खाकी वर्दीतील पोलिसांचे माणूसकीचे दर्शन; कोरोनाने मृत्यू पावलेल्या आजीवर केले अंत्यसंस्कार

सोलापूर | कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे, जवळची नाती आणि जीवाभावाची माणसं ही आता पोरकी होवू लागली आहेत. अशा संकट काळात ही माणुसकी जपणारी नाती शिल्लक असल्याची प्रचिती काल पंढरपूर तालुक्यातील सांगवी गावात दिसून आली. कोरोनामुळे मृत्यु पावलेल्या आजीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी घरातील कोणीच नसल्याने शेवटी करकंब येथील खाकी वर्दीतील पोलिसांनी त्या मृत आजीवर अंत्यसंस्कार करून माणूसकीचं दर्शन … Read more

कौतुकास्पद! कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी तरुण उद्योजकाचा पुढाकार; स्वतःच्या मल्टिप्लेक्स मध्ये सुरु केले हॉस्पिटल

सोलापूर | पंढरपूर विधानसभेची निवडणूक पार पडल्यानंतर आता शहर व तालुक्यात कोरोना रूग्ण संख्या झपाट्यानं वाढू लागली आहे. त्यामुळे येथील आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली आहे. अशा गंभीर आणि चिंताजनक परिस्थितीमध्ये पंढरपूर येथील तरूण उदायोजक अभिजीत पाटील एका देवदुता सारखे धावून आले आहेत. गरीब व गरजू रूग्णांना माफक दरात उपचार व्हावेत यासाठी त्यांनी स्वतःच्या मल्टीप्लेस इमारतीच्या दोन … Read more

कोरोनावर मात केल्यानंतर 90 वर्षाच्या आजीने सर केला 3 हजार 50 फूट उंचीचा कोरडाई गड!

सोलापूर | दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोना संसर्गावर मात केलेल्या पंढरपूर येथील 90 वर्षाच्या दमयंती भिंगे यांनी समुद्र सपाटी पासून सुमारे 3 हजार 50 फूट उंचीवर असलेला कोराईगड सर केला. कोरोनाच्या नकारात्मकतेच्या काळात या आजीने सकारात्मकतेची उर्जा दिली आहे. वयाची नव्वदी अोलांडलेल्या पंढरपूरच्या भिंगे आजींना काही दिवसा पूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यावर त्यांनी डाॅक्टरांच्या सल्ल्याने … Read more

कोरोना संकटग्रस्त भारताला ऑस्ट्रेलिया पाठवणार ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि PPE

मेलबर्न । कोविड -19 च्या घटनांमध्ये नव्याने वाढ होत असलेल्या भारताला तातडीने मदत म्हणून ऑस्ट्रेलिया ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे (PPE) पाठवेल. आरोग्यमंत्री ग्रेग हंट यांनी सोमवारी ही माहिती दिली. ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन या वृत्तवाहिनीने हंटच्या हवाल्याने सांगितले की,” फेडरल सरकार मदतीसाठी आणखी काय पाठवू शकते यावर विचार करीत आहे.” फेडरल हेल्थ मिनिस्टर हंट … Read more

Corona: इटलीने भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर घातली बंदी, इतर अनेक देशांनीही याआधीच बंदी घातली आहे

इटली । इटलीने भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी आणली आहे. भारतामध्ये झपाट्याने वाढणार्‍या कोरोना संसर्गामुळे इटालियन सरकारने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वीही ब्रिटन, पाकिस्तान, न्यूझीलंड, कॅनडा या देशांनी भारतीयांवर प्रवासी बंदी लादली आहे. इटलीचे आरोग्यमंत्री रॉबर्टो स्प्रान्झा यांनी ट्विटरवर म्हटले आहे की,”गेल्या 14 दिवसांत जी लोकं भारतात गेले आहेत किंवा जे भारतातून आले आहेत त्यांवर बंदी … Read more

कोरोनासंकटामध्ये डॉक्टर आणि नर्सेसना मोफत हवाई सुविधा देण्यासाठी Vistara ची खास ऑफर

नवी दिल्ली । देशातील कोरोना साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत विमान कंपनी विस्ताराने डॉक्टर आणि परिचारिकांसाठी खास ऑफर्स आणल्या आहेत. कोविड साथीच्या या संकटामध्ये कंपनीने देशभरातील डॉक्टर आणि परिचारिकांना मोफत प्रवास करण्याची घोषणा केली आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाच्या सहसचिव उषा पाध्ये यांना लिहिलेल्या पत्रात कंपनीने या ऑफरबद्दल माहिती दिली आहे. या व्यतिरिक्त कंपनीने म्हटले आहे की,” … Read more

ऑक्सिजन संबंधित मशीन घेऊन येणाऱ्या जहाजांकडून घेतला जाणार नाही पोर्ट चार्ज

नवी दिल्ली । देश सध्या कोरोनाव्हायरसच्या दुसर्‍या लाटेशी झुंज देत आहे. यामुळे ऑक्सिजनची मागणी लक्षणीय वाढली आहे. त्याचबरोबर ऑक्सिजनच्या कमतरतेच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारने म्हटले आहे की,” ऑक्सिजन आणि इतर संबंधित उपकरणे तसेच वस्तू घेऊन जाणाऱ्या जहाजांकडून शुल्क न घेण्याच्या सूचना त्यांनी सर्व प्रमुख बंदरांना दिल्या आहेत. बंदर, नौवहन आणि जलवाहतूक मंत्रालयाने रविवारी दिलेल्या निवेदनात म्हटले … Read more

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचार्‍यांना शासनाकडून धक्का ! जुलैमध्ये TA नाही वाढणार, आता पगार कधी वाढणार ते जाणून घ्या

नवी दिल्ली । केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी वाईट बातमी … जर आपणही महागाई भत्ता (Dearness Allowance) आणि प्रवास भत्ता (Travel Allowance) वाढण्याची वाट पाहत असाल तर यासाठी आता आपल्याला आणखी काही काळ थांबावे लागेल. कोरोना काळात, TA आणि DA (7th Pay Commission) वाढविण्याचा निर्णय सरकारने नुकताच पुढे ढकलला आहे. सध्या सर्व कर्मचार्‍यांना जुन्या दराप्रमाणेचा महागाई भत्ता देण्यात … Read more

शासकीय रुग्णालयातच रेमडीसीव्हीरचा काळा बाजार; मृत रुग्णाचे इंजेक्शन ३० हजारांना विकले

सांगली | जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. अशातच रेमडीसीव्हीर इंजेक्शनची मागणी देखील वाढत आहे. याचाच गैरफायदा उचलत अव्वाच्या सव्वा दराने गरजू रुग्णांना हे इंजेक्शन विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश सांगली पोलिसांनी केला आहे. जीवनावश्यक वस्तूमध्ये समावेश असलेले रेमडेसिवीर इंजेक्शनच काळ्याबाजाराने विकत असताना मिरज शासकीय रुग्णालयातील अधिपरीचारकासह एका खाजगी लॅब टेक्निशियनला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सापळा रचून … Read more

कोरोना संकटात मदत करण्यासाठी पुढे आले Google चे सुंदर पिचाई, 135 कोटींचा मदत निधी केला जाहीर

नवी दिल्ली । देशभरात वेगाने पसरणार्‍या कोरोना संकटात गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई (Google CEO Sundar Pichai) मदतीसाठी पुढे आले आहेत. कोरोनामुळे देशातील परिस्थिती लक्षात घेता त्यांनी 135 कोटींचा मदत निधी जाहीर केला आहे. याशिवाय मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांनीही मदतीचा हात पुढे केला आहे. नडेला यांनी आज सांगितले की,”कंपनी देशाला दिलासा … Read more