उपवासाच्या दिवशी पाठवले बटर चिकन ; झोमॅटोला भरावा लागला ५५ हजार दंड

पुणे  प्रतिनिधी |उपवासाच्या दिवशी एकदा नव्हे दोनदा उपवासाच्या पदार्था ऐवजी बटर चिकन पाठवल्याने संतप्त झालेल्या व्यक्तीने ग्राहक न्यायालयात फिर्याद दाखल केल्याने झोमॅटो आणि संबधित हॉटले चालकाला ५५ हजार रुपयांचा दणका बसला आहे. धार्मिक भावना दुखवल्याने न्यायालयात गेलेल्या व्यक्तीच्या बाजूने न्यायालयाने निकाल दिल्याने पुण्यात या घटनेची चर्चा सर्वत्र चवीने चगळली जाऊ लागली आहे. षण्मुख देशमुख हे पुण्याचे … Read more

वंचितमध्ये फूट पाडण्यात विरोधक यशस्वी ? ; लक्ष्मण मानेंची वेगळ्या गटाची घोषणा

पुणे प्रतिनिधी | वंचित बहुजन आघाडीतून लक्ष्मण माने यांनी फारकत घेऊन नवीन वंचित बहुजन आघाडी स्थापन करण्याची घोषणा आज पुण्यात केली आहे. या घोषणे बरोबरच वंचित बहुजन आघाडीचे दोन गट पडल्याचे आज जाहीर झाले आहे. १९५७ साली झालेल्या निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या दलित चळवळीतून स्थापन झालेल्या पक्षाने लोकसभेच्या महाराष्ट्रात ७ जागा जिंकल्या. त्यानंतर तत्कालीन … Read more

नितेश राणेंचा फिल्मी राडा ; अधिकाऱ्याला घातली चिखलाने अंघोळ

कणकवली प्रतिनिधी | आज तळ कोकणातील कणकवली शहरात फिल्मी हाय होल्टेज ड्रामा बघायला मिळाला आहे. आमदार नितेश राणे यांनी महामार्गाच्या रस्तांची झालेली दुरवस्था बघून येथील महामार्ग उपभियांता प्रकाश शेडकर यांना चिखलाने अंघोळ घालण्याचा प्रताप केला आहे. महामार्गाची झालीली दुरवस्थेला येथील अधिकारीच जबाबदार आहेत असे राणेंना वाटते म्हणून त्यांनी अशा प्रकारे अधिकाऱ्यांना समज देण्याचा प्रकार केला आहे. … Read more

भाजप शिवसेना पैसे खाते ; ‘या’ आमदाराने केला आरोप

मुंबई प्रतिनिधी |”शिवसेना भाजप नाल्यात पैसे खाते म्हणून मुंबईत पाणी जाते” असे म्हणून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुंबई महानगर पालिकेच्या कारभावर चांगलीच टीका केली आहे. नाला सफाईची कामे व्यवस्थित केली जात नाहीत. त्यामुळे नाले तुंबतात आणि मुंबईकरांना पावसाच्या पाण्याचा त्रास सहन करावा लागतो असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. नाल्यात पाणी व्यवस्थित जात नसल्यानेच मुंबईची लोकल … Read more

टोल फ्लाझ्याची सफाई करण्याऱ्या कर्मचाऱ्याला ट्रकने चिरडले

सातारा प्रतिनिधी | सकलेनमुलाणी,  आनेवाडी टोल नाक्यावर टोल ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या डोक्यावरून मालट्रकची पाठीमागील चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडला. हैबत दत्तोबा मोरे राहणार (मोरेवाडी) असे या मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे हैबत मोरे नाक्यावरील टोल ट्रॅकची सफाई … Read more

माझ्या आडनावामुळे मला ‘ते’ पद मिळाले नाही : गिरीश महाजन

जळगाव प्रतिनिधी | भाजपच्या विस्तार सभेत बोलताना गिरीश महाजन यांनी एक दिलखुलास किस्सा सांगितला आहे. आडनावामुळे आपल्याला भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष पद मिळाले नाही अशी खंत गिरीश महाजन यांनी बोलून दाखवली आहे. बार्शीत कोणाची होणार सरशी ; सोपल , राऊत लागले आमदारकीच्या कामाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून मी राजकारणात आलो. भाजयुमोचा गावातील शाखेचा अध्यक्ष … Read more

बार्शीत कोणाची होणार सरशी ; सोपल , राऊत लागले आमदारकीच्या कामाला

बार्शी प्रतिनिधी | सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय पटलावर महत्वाचा असणारा विधानसभा मतदारसंघ आणि मराठवाड्याचे प्रवेश द्वार म्हणून प्रसिद्ध असणारे शहर म्हणजे बार्शी. या शहरात बाजारपेठेचा झालेला विकास , शिक्षणाचे वाढलेले जाळे आणि विकसित झालेल्या सरकारी आणि वैद्यकीय सुविधा यामुळे शहरातचा पंचकृषीत चांगलाच लौकिक आहे. याच बार्शी मतदारसंघात दिलीप सोपल विरुद्ध राजेंद्र राऊत असा सामना रंगतो. दिलीप … Read more

पुण्यात सिंहगड रोडला जॉगिंग ट्रॅक कोसळला ; २४ तासात दुसरी घटना

पुणे प्रतिनिधी | सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक येथील फनटाईम सिनेमागृह जवळील कॅनॉल लगत असणारा जॉगिंग ट्रॅक कोसळल्याची घटना आज शनिवारी सकाळी आठ वाजता घडली. मागील तीस तासापासून पुण्यात सतत पाऊससुरु असल्याने अशा घटना घडत आहेत. हा जॉगिंग ट्रॅक पुणे मनपाच्या वतीने उभारण्यात आला होता. सुदैवाने यात कोणतीही जीवितहाणी झाली नाही. या अपघातात जीवित हाणी नसली तरी … Read more

स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सरकारच्या विरोधात अर्धनग्न मोर्चा

औरंगाबाद प्रतिनिधी | राज्य शासनाचे महापोर्टल बंद करण्यात यावे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्या मान्य करण्यासाठी स्पर्धा परीक्षेच्या विद्यर्थ्यांनी अर्धनग्न मोर्चा काढला होता. औरंगाबाद मधील पैठण गेट पासून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली होती. तर विभागीय आयुक्तांना मागण्यांचे निवेदन देऊन या मोर्चाची सांगता करण्यात आली. या मोर्चात स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. … Read more

Breking |जमिनीच्या वादातून ३ साडूमध्ये हाणामारी ; एकाच मृत्यू

औरंगाबाद प्रतिनिधी | जमिनीचा वाद टोकाला गेल्याने भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि यात एकाच मृत्यू झाल्याची घटना वैजापूर तालुक्यातील डागपिंपळगाव सेटवस्तीवर घडली आहे. अशोक बापूराव डांगे ( वय ५६ ) असे मृताचे नाव आहे. मृतांचा मृतदेह शव विच्छेदन क्रियेसाठी पाठवला असून पोलीस या प्रकरणा बाबत अधिक तपास करत आहेत. या भांडणात दोन साडूनी मिळून तिसऱ्या साडूचा … Read more