातुन उरतल्यानंतर प्रवाशाने नेहमीप्रमाणे 10 रूपये भाडे दिले. ते भाडे घेण्यास रिक्षाचालकाने नकार देत पेट्रोल महागले आहे 20 रुपये दे अशी मागणी केली. यातुन झालेल्या बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले. यात प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना काल रात्री 7 वाजेच्या सुमारास घडली. मिर्झा मुजफ्फर हुसेन मिर्झा आली हुसेन (वय 52 रा. सईदा कॉलनी जटवाडा रोड) … Read more

राज्य व केंद्र सरकार गंभीर नसल्याने OBC वर अन्याय – खासदार जलील

jalil

औरंगाबाद – केंद्र आणि राज्य सरकार गंभीर नसल्याने ओबीसींवर केवळ अन्याय झाला आहे. आम्ही ओबीसी आरक्षणाला पाठिंबा देतोय, असे मत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले आहे. यासंदर्भात खासदार जलील यांनी ट्विट केले आहे. Sheer injustice on OBCs due to lack of seriousness of Central and State govt. We support OBC reservation.*BREAKING* … Read more

विद्यापीठातील विभाग आणि महाविद्यालयांमध्ये आता समान अभ्यासक्रम

bAMU

औरंगाबाद – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विविध विभाग आणि संलग्नित महाविद्यालयांमध्ये आता समान अभ्यासक्रम आणि समान परीक्षा असाव्यात असा निर्णय काल झालेल्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. याशिवाय परीक्षा कशा पद्धतीने घ्याव्यात, परीक्षा विभागाचे बजेट आदी प्रश्नांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, प्र-कुलगुरू डॉ. शाम शिरसाट, … Read more

शहरात बोगस लसीकरण प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

vaccine

औरंगाबाद – गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी लसीकरणासाठी सक्तीची मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. मात्र याचा फायदा घेत शहरात बनावट कोरोना लस देणारी टोळी सक्रीय झाली. 500 ते दोन हजार रुपयांना बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या तिघांना जिन्सी पोलीसांनी काल रंगेहाथ पकडले. त्यांनी आतापर्यंत 400 पेक्षा जास्त बोगस लस प्रमाणपत्रे दिल्याचे उघडकीस आले. विशेष म्हणजे घाटी रुग्णालयातील … Read more

ओबीसी आरक्षणाचा गोंधळ निवडणुका पुढे ढकलण्यासाठीच; औरंगाबादेत राज ठाकरे कडाडले

Raj Thackarey

औरंगाबाद – राज्यभरातील महानगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यासाठीच ओबीसी आरक्षणाचा गोंधळ सुरु आहे, असा थेट आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. आज औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेच्या पदाधिकाऱ्यांची मोठी बैठक पार पडली. त्यानंतर ते औरंगाबादमधील पत्रकारांशी संवाद साधत होते. निवडणुका पुढे ढकलण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार मुद्दाम ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून घोळ घालत असल्याचे … Read more