‘त्या’ अनुभवानंतर राज्यपाल आता पहाटे कोणतीच गोष्ट करत नसतील; जयंत पाटलांनी चोळलं जखमेवर मीठ

पुणे । गतवर्षी संबंध महाराष्ट्र साखर झोपत असताना अजित पवार यांना हाताशी धरुन भाजपकडून करण्यात आलेल्या सत्तास्थापनेच्या अयशस्वी प्रयोगाला आज १ वर्ष पूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी महाविकासघाडीतील नेत्यांनी शपथविधीच्या आठवणींना उजाळा देत एकप्रकारे भाजपच्या जखमेवर मीठ चोळले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनीही पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबत मिश्किल टिप्पणी केली. त्या अनुभवानंतर राज्यपाल … Read more

कोरोनामुळं कैद्यांना नातेवाईकांना भेटण्याची परवानगी नाही, म्हणून अर्णब यांनाही.. – गृहमंत्री देशमुख

मुंबई । कोरोना संकटात कैद्यांना नातेवाईकांना भेटण्याची परवानगी नाही. गेली ४ महिने कैदी आपल्या नातेवाईकांना भेटले नाहीत. त्यामुळं अर्णब गोस्वामी यांना त्यांच्या कुटुंबाला तुरुंगात भेटता येणार नसल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले. अर्णब गोस्वामींच्या सुरक्षेची चौकशी करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देशमुखांना फोन केला होता. अर्णब यांना कुटुंबियांना भेटु द्यावे असे ते म्हणाले. त्यावर … Read more

राज्यपाल लहानसहान गोष्टींमध्येही लक्ष घालतायत याचा आनंद; अर्णब गोस्वामी प्रकरणावर भुजबळांचा टोला

नाशिक । राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पत्रकार अर्णव गोस्वामी यांची चिंता करू नये. सरकारी नियमांनुसार त्यांची योग्यप्रकारे काळजी घेतली जात आहे, असे वक्तव्य राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी केले. राज्यपाल लहानसहान गोष्टींमध्ये लक्ष घालत आहेत, ही चांगली गोष्ट आहे, असा टोलाही छगन भुजबळ यांनी लगावला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सोमवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन … Read more

भाजपने जिझवले पुन्हा राजभवनाचे उंबरठे; अर्णब गोस्वामी प्रकरणात राम कदमांनी केली हस्तक्षेपाची विनंती

मुंबई । अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी बुधवारी रायगड पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामीला अटक केली. त्यानंतर राज्यासह देशभरात भाजपा कार्यकर्त्यांनी ठाकरे सरकारविरोधात आंदोलन केले. अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या निषेधार्थ भाजपा कार्यकर्त्यांनी राज्यातही ठिकठिकाणी आंदोलन केले. महाराष्ट्रात आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप भाजपाने केला आहे. याबाबत आमदार राम कदम यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. … Read more

राज्यपाल नियुक्त सदस्य निवड: ‘राज्यापालांकडे संविधानिक अधिकार, त्याचं ऐकावंच लागेल’- चंद्रकांत पाटील

पुणे । राज्यपाल नियुक्त सदस्यत्वासाठी १२ जणांच्या नावाची यादी लवकरच मुख्यमंत्री राज्यपालांकडे पाठवणार आहेत. याविषयी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ‘राज्यापालांकडे संविधानिक अधिकार आहेत त्याचं ऐकावंच लागेल’, असं सूचक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. पुण्यातील पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील बोलत होते. राज्यपाल भाजपला झुकतं माप देतात अशी चर्चा होतेय असा … Read more

कोणाला लागणार आमदारकीची लॉटरी? मुख्यमंत्री आज राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची यादी राज्यपालांना सोपवणार

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना विधानपरिषदेसाठी राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची यादी सोपवणार आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या नावांना राज्यपाल मंजुरी देणार की खोडा घालणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. मात्र राज्यपाल कुठल्या निकषांवर आणि घटनात्मक तरतुदींवर बोट ठेवून सरकारची कोंडी करु शकतात यावर लक्ष असेल. यासाठी सरकारने सावध पवित्रा घेतला आहे. … Read more

मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्री न्याय देत नाहीत म्हणून राज्यपालांना भेटावं लागत; भाजपचा पलटवार

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याचे प्रमुख असताना राज ठाकरे यांनी राज्यपालांना भेटणे अयोग्य आहे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. त्यावर भाजपनं पलटवार केला आहे. ‘मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्री न्याय देत नाहीत, मुख्यमंत्र्यांनी कामं केली तर नेत्यांना आणि सामान्यांना राज्यपालांची भेट घेण्याची गरज नाही,’ असा टोला भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेना … Read more

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आले गोत्यात, हायकोर्टाकडून अवमानाची नोटीस जारी

मुंबई । महाराष्ट्रातील मंदिरं उघडण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून वाद ओढवून घेतल्यानंतर, आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात कोर्टाच्या अवमानाची नोटीस जारी करण्यात आली आहे. उत्तराखंड हायकोर्टाने मंगळवारी कोश्यारींना अवमानाची नोटीस पाठवली आहे. थकबाकी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही नोटीस पाठवली आहे. कोश्यारी यांना चार आठवड्यात उत्तर … Read more

‘गोव्याच्या राज्यपाल पदाचा पदभारही तुम्ही सांभाळता, तेथील मुख्यमंत्र्यांनाही असंच पत्र लिहिलं का?’- बाळासाहेब थोरात

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari)यांनी लिहिलेल्या पत्रावरून निर्माण झालेल्या वाद मिटताना दिसत नाही आहे. मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरांत (balasaheb thorat) यांनी थेट राज्यपालांच सवाल केला आहे. भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे गोव्याच्या राज्यपाल पदाचा पदभार असून, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनाही असंच पत्र लिहिलं आहे का?,” असा प्रश्न … Read more

‘देव भूमीतून आलेल्या राज्यपालांकडून तुम्हाला प्रमाणपत्राची खरंच गरज’, शेलारांनी शेलकी टीका

ashish shelar uddhav thakarey

मुंबई । राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील मंदिरं सुरु करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं. त्या पत्रात कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाची आठवण करुन दिली. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खरमरीत शब्दात राज्यपाल कोश्यारी यांना पत्र लिहिलं. माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची गरज नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही गरज नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात … Read more