१४ एप्रिलनंतर ग्रामीण भागातील लॉकडाउन सरकारने उठवावा- राजू शेट्टी

कोल्हापूर । करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशासह राज्यात २१ दिवसांचा लॉकडाउन लागू आहे. याचबरोबर कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद आहेत. जीवनाश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहन वगळता राज्यात जिल्ह्यांतर्गत वाहतूक पूर्णपणे बंद आहे. येत्या १४ एप्रिलला घोषित केलेला २१ दिवसांचा लॉकडाउन संपणार आहे. मात्र, राज्यातील कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता प्रशासन आणखी … Read more

पुण्यात नगरसेवकाकडून ४ हजार कुटुंबांना धान्य वाटप

पुणे । कोरोनामुळे देशभरात लॉकडाउन लागू आहे. अशा परिस्थितीत हातावरचे पोट असणाऱ्या लोक आर्थिक संकटात सापडले आहेत. दोन वेळच्या जेवणाची त्यांना भ्रांत पडली आहे. अशावेळी पुण्यातील ४ हजार कुटुंबांना धान्याचे वाटप करण्यात आले. गुलटेकडी भागातील डायस प्लॉट, मीनाताई ठाकरे वसाहत, संदेशनगर एसआरए झोपडपट्टीत आदी भागात हे धान्य वाटप करण्यात आलं आहे. गेल्या सहा दिवसांपासून टप्प्याटप्प्याने … Read more

कोल्हापूरात आणखी एक कोरोनाग्रस्त सापडला; संख्या ३ वर

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोल्हापूरमध्ये आणखी एक कोरोनाबाधित रुग्ण सापडला असून कोरोनाग्रस्तांची संख्या आता ३ वर गेली आहे. कसबा बावडा येथील ६५ वर्षीय महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात एकही नवा रुग्ण आढळला नव्हता. मात्र, आज नवा रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.कोरोना बाधित महिला ही कसबा बावड्यातील मराठा कॉलनीतील … Read more

देशात करोनाबाधितांची संख्या ४०६७ वर, १०९ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली । देशभरात करोनाचा संसर्ग झपाट्यानं वाढत असून करोनाबाधितांची संख्या ४०६७ वर पोहोचली आहे. तर १०९ जणांचा आतापर्यन्त मृत्यू झाला आहे असून मागील २४ तासात ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, दिलासादायक बाब म्हणजे २४१ रुग्ण आतापर्यन्त बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्रालायने दिली आहे. गेल्या २४ तासांत ६९३ नवे रुग्ण आढळले आहेत. … Read more

पंतप्रधानांनी घरात दिवे लावायला सांगितलं होत झुंडीनं रस्त्यावर कसले येता- अजित पवार

मुंबई। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल रात्री ९ वाजता लोकांना घरात दिवे लावून कोरोनाविद्धच्या लढ्यात एकजूट असल्याचं दाखवण्यास सांगितलं होत. पंतप्रधानांच्या आवाहनाला काल देशभरात प्रचंड प्रतिसाद मिळाला. मात्र, काही अतिउत्साही नागरिकांनी रस्त्यावर झुंडीने येऊन फटाके वाजवून कालच्या उपक्रमाला गालबोट लावण्याचा प्रयन्त केला. अशा महाभागांवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. ”राज्यात कोरोनारुग्णांची संख्या … Read more

करोनाविरुद्धची लढाई लवकर संपवायची असेल तर लपू नका, स्वत:हून पुढं या!- अजित पवार

मुंबई । देशात दिवसेंदिवस करोना व्हायरसचा फैलाव वाढत असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. देशातील कोरोनाबाधित रुग्णांचा वाढत जाणारा आकडा चिंतेत भर घालत आहे. करोनाविरुद्धच्या लढ्यातील महत्वाचा, निर्णायक टप्पा सुरु झाला असून ज्या नागरिकांमध्ये करोनाची लक्षणे आहेत किंवा इतिहास करोनाच्यादृष्टीने संशयित आहे त्यांनी आता तरी लपून न राहता आरोग्य यंत्रणांशी तात्काळ संपर्क साधावा. करोनाविरुद्धचा … Read more

धक्कादायक! पोस्टमन निघाला करोना पॉझिटिव्ह, संपर्कात आलेले हजारो नागरिक ‘सेल्फ क्वारंटाइन’

वृत्तसंस्था । देशात दिवसेंदिवस करोना व्हायरसचा फैलाव वाढत असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. देशातील कोरोनाबाधित रुग्णांचा वाढत जाणारा आकडा चिंतेत भर घालत असतांना आता ओडिशामध्ये एका पोस्टमन करोना पॉझिटिव्ह असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोस्टमनला करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर ओडिशा सरकारने भुवनेश्वरमधील हजारो नागरिकांना ‘सेल्फ क्वारंटाइन’ होण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत … Read more

कोरोना इफेक्ट: कोल्हापूरकरांच ठरलंय…आता चिनी मालावर बहिष्कार

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोल्हापूरकरांच ठरलंय… आता चिनी मालावर बहिष्कार… होय हे खरं आहे.. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता..कोल्हापूरकरांनी आता चिनी मालावर बहिष्कार टाकलाय. कोल्हापूरात सध्या कोरोना बाधित रुग्णाची संख्या दोन वर आहे आणि त्याचा फैलावही खूप गतीने होतोय. या कोरोना विषाणूच्या निर्मितीला चीन जबाबदार असल्याने कोल्हापुरातील गजानन महाराज नगर परिसरातील ड्रायव्हर कॉलनीतील … Read more

करोनाशी लढताना पंतप्रधान मोदींनी भाजपा कार्यकर्त्यांना केले ‘हे’ ५ आग्रह

नवी दिल्ली । करोना विरुद्धची लढाई ही दीर्घकालीन लढाई असून, देशातील १३० कोटी जनता या युद्धामध्ये जिंकण्याच्या इच्छाशक्तीने एक झाली आहे’, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांपुढे ५ आग्रह धरले आहेत. हे ५ आग्रह महत्त्वाचे संकल्प असून त्यांद्वारे करोनाचा पराभव करण्यात मोठी मदत मिळेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. ते भारतीय जनता … Read more

करोना फोफावतोय; पिंपरी-चिंचवडमध्ये १९, तर मुंबईत ११ जणांना संसर्ग

पुणे । राज्यातील करोनाग्रस्तांच्या आकड्यात दिवसेंदिवस वाढत होत चालली आहे. सोमवारी राज्यात ३३ नवीन करोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार पिंपरी-चिंचवडमध्ये १९, मुंबईत ११, तर अहमदनगर, सातारा आणि वसईमध्ये प्रत्येकी एकाला करोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे राज्यातील करोनाग्रस्त रुग्णांचा आकडा ७८१ वर पोहोचला आहे. 33 new #Coronavirus positive … Read more