ट्रम्प यांचा जागतिक आरोग्य संघटनेवर पुन्हा हल्ला म्हणाले,”डब्ल्यूएचओ म्हणजे चीनच्या हातातले खेळणे”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेला (डब्ल्यूएचओ) चीनचे हातचा बाहुला म्हटले आणि सांगितले की अमेरिका लवकरच डब्ल्यूएचओबद्दल काही शिफारसी घेऊन येईल आणि त्यानंतर चीनबाबतही असेच पाऊल उचलले जाईल. ट्रम्प यांनी कोरोना विषाणू या साथीच्या आजाराविषयी बोलले. ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधील आपल्या ओव्हल कार्यालयात पत्रकारांना सांगितले की, “आम्ही लवकरच एक … Read more

देशात २४ तासात कोरोनामुळे ७१ जणांचा मृत्यू, रुग्णसंख्या ३२ हजारांच्याजवळ

नवी दिल्ली । भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत नसताना कोरोनाबाधित रुग्णांचा वाढता आकडा चिंतेत भर पडत आहे. गेल्या २४ तासाचा आढावा घेतल्यास कोरोनाचे १८१३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे भारतातील करोनाबाधितांची संख्या ३१ हजार ७८७ इतकी झाली आहे. कोरोनामुळे २४ तासात ७१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत कोरोनाची लागण होऊन १००८ रुग्णांचा मृत्यू झाला … Read more

पाकिस्तानी लोकांचे मत,कोरोनाव्हायरसचा धोका ठरत आहे अतिशयोक्तीपूर्ण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरातील दोन लाखांहून अधिक लोकांच्या मृत्यूमुळे बहुतेक पाकिस्तानी कोविड -१९ ला मृत्यूचा गंभीर धोका मानत नाहीत. एका सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की प्रत्येक पाचपैकी तीन पाकिस्तानीना असा विश्वास आहे की कोरोना व्हायरस जितका अतिशयोक्ती आहे तितकाच धोका आहे. पाकिस्तानमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने पसरत आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत देशात कोरोनाने संसर्गित झालेल्या … Read more

तारांबळ! औरंगाबाद पोलीसांनी पकडलेला आरोपी निघाला कोरोना पॉझिटिव्ह

औरंगाबाद । पोलीस कोठडीत असलेल्या एका 42 वर्षीय आरोपीचा स्वाब नमुन्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने औरंगाबाद शहर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. सिटीचौक पोलीस ठाण्यातील सुमारे 30 ते 35 पोलीस अधिकारी-कर्मचारी या कोरोनाबधित आरोपीच्या संपर्कात आले होते. त्या सर्वांची कोविड१९ चाचणीनंतर त्यांना क्वांरन्टीन करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली आहे. प्रतिबंधित … Read more

हुर्रे! मुंबईत कोरोनाबधितावर केलेली पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी

नाशिक । मुंबईमधील लिलावती रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णावर करण्यात आलेली पहिली प्लाझ्मा थेरपी  यशस्वी झाली असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. नाशिकमधील जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना उपाययोजना संदर्भात बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. “लिलावती रुग्णालयात दाखल करोनाबाधित रुग्णावर प्लाझ्मा थेरपी करण्यात आलेली असून त्यात यश मिळालं आहे. मुंबई … Read more

चिंताजनक! देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ३१ हजार ३३२ तर मृत्यूंनी गाठला हजाराचा टप्पा

नवी दिल्ली । लॉकडाउनचा कालावधी संपत आलेला असला तरी अद्यापही कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नाही. भारतात गेल्या २४ तासात ७३ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३१ हजार ३३२ झाली आहे. सोबतच १८९७ नवे रुग्ण सापडले आहेत. तर मृतांची संख्या १००७ झाली आहे. आतापर्यंत ७६९५ जणांना उपचार करुन घरी सोडण्यात आलं आहे. … Read more

एका अफवेमुळे इराणमध्ये ५ हजार जणांनी पिले इंडस्ट्रियल अल्कोहोल; ७२८ जणांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इराण सरकारने आता कबूल केले आहे की हजारो लोकांनी अफवेमुळे इंडस्ट्रियल अल्कोहोल प्यायले आणि त्यांचा मृत्यू झाला. सोशल मीडियाच्या माध्यमातून इराणमध्ये एक अफवा पसरली की मद्यपान केल्यामुळे कोरोनाव्हायरस बरा होतो,त्यानंतर शेकडो मुलांसह हजारो लोकांनी इंडस्ट्रियल अल्कोहोल पिले. इराण सरकारने सोमवारी सांगितले की या घटनेत एकूण ७२८ लोकांचा मृत्यू झाला आहे. इराणच्या … Read more

देशात एकाच दिवसात ५१ जणांचा कोरोनाने मृत्यू, रुग्ण संख्या ३० हजारांजवळ

नवी दिल्ली । देशात गेल्या २४ तासात कोरोनामुळे ५१ रुग्णांचा मृत्यू झाला असून १ हजार ५९४ कोरोना पॉझिटिव्ह आढळले रुग्ण आहेत. या नव्या रुग्णाची भर पडल्यानंतर देशातील करोना रुग्णांची संख्या २९ हजार ९७४ एवढी झाली आहे. आत्तापर्यंत करोनामुळे ९३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातली माहिती दिली आहे. आत्तापर्यंत देशभरात ७ हजार २७ … Read more

कोरोना अपडेट: राज्यात आज २७ जणांचा कोरोनाने बळी तर ५२२ नवे रुग्ण

मुंबई । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरासह राज्यात दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोना अजूनही नियंत्रणात आला नसून कमी-अधिक प्रमाणात नवीन रुग्णांची दरोरोज भर पडत आहे. दरम्यान, आज राज्यात कोरोनाचे ५२२ नवे रुग्ण आढळले असून २७ जण कोरोनानारे दगावले आहेत. याचबरोबर आजच्या तारखेपर्यंत राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ८ हजार ५९० झाली. तर ३६९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील … Read more

55 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनो घरीच थांबा! मुंबई पोलीस आयुक्तांचे निर्देश

मुंबई । कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी रात्रंदिवस ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. गेल्या ३ दिवसात मुंबई पोलीस दलातील ३ कर्मचाऱ्यांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले होते. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वयस्क पोलिसांना कोरोनाचा धोका लक्षात घेत पोलीस आयुक्तांनी तातडीने पावलं उचलत … Read more