करोनाबाधित मृतकाच्या पत्नी-मुलाला करोनाची लागण; अंत्यसंस्काराची परवानगीही नाकारली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दुबईहून प्रवास करून देशात परतलेल्या ६३ वर्षीय करोनाबाधित रुग्णाचा मंगळवारी सकाळी कस्तुरबा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. थेट संपर्कात आल्यामुळे मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाची पत्नी आणि मुलगा यांनाही करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांच्यावर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचेही सांगण्यात येत आहे. दरम्यान, आता खबरदारी म्हणून या दोघांनाही … Read more

करोनाने केला भारतीय सैन्यावर हमला; एक जवान करोना व्हायरस पॉझिटिव्ह

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात दहशत पसरली आहे. देशभरात या व्हायरसने ३ जणांचा मृत्यू झाला असून बळी पडणाऱ्यांची संख्या वाढण्याची भीती आहे. दरम्यान, भारतीय सैन्यातील एक जवान करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. वृत्तसंस्था एएनआयने सैन्य स्रोतांच्या आधारे दिलेल्या वृत्तात सांगितले की, भारतीय सैन्यातील एका ३४ वर्षीय जवानाला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. … Read more

‘त्या’ ३९ मराठी जनांच्या मदतीसाठी शरद पवारांचे परराष्ट्रमंत्र्यांना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात कोरोनाने थैमान घातलं असून त्याचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय वाहतूकीवर झाला आहे. अनेक देशांनी आपल्या देशात येणाऱ्या विदेशातील अनेक फ्लाईट्स बंद करण्यात आल्या आहेत. यायचाच फटका उझबेकिस्तानमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या 39 भारतीयांना बसला आहे. उझबेकिस्तानमध्ये विदेशातील अनेक फ्लाईट्स बंद करण्यात आल्यानं जवळपास 39 भारतीय नागरिक अडकून पडले आहेत. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सोलापूर, सांगली, … Read more

अजिंठा-वेरूळ पर्यटनाला करोनाचा फटका; ७ एप्रिलपर्यंत लेण्या बंद

औरंगाबाद प्रतिनिधी । देशात करोनाच्या वाढत्या प्रभावामुळे औरंगाबादमधील जगविख्यात अजिंठा आणि वेरुळ लेण्या बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. येत्या 19 मार्चपासून 7 एप्रिलपर्यंत वेरुळ आणि अजिंठा लेणी बंद राहणार आहेत. करोनाच्या प्रभावामुळे फक्त अजिंठा आणि वेरूळ लेण्यासोबतच ताजमहलची प्रतिकृती असलेला बीबी-का-मकबारा, औरंगाबाद लेणी, दौलताबाद (देवगिरी) किल्ला, पानचक्की इत्यादी पर्यटन स्थळेही प्रशासनाने बंद करण्याचा निर्णय … Read more

मुंबई लोकलला थांबवण्यात करोना अपयशी, मात्र..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार लोकल ट्रेन काही दिवस बंद ठेवण्याची चर्चा सुरु असताना मुंबईतील लोकल बंद होणार नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. मुंबईतील बस किंवा ट्रेन आम्ही बंद करणार नसून जनतेने अनावश्यक प्रवास टाळावा असं आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलं. राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते. … Read more

कोल्हापूर शहरातील मंगल कार्यालय, लॉन व मॉलची करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर तपासणी

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर देशांतर्गत कोरोना या विषाणूचे संसर्ग बाधीत रूग्ण आढळत आहेत. त्यामुळे या कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादूर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. त्यामुळे महानगरपालिका क्षेत्रातील मंगल कार्यालय, लॉन व मॉलची कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन विभागाच्यावतीने तपासणी करण्यात आली आहे. याठिकाणी मंगल कार्यालय, … Read more

परभणी जिल्ह्यात करोनामुळं शाळा, आठवडी बाजार, यात्रा बंद; अफवा पसरविणाऱ्यावर होणार गुन्हे दाखल

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे करोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी उपाययोजना म्हणून परभणी जिल्हातील शासकीय शैक्षणिक व खाजगी संस्थासह आठवडी बाजार व यात्रा बंदचे आदेश जिल्हाधिकारी दिपक मगुळीकर यांनी काढले असुन उल्लंघन केल्यास कारवाई होणार आहे. मोठ्या शहरासह आता गावागावात कोरोनाची भिती मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. लहानापासून मोठ्या पर्यंत सगळेच जण आत्ता संसर्गजन्य विषाणू कोव्हीड १९ … Read more

पुढील सात दिवस सरकारी कार्यालये राहणार बंद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना संसर्गाचा धोका लक्षात घेता राज्य सरकारने मोठे आणि महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पुढील सात दिवस सर्व सरकारी कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शासकीय कार्यालये एक आठवडा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात आपत्कालिन सेवा वगळता राज्यातील … Read more

करोनामुळं कोल्हापूरात मनपाची उद्याने 31 मार्च पर्यंत बंद

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर महानगरपालिकेची सर्व उद्याने 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय आज (दि.16) महापालिका प्रशासनाने घेतला. सध्या भारतामध्ये आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून याबाबत आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी संबंधीत अधिकाऱ्यांची आयुक्त कार्यालये आढावा बैठक घेतली. यावेळी आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी कोरोना व्हायरस या संसर्गजन्य आजार … Read more

करोनामुळं रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिट झालं ५० रुपयाला; लोकलला सुद्धा लागू शकतो ब्रेक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईसह राज्यातील अनेक शहरांत आता प्लॅटफॉर्म तिकिट खरेदी करण्यासाठी 50 रुपये खर्च करावे लागणार आहेत. करोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने पश्चिम रेल्वेने या किंमती वाढविल्या आहेत. पश्चिम रेल्वे विभागात एकूण ७५८ स्थानके आहेत त्यापैकी ४५० स्थानके ही प्रमुख आहेत. त्यातील सुमारे २५० स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या किंमती … Read more