पद्मश्री मोहम्मद शरीफ यांना राम मंदिर भूमिपूजनाचे निमंत्रण; जाणून घ्या त्यांची प्रेरणादायी कहाणी

0
55
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अयोध्या । अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार असून यासाठी मान्यवरांना निमंत्रण पाठवण्यास सुरूवात झाली आहे. यामध्ये २७ वर्षांपासून बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या पद्मश्री मोहम्मद शरीफ यांनाही निमंत्रण पाठवण्यात आलं आहे.“मोहम्मद शरीफ असे व्यक्ती आहेत जे बेवारस मृतदेहांवर मोफत अंत्यसंस्कार करतात. यासाठी त्यांना राष्ट्रीय स्तरावरही सन्मानित करण्यात आलं आहे. ते अयोध्येचे निवासी आहेत आणि आम्ही त्यांना आमंत्रित केलं आहे”, असं राम जन्मभूमी ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी सांगितलं.

या दुःखद घटनेनेनतंर शरीफ चाचांनी मृतदेहांवर अत्यसंस्कार करायला सुरूवात
शरीफ यांचा एक मुलगा वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत होता. तो सुल्तानपूरमध्ये गेला असताना त्याची हत्या करुन मृतदेह फेकून देण्यात आला. नातेवाईकांनी त्याचा बराच शोध घेतला, पण मृतदेह सापडला नाही. तेव्हापासून शरीफ बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करत आहेत. मागील २७ वर्षांपासून मोहम्मद शरीफ हिंदू-मुस्लिम किंवा अन्य कोणताही धर्म न बघता बेवारस मृतदेहांवर अत्यसंस्कार करत आहेत. आतापर्यंत त्यांनी जवळपास २५ हजारांहून जास्त बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. स्थानिक लोकांमध्ये ते ‘शरीफ चाचा’ नावाने ओळखले जातात. ‘जोपर्यंत जीवंत आहे तोपर्यंत बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करत राहणार, कारण या सेवेमुळे मला आनंद मिळतो’, असं शरीफ चाचा म्हणतात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here