शहरात भर दिवसा घरफोडी ! प्रसूतीसाठी रुग्णालयात गेलेल्या दाम्पत्याचे फोडले घर

gharfodi

औरंगाबाद – पत्नीला प्रसूतीकळा येत असल्याने पती- पत्नी दोघेही रुग्णालयात गेले.मात्र हीच संधी साधून चोरट्याने घरातील सोन्याच्या अंगठ्या, रोख रक्कम, लॅपटॉप,टीव्ही मिक्सर लंपास केले.विशेष म्हणजे एका खेपेत एवढे साहित्य नेता न आल्याने चोरट्याने कपडे बदलून येऊन पुन्हा त्याच घरातील साहित्य लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार देवळाई परिसरातील कीर्तिका रेसिडेन्सीमध्ये घडला. चोरटा सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. … Read more

पंधरा हजारांची लाच घेताना ‘कुबेर’ रंगेहाथ एसीबीच्या जाळ्यात

ACB

औरंगाबाद – खुलताबाद तालुक्यातील राजाराय टाकळी सज्जाचे तलाठी कैलास कुबेर याने २५ हजार रुपयांची लाच याचिकाकर्त्याला मागितली. तडजोडीअंती यातील १५ हजार रुपये स्विकारताना त्याच्यासह एकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात पकडले. कैलास कुबेर आरोपी तलाठी कैलास तुळीराम कुबेर (ता. खुलताबाद) व राजेश तावजी बांडे (रा. राधास्वामी कॉलनी, जटवाडा रोड) याच्याविरुद्ध खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा … Read more

एसीबीची कारवाई : बिलाच्या 3 टक्केप्रमाणे लाच घेताना वीज वितरणचा अभियंता रंगेहाथ सापडला

ACB

फलटण | वीज कंपनीत केलेल्या कामाचे 13 लाख रुपयांचे बिल पुढील कार्यालयात मंजुरीला पाठवण्यासाठी 39 हजारांची लाच घेताना फलटणच्या वीज वितरण कार्यालयातील कार्यकारी अभियंता मंदार प्रकाश वग्याणी (वय 41, सध्या रा. फलटण, मूळ रा. वर्धमान, सोना क्लीनिक जवळ, आप्पासाहेब पाटीलनगर, आमराईच्या मागे, सांगली) याला सातारा लाचलुचपतच्या (एसीबी) अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. बिलाच्या 3 टक्केप्रमाणे लाचेची मागणी … Read more

पोलिस दलात खळबळ : फाैजदारांच्या पतीसह एक पोलिस लाच स्विकारताना सापडले

Crime

सातारा | खटाव तालुक्यातील औंध येथे सोमवारी दुपारी लाचलुचपत विभागाने सापळा लावून 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना औंध पोलीस ठाण्यातील पोलिस कॉन्स्टेबल व पोलिस उपनिरीक्षक यांचा पती यांच्यावर कारवाई करत दोघांना अटक केली. खटाव तालुक्यातील ही तीन दिवसातील दुसरी घटना असून या कारवाईने पोलीस दलासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे याबाबत लाचलुचपत विभागाकडून मिळालेली माहिती अशी … Read more

तिसंगीतील तलाठ्यास 6 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले

सांगली | आजोबांच्या वारसाची बक्षीस पत्राची हक्क अधिकार पत्रकात नोंद धरण्यासाठी सहा हजार रुपयांची लाच घेताना कवठेमहांकाळ तालुक्यातल्या तिसंगी येथील तलाठ्यास लाच लुचपत विभागाने रंगेहात जेरबंद केले. रामू पांडुरंग कोरे असे त्या लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. तिसंगीतील तलाठी कार्यालयातच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून सदरची कारवाई केली. तक्रारदार यांच्या आजोबांनी तक्रारदार व त्यांची आई … Read more

कोरोना सेंटरमध्ये दाखल करुन घेण्यासाठी पैसे मागणार्‍यांविरोधात तक्रार दाखल करा – सहाय्यक पोलिस आयुक्त कवडे

DYSP sagar Kawade

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शासनाने सर्व कोविड सेंटरला सक्त ताकीद दिली असून, कोणीही शासनाच्या कोविड सेंटरमध्ये दाखल करून घेण्यासाठी पैसे घेऊ नये असे म्हटलेले आहे. तरीही, महापालिकेच्या एका कोविड सेंटरमध्ये दाखल करून घेण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांनी एक लाख रुपये घेतल्याचा प्रकार चिंचवड येथे उघडकीस आला आहे. महापालिकेच्या कोविड रुग्णालयात रुग्णांना विनाशुल्क दाखल केले जात असताना … Read more

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गावातील तलाठी लाचप्रकरणी निलंबित

बारामती | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी (ता.बारामती) गावातील तलाठी लाचप्रकरणी निलंबित झाला आहे. विहिरीची सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी लाच घेतल्याच्या कारणावरुन महसुल विभागाने संबंधित तलाठ्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. महेश मोटे असे कारवाई करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव असून या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली. काटेवाडी येथील शेतकरी विकास धायगुडे हे विहिरीची सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी … Read more

सहकार अधिकारी लाचेच्या सापळ्यात अडकला; 20 हजाराची लाच घेतांना पकडले

औरंगाबाद प्रतिनिधी |  संस्थेविरुध्द तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने त्या संस्थेचा सकारात्मक अहवाल देण्यासह प्रशासक न नेमण्यासाठी वीस हजाराची लाच स्विकारणा-या सहकार अधिका-याला मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास अ‍ॅन्टी करप्शन विभागाने रंगेहाथ पकडले. वाल्मिक माधव काळे असे सहकार अधिका-याचे नाव आहे. मत्स्य व दुग्ध कार्यालयात सहकार अधिकारी म्हणून वाल्मिक काळे कार्यरत आहे. एका संस्थेविरुध्द सहकार अधिकारी काळेकडे तक्रारी … Read more

बार्शीत भूमी अभिलेख कार्यालयातील परिक्षकाला लाच घेताना रंगेहात पकडले

सोलापूर प्रतिनिधी । बार्शीतील भूमी अभिलेख कार्यालयातील परिक्षक भूमापक कुरेशी यांना एक हजाराची लाच घेताना अटक पोलिसांनी अटक केली आहे. तक्रारदार यांनी त्यांचे बार्शी येथील मालमत्तेवर कर्ज घेतले होते. सदर कर्जाच्या बोजाची मालमत्ता पत्रकावर नोंद घेऊन ते मालमत्ता पत्रक देण्यासाठी लिपीक कुरेशी व खाजगी इसम सुधीर लोंढे यांनी १ हजार रूपये लाचेची मागणी केली होती. … Read more

शेतकऱ्याकडून लाचेची मागणी भोवली; नाफेडच्या ग्रेडर व सहाय्यकाविरुद्ध एसीबीची कारवाई

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे शेती उत्पादीत मालाला भाव देण्यासाठी प्रतवारी च्या नावाखाली शेतकऱ्यांकडून प्रति क्विंटलासाठी खरेदीसाठी १०० रुपयांची लाचेची मागणी करणाऱ्या एका ग्रेडरसह सहाय्यका विरुद्ध शेतकऱ्याच्या तक्रारीनंतर गुरुवारी एसीबीने सापळा रचत कारवाई केली. यामध्ये परभणी खरेदी-विक्री संघाच्या ताडकळस परिसरातील कापूस केंद्रावरील नाफेडचा ग्रेडर व सहाय्यक लाच घेताना रंगेहात पकडले गेले आहेत. जिल्ह्यात खरेदी केंद्रावर … Read more