पद्मश्री मोहम्मद शरीफ यांना राम मंदिर भूमिपूजनाचे निमंत्रण; जाणून घ्या त्यांची प्रेरणादायी कहाणी

अयोध्या । अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार असून यासाठी मान्यवरांना निमंत्रण पाठवण्यास सुरूवात झाली आहे. यामध्ये २७ वर्षांपासून बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या पद्मश्री मोहम्मद शरीफ यांनाही निमंत्रण पाठवण्यात आलं आहे.“मोहम्मद शरीफ असे व्यक्ती आहेत जे बेवारस मृतदेहांवर … Read more

‘राम मंदिराचे भूमिपूजन याआधीचं राजीव गांधींच्या हस्ते पार पडलंय’- दिग्विजय सिंह

भोपाळ । अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाला अवघे काही तास शिल्लक राहिले असताना आता या मुद्द्यावरून राजकारण तापायला सुरु झाले आहे. राम मंदिराचे भूमिपूजन अगोदरच झाले आहे. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी केले असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केले आहे. याशिवाय मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनीही अयोध्येत राम मंदिर उभारले जावे, अशी … Read more

राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा घरोघरी दिवाळीसारखा साजरा करा! पण.. – चंद्रकांत पाटील

मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या येथे राम मंदिराचा पायाभरणी समारंभ ५ ऑगस्ट रोजी होत असून आयुष्यातील हा महत्त्वाचा दिवस सर्वांनी वैयक्तिक पातळीवर घरोघरी दिवाळीसारखा साजरा करावा. मात्र, सामुहिक उत्सव टाळावा आणि कोरोनाचे भान ठेवावे, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. राममंदिराचे भूमिपूजन आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा दिवस आहे. अयोध्या … Read more

उमा भारतींना सतावतेय कोरोनाची चिंता! राम मंदिर भूमिपूजनाला न जाण्याचा घेतला निर्णय

भोपाळ । देशात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. तसेच राजकीय नेते आणि मंत्र्यांनाही कोरोनाची लागण होत आहे. कालच देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमस्थळी उपस्थित न राहण्याचा निर्णय भाजप नेत्या उमा भारती यांनी घेतला आहे. करोना संसर्ग होऊ नये या काळजीपोटी उमा … Read more

शिवसेनेची वचनपूर्ती! राम मंदिर निर्माणासाठी अशी केली मदत

मुंबई । अयोध्येत ५ ऑगस्टमध्ये राम मंदिराचे भुमिपूजन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिर जाणार उभारणीच्या कामाचा शुभारंभ होणार आहे. राम जन्मभूमी आंदोलनातील अनेक मान्यवरांना या भूमिपूजनाचे निमंत्रण दिले आहे. मात्र , शिवसेना प्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भूमिपूजनाचे आमंत्रण न मिळाल्याने वाद निर्माण झाला होता. दरम्यान शिवसेनेने राम मंदिर निर्माणासाठी … Read more

राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा धुमधडाक्यात व्हायला हवा!- राज ठाकरे

मुंबई । । अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामाला लवकरच सुरूवात होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी मंदिराचं भूमिपूजन होणार आहे. दरम्यान, देशावर कोरोनाचं संकट कायम असताना राम मंदिराचे भूमिपूजासाठी ही योग्य वेळ नसल्याचे सांगत विरोधकांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाच्या … Read more

अयोध्येत बुद्धविहाराची उभारणी करा!- रामदास आठवलेंची मागणी

पुणे । अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु आहे. येत्या ५ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिर उभारणीच्या कामाचे उदघाटन होणार आहे. दरम्यान, देशात कोरोनाचे संकट असतांना हा सोहळा पार पडत असल्यानं विरोधक टीका करत असताना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वेगळा सूर लावला आहे. अयोध्येत बुद्धविहार … Read more

श्रीराम जन्मभूमी ट्रस्ट वाद: निर्वाणी आखाड्याने धाडली PMOला नोटीस; केली ‘ही’ मागणी

जयपूर । श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टमध्ये स्थान मिळावे यासाठी निर्वाणी आखाड्याने पुन्हा एकदा प्रयत्न सुरू केले आहेत. निर्वाणी आखाड्याचे महंत धर्मदास यांनी पंतप्रधान कार्यालयाला नोटीस धाडली आहे. निर्वाणी आखाड्याचा सहभाग हा रामजन्मभूमी वादाच्या कायदेशीर लढाईत फारच महत्त्वाचा होता असे आखाड्याने नोटीशीत म्हटले आहे. याशिवाय येत्या २ महिन्यामध्ये आपल्या नव्या राम मंदिरात पुजारी म्हणून घेण्याचा निर्णय … Read more

अयोध्येत दिपोत्सव; राम मंदिर भूमिजनाला पंतप्रधान उपस्थित राहणार- योगी आदित्यनाथ

अयोध्या । अयोध्येत ४ आणि ५ ऑगस्टला दिपोत्सव होणार आहे. राम मंदिर भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण अयोध्या दिव्यांनी उजळणार आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी या भूमिपूजन सोहळ्याला येणार आहे, अशी माहिती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली. योगी आदित्यनाथ हे आज सकाळी अयोध्येत पोहोचले. त्यांनी राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला. त्यांनी सर्व प्रथम … Read more

राम मंदिराचे बांधकाम सुरू होताच कोरोना महामारी संपेल; मध्यप्रदेश विधानसभा अध्यक्षांचं तर्कट

भोपाळ । जगासह भारतात कोरोनाचं संकट दिवसेंदिवस भीषण होत चाललं आहे. देशात आतापर्यंत १२ लाखांपेक्षा जास्त नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. दररोज आढळून येणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या प्रचंड वाढताना दिसत आहे. अशावेळी संपूर्ण जग कोरोना महामारिला नष्ट करण्यासाठी लस शोधण्यात लागलं असताना भाजपाचे नेते व मध्य प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष रामेश्वर शर्मा यांनी एक अजब … Read more