लाईटच्या डीपासाठी शेतकरी आक्रमक, अभियंत्याला कार्यालयातच कोंडले

mseb

औरंगाबाद – जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी अनेक दिवसांपासून स्वतंत्र विद्युत रोहित्र अर्थात लाइटच्या डीपीची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी अनेकदा आंदोलनही केले. मात्र शेतकऱ्यांची मागणी मान्य न झाल्यानुळे त्यांनी आज आक्रमक होत आंदोलन केले. वीज पुरवठा नसल्याने पाणीपुरवठ्या अभावी पिके धोक्यात आल्याने शेतकरी चांगलेच आक्रमक झाले. आज महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याशी त्यांची बाचाबाचीदेखील झाली. विद्युत रोहित्राच्या … Read more

कर्तव्यदक्षतेचा प्रवास ! केंद्रीय मंत्र्यांकडून विमानप्रवासात आपत्कालीन उपचार

karad

औरंगाबाद – मूळ डॉक्टर असलेले केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड पुन्हा एकदा गरजवतांच्या मदतीला धावून आल्याचे पाहायला मिळाले. सोमवारी विमान प्रवासादरम्यान मागील सीटवरील प्रवासी अचानक कोसळून पडल्याचे समजतातच डॉ. कराड यांनी तत्काळ प्रथमोपचार करत त्याला दिलासा दिला. डॉ. कराड यांच्या समयसूचकता आणि सेवाभावाचे सोशल मिडीयावर कौतुक होत आहे. ‘एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ’ ही … Read more

महापालिकेच्या तिजोरीत कोट्यवधींची भर

औरंगाबाद – राज्य शासनाने गुंठेवारी भागातील डिसेंबर 2020 पर्यंतची बेकायदा बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गुंठेवारी भागातील मालमत्ताधारकांना दिलासा मिळाला असतानाच महापालिकेला देखील मालामाल होत आहे. गुंठेवारी भागातील सतराशे प्रस्ताव दोन महिन्यात महापालिकेकडे दाखले झाले. त्यातील सातशे मालमत्ता नियमित करण्यात आल्या आहेत तर महापालिकेच्या तिजोरीत 17 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला असल्याचे नगर … Read more

रावसाहेब दानवे पुन्हा एकदा चर्चेत ! इंधन दरवाढीवर अजब दावा

danve

औरंगाबाद – केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे कायम आपल्या भाषणाच्या शैलीने आणि टोलेबाजीने चर्चेत असतात. यावेळेस ही दानवे हे त्यांच्या इंधन दरवाढीच्या अजब दाव्यामुळे चर्चेत आले आहेत. पेट्रोलच्या किंमती कॉंग्रेसच्या काळात जागतिक परिस्थितीसोबत जोडलेल्या आहेत. देशातील पेट्रोल-डीझेलच्या किंमती या अमेरिका ठरवते, केंद्र सरकार किंमती रोज खाली वर करत नाही, त्याचा दोष सरकारला देणे योग्य नाही, … Read more

NCB पथकाची नांदेडमध्ये मोठी कारवाई तब्बल 1127 किलो गांजा जप्त

ncb

नांदेड – मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकाने (NCB) नांदेड जिल्ह्यात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एनसीबीने तब्बल 1127 किलोग्रॅम गांजा जप्त केला आहे. तसेच दोन आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. विशेष म्हणजे या प्रकरणाचं विशाखापट्टणम कनेक्शन समोर आल आहे. गुजरातमध्ये जप्त करण्यात आलेल्या 3 हजार किलोग्रॅम ड्रग्ज प्रकरणात देखील विशाखापट्टणम कनेक्शन आढळले होते. एनसीबीने … Read more

विधानपरिषदेसाठी संजय केणेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

kenekar

औरंगाबाद – विधानपरिषदेच्या एका जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आज सोमवारी (ता.१५) भाजपतर्फे औरंगाबादचे भाजप शहराध्यक्ष संजय केनेकर यांनी मुंबईत विधान भवन येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी केणेकरांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आमदार अतुल सावे यांच्यासह पक्षाचे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उमेदवारी … Read more

लस न घेणाऱ्यांना दारू देऊ नये, जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

औरंगाबाद – लसीकरण वाढविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयावरून चर्चाना उधाण आले असताना आता यात आणखी एका गोष्टीची भर पडली आहे. ज्यांचे लसीकरण झालेले नाही त्यांना दारू देण्यात येऊ नये अशी मागणी दोनदा लोकसभेची निवडणूक लढवलेले सुरेश फुलारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या मागणीचे निवेदन त्यांनी ईमेलद्वारे काल रात्री जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे. त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले … Read more

इतिहासाचा आधारवड हरवला ! बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनाने एक अध्याय काळाच्या पडद्याआड – भागवत कराड

औरंगाबाद – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज पहाटे निधन झाले. त्यांनी नुकतेच 100 व्या वर्षात पदार्पण केले होते. त्यांच्या निधनानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी, ‘महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, साहित्यिक आणि कला परंपरा क्षेत्राला एका व्रतस्थ आणि ऋषीतुल्य अशा मार्गदर्शकाची उणीव कायम भासत राहील.’ … Read more

शहरात खुनांची मालिका सुरूच ! पोलीसपुत्रांच्या टोळक्याने केला निर्घृण खून

Murder

औरंगाबाद – औरंगाबाद शहर व परिसरात मागील काही महिन्यांपासून खुणांच्या घटनेत मोठ्या प्रमाणांवर वाढ झाली आहे. आता तर शहरात पोलिसांचे कुटुंब देखील सुरक्षित नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याला कारण म्हणजे पोलिस दलातील नारायण घुगे यांचा मुलगा योगेश घुगे (22, रा. शिवनेरी कॉलनी) याचा गुंडांच्या टोळक्याने निर्घृण खून केल्याची घटना काल पहाटे तीन … Read more

नवीन इमारतीच्या जागेसाठी मनपाची ‘शोधाशोध’

औरंगाबाद – महापालिकेच्या नव्या इमारतीचा प्रस्ताव गेल्या १० ते १२ वर्षांपासून धूळखात पडला आहे. मात्र प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी प्रशासकीय इमारतीचा विषय ऐरणीवर घेतला आहे. इमारतीसाठी जागेचा शोध घेतला जात आहे. महापालिकेने पद्मपुरा येथे पाच एकर जागा आरक्षित केली आहे. मात्र या जागेचा न्यायालयात वाद सुरू आहे. त्यामुळे शहरात इतरत्र जागांचा शोध घेतला जात आहे. … Read more