पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत मांडले ‘हे’ २१ महत्त्वाचे मुद्दे

नवी दिल्ली । देशातील लॉकडाऊनचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज राज्यांच्या मुख्यमंत्र्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक पार पडली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. पंतप्रधान मोदींनी अशा पद्धतीने राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची ही चौथी वेळ होती. गेल्या तीन बैठकांमध्ये फारशी संधी न मिळालेल्या मुख्यमंत्र्यांना यावेळी प्राधान्यानं बोलण्याची संधी देण्यात आली … Read more

पंतप्रधान मोदींनी केलं राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचं कौतुक, म्हणाले..

नवी दिल्ली । देशातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमवारी पुन्हा एकदा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनचा कालावधी वाढवला असल्याचा फायदा झाला असल्याचं सांगत नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं. लॉकडाउनसाठी केलेल्या एकत्रित प्रयत्नांचा प्रभाव काही प्रमाणात दिसत असून त्याचा फायदा होत असल्याचं … Read more

लुडोत हरला म्हणून त्यानं बायकोचा पाठीचा कणाच मोडला

वडोदरा, गुजरात । लॉकडाउनच्या काळात महिलांवरील हिंसाचाराच्या अनेक घटना समोर येत आहेत. क्षुल्लक कारणावरून पतीकडून आपल्या पत्नीला मारहाण केल्याच्या घटनेत वाढ होत आहे. गुजरातमधील वडोदरा येथे अशीच एक घटना घडली आहे. लॉकडाउनच्या काळात मनोरंजन व्हावे या उद्देशाने ऑनलाइन लु़डो खेळ खेळतांना   वारंवार हरल्याने नवऱ्यानं बायकोसोबत भांडणाला सुरूवात केली. हे भांडण इतकं वाढलं की नवऱ्यानं बायकोला … Read more

१६ मेनंतर भारतात ‘कोव्हिड १९’चा रुग्ण आढळणार नाही, नीती आयोगाच्या सदस्याचा दावा

वृत्तसंस्था । सद्यस्थितीत भारतातील ‘कोव्हिड १९’च्या रुग्णांमध्ये रोज लक्षणीय वाढ होत असली, तरी १६ मेनंतर देशात एकही करोनाचा रुग्ण आढळणार नाही, असा दावा नीती आयोगाचे सदस्य आणि सरकारच्या वैद्यकीय व्यवस्थापन समितीचे प्रमुख व्ही. के. पॉल यांनी एका अभ्यासाद्वारे मांडले आहे. कोरोनावर नियंत्रण करण्यासाठी देशभरात लॉकडाउन लागू केल्यानं कोरोना विषाणूचा संसर्गाचा वेग मंदावला आहे. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचे … Read more

महाराष्ट्रासह इतर राज्यं लॉकडाउन वाढवण्याच्या तयारीत

मुंबई । येत्या ३ मे रोजी देशातील लॉकडाउनचा दुसरा टप्प्याचा कालावधी पूर्ण होणार आहे. त्यासाठी फक्त ६ दिवस बाकी आहे. अशात पुन्हा एकदा एका प्रश्नाने डोकं वर काढलं आहे तो प्रश्न म्हणजे लॉकडाऊन संपणार कि वाढणार? याअनुषंगाने, देशातील मुख्यमंत्र्यांनी आपल्या राज्यातील परिस्थितीचे मुल्यमापन केले असून लॉकडाउनचा कालावधी वाढण्याबाबात विचार करत आहे. आज, सोमवारी देशातील परिस्थितीचा … Read more

रमजानच्या वेळी मशिदीत जाण्यास पाकिस्तानने दिली परवानगी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शनिवार पासून सुरू झालेल्या रमजानच्या महिन्यात पाकिस्तान सरकारने लोकांना मशिदीत येण्याची परवानगी दिली आहे. मात्र त्यांनी सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले पाहिजे अट घालण्यात आलेली आहे. कोरोना विषाणूची लागण असूनही सरकारने हा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे देशात १२,००० हून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे. शुक्रवारी सरकारने देशभरातील आंशिक लॉकडाऊन वाढवून ९ … Read more

राज्यात ३ मेपर्यंत दुकानं बंदच राहणार – राजेश टोपे

मुंबई । कोरोनासाठीचे हॉटस्पॉट, कंटेंटमेंट झोन आणि बाजारपेठा वगळून देशात सर्वत्र दुकाने सुरू करण्याची परवानगी एका आदेशान्वये केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली आहे. तसेच राज्य सरकार आपल्या अधिकारानुसार दुकानं सुरू ठेवायची अथवा नाही यावर निर्णय घेऊ शकतात असं या आदेशात म्हटलं गेलं होत. त्यावर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आपली प्रतिक्रिया देत लॉकडाऊन संपेपर्यंत राज्यात कोणतीही … Read more

समुद्राच्या लाटांतून निघाला निळा प्रकाश, निसर्गाचा अद्भुत चमत्काराचे ‘हे’ कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूमुळे जगातील अनेक देशांत लॉकडाउन सुरु केले गेले आहे.यामुळे बर्‍याच देशांमध्ये प्रदूषणाची पातळी देखील कमी झाली आहे,तर दुसरीकडे गर्दी असलेले क्षेत्र ओसाड झाले आहे.अशावेळी एका समुद्राच्या किनाऱ्यावर एक नयनरम्य दृश्य पाहायला मिळालं आहे.त्यावेळी समुद्राच्या लहरींमधून अचानक रंगीबेरंगी प्रकाश दिसू लागला. हे प्रकरण मेक्सिकोच्या अ‍ॅकॅपुल्कोमधील आहे. कोरोनामुळे, समुद्रकिनार्‍यावर सामान्य लोकांची ये-जा … Read more

वकील महाशयांनी चक्क बनियनवरच केली युक्तीवादाला सुरुवात, पुढं असं काही झालं..

जयपूर । ‘वर्क फ्रॉम होम’ या सवलतीचा काहीजण कसा अर्थ लावतायत याचं एक भन्नाट आणि विचित्र उदाहरण राजस्थानमध्ये पाहायला मिळालं. लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक केसेसची सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सनं करण्याची परवानगी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टांनी दिली आहे. अशाच एका केसमध्ये सुनावणीसाठी राजस्थान हायकोर्टातून एका वकिलाला कॉन्फरन्स कॉल लावला गेला. तर वकील महाशय चक्क बनियनमध्येच युक्तीवादाला उभे राहिले. … Read more

देशात आजपासून ‘ही’ दुकानं राहणार सुरु, ‘ही’ दुकान राहणार बंदच

नवी दिल्ली । करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. यामुळे देशभरात दुकानं, मॉल्स बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु शुक्रवारी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्रालयानं मोठा निर्णय घेत शनिवारपासून देशभरातील दुकानं उघडण्याची सशर्त परवानगी दिली होती. परंतु कोणती दुकानं उघडी ठेवावीत, कोणती नाही याबाबत मात्र सर्वांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. त्यावर … Read more