लस न घेणाऱ्यांना दारू देऊ नये, जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

औरंगाबाद – लसीकरण वाढविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयावरून चर्चाना उधाण आले असताना आता यात आणखी एका गोष्टीची भर पडली आहे. ज्यांचे लसीकरण झालेले नाही त्यांना दारू देण्यात येऊ नये अशी मागणी दोनदा लोकसभेची निवडणूक लढवलेले सुरेश फुलारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या मागणीचे निवेदन त्यांनी ईमेलद्वारे काल रात्री जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे.

त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले की, एकिकडे लोकांना लस मिळत नाही व दुसरीकडे आपण लस न घेणाऱ्यांचे राशन बंद केले, पेट्रोल बंद केले, गॅस बंद केले, परंतु असे केल्याने लोकांना लस मिळत नाही. लस घ्यायची तर जेवन करुन जावे लागते, जेवन केले नाही तर लस घेऊन चक्कर येऊन पडल्यास जबाबदार कोण, लस घरात मिळत नाही, गाडीवर दुर जाऊन घ्यायची असेल तर पेट्रोल मिळत नाही. शहरापासुन 50 कि मी चालत माणुस येईपर्यंत लस संपलेली असते, परत घरी गेला तर गॅस संपलेला, मग तो आधिच उपाशी थकलेला असेल तसेच लाकडे जाळुन चुल पेटवली तर परत प्रदुषण होऊन लोकांची प्रतीकार शक्ती कमी होते, त्यामुळे आपण या सर्व बाबीवर पुणर्विचार करावा.

तसेच लसीकरण जलद गतीने करण्यासाठी ज्यांनी लस घेतली नसेल त्यांना दारु देऊ नये, याविरुद्ध जो देईल त्याचा परवाना रद्द करावा म्हणजे ते चेक करुनच दारु देतील व लसीकरनाचा वेग वाढेल व कोणाची अडचन होणार नाही. तसेच या मागणीचा गांभिर्याने विचार करुन तत्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी सुरेश फुलारे यांनी केली आहे.

You might also like