देशात १७० जिल्हे कोरोनाचे हॉटस्पॉट – केंद्रीय आरोग्य मंत्रालय

नवी दिल्ली । करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आतापर्यंत जे यश आले आहे ते काम पुढेही असेच सुरु ठेवायचे आहे. यानुसार देशातील जिल्ह्यांचे तीन प्रकारात वर्गीकरण करण्यात आले आहे. पहिल्या प्रकारात हॉटस्पॉट जिल्हे, दुसऱ्या प्रकारात हॉटस्पॉट नसलेले पण तिथे करोनाचे रुग्ण आढळून येत आहेत असे जिल्हे आणि तिसरा प्रकार म्हणजे ग्रीन झोन जिल्हे या जिल्ह्यांमध्ये एकही करोनाचा … Read more

देशात कोरोनाचे ३९२ मृत्यू; कोरोनाग्रस्तांची संख्या १२ हजारांच्या उंबरठ्यावर

नवी दिल्ली । भारतात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनचे २१ दिवस उलटून गेल्यानंतरही करोनाचा संसर्ग थांबेनासा झाला आहे. भारतात कोरोनाच संकट वाढत आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येनं आता उच्चांक गाठत आहे.दरम्यान, आज भारतात करोना रुग्णांची संख्या १२ हजारांच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचली आहे. आतापर्यंत देशात ११ हजार ९३३ कोरोनाची लागण झालेल्याची नोंद झाली आहे. तर आत्तापर्यंत ३९२ रुग्णांचा मृत्यू झाले … Read more

कोरोनाशी युद्ध करायला भारतीय लष्कर मैदानात, उभारले ३ मोठे कोरोना दवाखाने

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय लष्कर २० एप्रिल पर्यंत कोरोनाव्हायरस ग्रस्त सामान्य रूग्णांसाठी तीन रुग्णालये तयार करत आहेत. यापैकी ४९० रुग्णांवर त्वरित उपचार करता येतील, परंतु आपत्कालीन परिस्थितीत ही क्षमता ५९० पर्यंत वाढवता येऊ शकते. कोलकाताजवळील बॅरेकपूर, शिलांग आणि लिकाबली येथे ही रुग्णालये सुरू केली जात आहेत. या व्यतिरिक्त लष्कराने चार क्विक रिअ‍ॅक्शन मेडिकल टीम्स … Read more

लज्जास्पद! कोरोना संशयिताची चाचणी घ्यायला गेलेल्या मेडिकल टीम व पोलिसांवर दगडफेक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद जिल्ह्यात काहीजणांनी कोरोना विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या वैद्यकीय पथक आणि पोलिसांवर दगडफेक केली. वैद्यकीय पथक आणि पोलिस त्या भागात कोरोना संशयिताचा शोध घेण्यासाठी गेले होते. रुग्णवाहिकेच्या ड्रायव्हरने सांगितले की, “जेव्हा आमची टीम रूग्णांसह रुग्णवाहिकेत चढली तेव्हा अचानक जमावाने गर्दी केली आणि दगडफेक सुरू केली. काही … Read more

भारतात झपाट्याने वाढतेय कोरोनाग्रस्तांची संख्या, ICMR म्हणतेय ‘ही’ गोष्ट करणे गरजेचे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) म्हणते की कोरोना विषाणूच्या साथीच्या आजाराच्या जास्त चाचण्या घेणे महत्वाचे आहे कारण भारतातील रुग्णांची संख्या आता झपाट्याने वाढत आहे. हे वक्तव्य अशा वेळी करण्यात आले आहे जेव्हा सरकार चीनकडून रॅपिड टेस्टिंग किट येण्याची वाट पाहत आहे. रक्ताच्या नमुन्यांमध्ये अँटीबॉडी शोधण्यासाठी रॅपिड टेस्टिंग किट ५ एप्रिलला … Read more

काय आहे वटवाघूळ अन् कोरोनाचं कनेक्शन? ICMR चा हा रिपोर्ट वाचून बसेल धक्का

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसमुळे जगभरात हाहाकार माजला आहे. आतापर्यंत जगभरातील १९ लाखाहून अधिक लोकांना याचा संसर्ग झाला आहे, तर १ लाख २० हजाराहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतातही संक्रमित रुग्णांची संख्या वाढून १० हजारांच्या पुढे गेली आहे. चीन येथून हा घातक कोरोना विषाणू कसा पसरला याचा खुलासा अद्यापही करण्यात आलेला नाही … Read more

कोरोनामुळं राज्यावर आर्थिक संकट, बेरोजगारी वाढणार- शरद पवार

मुंबई । करोनामुळे राज्यावर अर्थसंकट येणार आहे. ते आलेलं आहे. शेतकऱ्यांना शेतातील माल तसाच सोडून देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात बेकारी आणि बेरोजगारी वाढणार आहे. हे करोनाचे परिणाम एक ते वर्ष जाणवतील,’ असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला. शरद पवार यांनी आज पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेशी फेसबुक लाईव्हवरून संवाद साधला त्यावेळी … Read more

संकटाच्या काळात राजकारण नका करू – शरद पवार

मुंबई । देशावर करोनाचं संकट आलं आहे. करोनाशी लढताना कोणीही राजकारण करू नये. करोनाचा पराभव हाच आपला एककलमी कार्यक्रम असायला हवा, असं आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. तसेच करोनाचा परिणाम सुमारे दोन वर्ष सोसावा लागणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. वांद्रे स्थानकावरील कामगारांची घरी जाण्यासाठी गर्दी झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झालेले असतानाच … Read more

महाराष्ट्र लढतोय; कोरोनाशी लढताना उद्धव ठाकरेंचे ७ दिलासादायक मुद्दे

टीम हॅलो महाराष्ट्र | उद्धव ठाकरेंनी राज्यातील जनतेला संबोधन करताना कोरोनाशी लढताना महाराष्ट्र कुठल्या पातळीवर काम करतोय, आणि सरकारची पुढील वाटचाल काय असेल यावर थोडक्यात भाष्य केलं. पाहुयात त्यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे. १) कोरोनाशी लढण्यासाठी स्पेशल टास्क फोर्सची निर्मिती, तज्ञ डॉक्टर, शास्त्रज्ञ, अभ्यासक एकत्र येऊन काम करणार. २) आर्थिक अडचणींचा सामना करण्यासाठी अजित पवारांच्या नेतृत्वात … Read more

कोरोनाशी लढण्यासाठी स्पेशल टास्क फोर्स काम करेल – उद्धव ठाकरे

टीम हॅलो महाराष्ट्र | परिस्थिती नियंत्रणात आली असली किंवा नसली तरी या लढ्याकडे गांभीर्याने पहावं लागेल असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राज्यातील नागरिकांचं कौतुक केलं. महाराष्ट्रात वैद्यकीय परिस्थिती आजही व्यवस्थित असून चाचण्यांची संख्याही वाढली आहे. सरकारतर्फे करता येणारे सर्व प्रयत्न सुरुच असल्याचं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीविषयी उद्धव ठाकरेंनी सविस्तर माहिती यावेळी दिली. कोरोनातून … Read more