भारतात झपाट्याने वाढतेय कोरोनाग्रस्तांची संख्या, ICMR म्हणतेय ‘ही’ गोष्ट करणे गरजेचे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) म्हणते की कोरोना विषाणूच्या साथीच्या आजाराच्या जास्त चाचण्या घेणे महत्वाचे आहे कारण भारतातील रुग्णांची संख्या आता झपाट्याने वाढत आहे. हे वक्तव्य अशा वेळी करण्यात आले आहे जेव्हा सरकार चीनकडून रॅपिड टेस्टिंग किट येण्याची वाट पाहत आहे. रक्ताच्या नमुन्यांमध्ये अँटीबॉडी शोधण्यासाठी रॅपिड टेस्टिंग किट ५ एप्रिलला पहिले भारतात येणार होते. डिलिव्हरीची तारीख आधी १० एप्रिल आणि नंतर १५ एप्रिल करण्यात आली. तथापि, या सर्व किट बुधवारीपर्यंत येतीलच, असे कोणतेही स्पष्टीकरण अजूनपर्यंत मिळालेले नाही.

BioMedomics Launches COVID-19 IgM-IgG Rapid Test for Novel ...

एखाद्या व्यक्तीला विषाणूची लागण झाली आहे की संसर्ग झाला आहे याची तपासणी रॅपिड टेस्टिंग किटद्वारे कळून येते. संसर्गाचा वेगाने शोध लावण्याव्यतिरिक्त, बर्‍याच देशांमध्ये या चाचणीद्वारे शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे की रुंगांमध्ये सार्स-कोव्ह २ विरूद्ध रोग प्रतिकारशक्ती आहे किंवा नाही.

आरटी-पीसीआर चाचणी सध्या भारतात वापरली जात आहे.ज्याचा निकाल येण्यास पाच तास लागतात. त्याच वेळी,रॅपिड टेस्टिंग किटद्वारे या व्हायरसचा संसर्ग शोधण्यासाठी केवळ २५ ते ३० मिनिटे लागतात. सोमवारी प्रसिद्ध झालेल्या आयसीएमआर दस्तऐवजानुसार, ‘भारतात कोविड -१९ प्रकरणे सातत्याने वाढतच आहेत. अशा परिस्थितीत प्रयोगशाळांद्वारे चाचण्यांची संख्या वाढविणे आवश्यक झाले आहे.

Coronavirus: India's count touches 250 as new cases reported in MP ...

सार्वजनिक आरोग्य तज्ञांनी हा विषाणू समुदायिक प्रसार होण्याच्या टप्प्यात येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या अवस्थेत,हा संसर्ग अंधाधुंध पसरतो आणि कोरोना येथे कोणी कसे आले हे शोधणेदेखील कठीण होऊन जाते. तथापि, सरकार म्हणते की हा विषाणू अजूनही भारतात समुदायिक प्रसार होण्याच्या टप्प्यात पोहोचलेला नाही.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत १०७६ नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत आणि ३८ लोकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर देशात कोरोना व्हायरस पॉझिटिव्हची एकूण संख्या ११,४३९ वर पोचली असून त्यापैकी ९७५६ सक्रिय आहेत,१३०६ पूर्ण बरे झाले आहेत किंवा त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे आणि ३७७ जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे.

Coronavirus cases in India rise to 30 as Ghaziabad man tests ...

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

इतर महत्वाच्या बातम्या –

लॉकडाउन संदर्भात केंद्राची नवी नियमावली, जाणून घ्या काय सुरु राहणार अन काय बंद

काय आहे वटवाघूळ अन् कोरोनाचं कनेक्शन? ICMR चा हा रिपोर्ट वाचून बसेल धक्का

लाॅकडाउन वाढल्याने ६ महिने वाढू शकते EMI मधील सूट, घ्या जाणुन

आता ८ एवजी १२ तासांची होणार कामाची शिफ्ट? कायद्यात होणार सुधारणा

पुन्हा वाढल्या सोन्या चांदीच्या किंमती, जाणुन घ्या आजचे भाव

भारताच्या वाटेवर असलेलं मेडिकल किटने भरलेले जहाज अमेरिकेला का पाठवले? WHO म्हणते…

Leave a Comment