वंचितमध्ये फूट पाडण्यात विरोधक यशस्वी ? ; लक्ष्मण मानेंची वेगळ्या गटाची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी | वंचित बहुजन आघाडीतून लक्ष्मण माने यांनी फारकत घेऊन नवीन वंचित बहुजन आघाडी स्थापन करण्याची घोषणा आज पुण्यात केली आहे. या घोषणे बरोबरच वंचित बहुजन आघाडीचे दोन गट पडल्याचे आज जाहीर झाले आहे. १९५७ साली झालेल्या निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या दलित चळवळीतून स्थापन झालेल्या पक्षाने लोकसभेच्या महाराष्ट्रात ७ जागा जिंकल्या. त्यानंतर तत्कालीन काँग्रेसच्या नेत्यांनी या पक्षात फूट पडायला सुरुवात केली. आज आपणास आरपीआयचे जे गट दिसतात. ते याच राजकीय संघर्षाचे फलित आहे. याच इतिहासाची पुनरावृत्ती आज पुन्हा नव्याने झाली आहे.

वंचित आघाडीने लोकसभा निवडणुकीत ४१ लाख एवढे मतदान आपल्या नावावर पाडले. तर आघाडीच्या १० जागीच निकाल थंड पादहले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे स्वतः नांदेड मधून निवडणूक हारले. तर त्यांच्या पराभवाचा शिल्पकार दुसरा तिसरा कोणता पक्ष नसून तो पक्ष वंचित आघाडीचं आहे. अशा परिस्थितीत विरोधकांना वंचित आघाडीत फूट पाडण्याशिवाय कोणातच पर्याय दिसत नसावा म्हणून त्यांनी लक्ष्मण माने यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून प्रकाश आंबेडकर यांच्यावर गोळी झाडली आहे. आता या गोळीने प्रकाश आंबेडकर घायाळ होणार का पुन्हा सावरून त्यांचे नेतृत्व तळपणार हे आगामी काळातच समजणार आहे.

प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत धोरणात्मक मतभेद आहेत. लोकसभा निवडणुकीत आम्हाला भोपळा फोडता आला नाही. त्यामुळे इथून पुढे देखील आम्हाला भोपळाच मिळाला असता म्हणून आम्ही बाजूला निघण्याचा निर्णय घेत आहे. आता मला नव्याने वंचितांची बांधणी करावी लागणार आहे. तर वंचित पासून वेगळे होण्यासाठी उशीर झाला असे देखील लक्ष्मण माने म्हणाले आहेत.

Leave a Comment