Sunday, April 2, 2023

‘या’ टॅबलेटची किंमत कमी करावी यासाठी अमोल कोल्हे यांनी केली केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे मागणी 

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. बाजारात यावरील विविध औषधे सध्या उपलब्ध होत आहेत. बऱ्याच औषधांमुळे नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण होतो आहे. बाजारात सध्या फॅबिफ्लू नावाचे औषध उपलब्ध होते आहे. या औषधाची किंमत १०३ रु इतकी आहे. रुग्णाला हे औषध १४ दिवस घ्यावे लागते. पहिल्या दिवशी १८ गोळ्या आणि उरलेले दिवस रोज ८ याप्रमाणे साधारण एका रुग्णाला एकूण १२२ गोळ्या घ्याव्या लागतात ज्याचा खर्च १२५००रु इतका होतो. या औषधांसंदर्भात अमोल कोल्हे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहून या औषधाची किंमत कमी करावी यासाठी मागणी केली आहे.

सर्वसामान्य नागरिकांसाठी १२५००रु ही रक्कम जमविणे कठीण आहे. तसेच फॅबिफ्लू ही गोळी कोरोनासाठी उपचार म्हणून उपलब्ध असणारे एकमेव औषध नसल्याचे अनेक तज्ज्ञांनी सांगितले असल्याचे ते म्हणाले. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन यांना एक सविस्तर पत्र लिहून कोल्हे यांनी या बाबी त्यामध्ये मांडल्या आहेत. तसेच त्यांनी ट्विट करून हे पत्र जाहीर केले आहे.

- Advertisement -

 

अमोल कोल्हेंनी पत्रात म्हटलेय की, ‘ग्लेनमार्क फार्मा’ या औषध कंपनीने हे औषध बाजारात आणले आहे. एका गोळीची किंमत १०३ रुपये इतकी आहे. करोनातून मुक्त होण्यासाठी रुग्णाला या गोळ्याचे १४ दिवसांत १२२ गोळ्यांचे सेवन करायचे आहे. आणि १२ हजाराच्या पुढे जाणारी एवढी किंमत सर्वसामान्यांना परवडणार आहे का? महाराष्ट्र, गुजरात, दिल्लीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील रुग्णावर याची चाचणी घेण्यात आल्याचे कंपनीने सांगितले आहे. पण औषधाची किंमत ठरवताना गोरगरीब आणि मध्यमवर्गीयांचा विचार केलेला दिसत नाही, असेही कोल्हेंनी आपल्या पत्रात म्हटले आहे.’तसेच अमोल कोल्हेंनी ग्लेनमार्क कंपनीच्या फॅबिफ्ल्यू या औषधाच्या एकूण दर्जावर प्रश्न उपस्थित केले आहे.

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.