चारधाम यात्रेसाठी १ जुलैपासून ई पास सुरु, मात्र ‘या’ नियमांचे पालन करावे लागणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचे नियम हळूहळू शिथिल होत आहेत. आता उत्तराखंड सरकारने १ जुलैपासून चारधाम यात्रेसाठी ई पास देण्याची सुविधा सुरु करणार असल्याचे सांगितले आहे. उत्तराखंड राज्य चारधाम देवस्थानं बोर्डाने एक मार्गदर्शिका जारी केली आहे. ज्यामध्ये यात्रेसाठीचे नियम जाहीर करण्यात आले आहेत. यातील एक महत्वाचा नियम हा केवळ राज्यातील नागरिकांनाच … Read more

मुंबईत मास्कशिवाय घराबाहेर पडणाऱ्यांना १ हजार रुपये दंड; महापालिकेनं आदेश केला जारी

मुंबई । मुंबई महापालिकेने (bmc) मुंबईकरांना मास्क लावणं बंधनकारक (mask compulsory) केलं आहे. मास्कशिवाय घराबाहेर पडणाऱ्यांना १ हजार रुपये दंड ठोठावण्याचे आदेश महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले असून तसं परिपत्रकच जारी करण्यात आलं आहे. मुंबई महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी जाताना, प्रवास करताना किंवा घराबाहेर पडल्यावर तसेच खासगी वाहनांमध्येही प्रवास करताना मास्क लावणे बंधनकारक असल्याचे … Read more

कोरोनामुळे हादरली अमेरिका ! एका दिवसात तब्ब्ल 40 हजाराहून अधिक नवीन रुग्ण आढळले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेत शुक्रवारी एकाच दिवसात कोरोना संक्रमणाच्या सर्वाधिक 40,000 नवीन घटनांची नोंद झाली. गेल्या एप्रिलमधील एका दिवसात नोंदवलेल्या घटनांपेक्षा हे प्रमाण जास्त आहे. या संख्येमुळे काही राज्यांच्या राज्यपालांच्या योजना या ठप्प झाल्या आहेत तसेच राज्ये उघडण्यास मनाई करण्यात आली आहे.या संक्रमितांच्या संख्या वाढल्यामागे मोठ्या प्रमाणावर तपास सुरू असला तरी तज्ञ म्हणतात की, … Read more

‘या’ टॅबलेटची किंमत कमी करावी यासाठी अमोल कोल्हे यांनी केली केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे मागणी 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. बाजारात यावरील विविध औषधे सध्या उपलब्ध होत आहेत. बऱ्याच औषधांमुळे नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण होतो आहे. बाजारात सध्या फॅबिफ्लू नावाचे औषध उपलब्ध होते आहे. या औषधाची किंमत १०३ रु इतकी आहे. रुग्णाला हे औषध १४ दिवस घ्यावे लागते. पहिल्या दिवशी १८ गोळ्या आणि उरलेले दिवस रोज … Read more

बिल गेट्सने चिंता व्यक्त केली,म्हणाले,”सध्या लस आपल्याला कोरोनापासून वाचवेल याची गॅरेंटी नाही”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगाचे डोळे कोरोनाव्हायरस लसीवर लागलेले आहेत. वेगवेगळ्या देशांमध्ये या लसींच्या क्लिनिकल चाचण्या सुरू आहेत. परंतु अद्यापपर्यंत या लसीबाबत कोणतेही ठोस असे रिझल्ट्स समोर आलले नाहीत. दरम्यान, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी म्हटले आहे की ही लस आल्यानंतरही याची गॅरेंटी कोणाकडे नसेल कि कोरोना पुन्हा होणार नाह. बिल गेट्स आणि त्यांची संस्था … Read more

३० दिवसांत वाढले तब्बल ३ लाख कोरोनाग्रस्त; अनलाॅक १.० मध्ये वेगाने वाढले संक्रमण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात गेल्या तीस दिवसांत कोरोनाचा सुमारे तीन लाखाहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे. १ जूनपासून सुरू झालेल्या अनलॉक 1.0 मध्ये कोरोनाचे संक्रमण वेगाने वाढले आहे. मात्र, हे खरे आहे की या काळात लोक जास्तच घराबाहेर पडू लागले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 23 मे रोजी कोविड -१९ ने संक्रमित रुग्णांची संख्या 1,25,1001 … Read more

सातारा जिल्ह्यात १९ नवे कोरोनाग्रस्त; कराड तालुक्यातील तारुख बनतेय हाॅटस्पाॅट

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड व एन. सी.सी.एस. पुणे यांच्याकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार आज दिवसभरात 19 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. यामध्ये एकट्या कराड तालुक्यात 10 कोरोना बाधित सापडले आहेत. तारुख हे गाव आता नवे कोरोना हाॅटस्पाॅट बनत असून दिवसभरात तारूख येथे … Read more

औरंगाबादेतील करीना वाघिणीचा कोरोनामुळे मृत्यू?

औरंगाबाद प्रतिनिधी । सिद्धार्थ उद्यानातील प्राणीसंग्रहालयातील करिना नावाची सहा वर्षीय वाघीण काही दिवसांपासून आजारी होती. तिचा आज बुधवारी   सकाळी साडेपाच ते सहा वाजे दरम्यान मृत्यू झाला. दोन दिवसांपासून तिने अन्नपाणी सोडले होते. मनापा आयुक्त तथा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी या वाघिणीची मंगळवारी पाहणी केली होती. या वाघिणीची कोरोना चाचणीही करण्यात आली होती, मात्र त्याचा … Read more

चीनमध्ये सुरु झाला ‘डॉग मीट फेस्टिवल’;आता खाल्ली जाणार लाखो कुत्री

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । डिसेंबर 2019 मध्ये, चीनच्या वुहान शहरातून बाहेर पडलेल्या कोरोना विषाणूमुळे अद्यापही जगभरात त्रास होतो आहे. चीनच्या युलिन शहरातील गुआंग्सी प्रांतात पुढील 10 दिवसांसाठी चालणारा ‘डॉग मीट फेस्टिव्हल’ मंगळवार पासून सुरू झाला आहे. मात्र आयोजकांचे असे म्हणणे आहे की, कोरोनाला डोळ्यासमोर ठेवून या कार्यक्रमामुळे लोकांची संख्या कमी केली गेली आहे आणि अपेक्षा … Read more

मिरजेतील प्रसिद्ध डॉक्टरला कोरोनाची लागण; शहरात उडाली खळबळ

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे मिरजेतील प्रसिद्ध डॉक्टरला आज कोरोनाची लागण झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज मार्ग येथे असणाऱ्या या प्रसिद्ध डॉक्टरचा कोरोना अहवाल आज पॉझिटिव्ह आला. या डॉक्टरला त्रास जाणवू लागल्याने त्याने खाजगी लॅब मध्ये तपासणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या डॉक्टरला सध्या मिरजेतील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले … Read more